Homeशहरमाता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त पॅनल क्रमांक १३ मध्ये स्वच्छ भारत अभियान...

माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त पॅनल क्रमांक १३ मध्ये स्वच्छ भारत अभियान व जनजागृती रॅली

उल्हासनगर दि ७ ( प्रमोद दळवी ) : माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त उल्हासनगरतील पॅनल क्रमांक १३ मध्ये शिवसेना नगरसेवकांच्या वतीने स्वच्छ भारत अभियान व जनजागृती रॅली शनिवारी काढण्यात आली होती.

पॅनल क्रमांक १३  मधील शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक यांनी नगरसेविका कांता पवार, यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण पॅनल मध्ये स्वच्छता मोहीम व जनजागृती अभियान हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी परिसरातील नागरिकांना आपल्या प्रभागातील स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच घरातला कचरा घंटागाडी मध्ये किंवा सफाई कर्मचाऱ्यांच्या डब्यांमध्ये टाकण्याचे आवाहन केले. या स्वच्छता मोहीम व जनजागृती अभियानामध्ये नगरसेविका कांता पवार, नगरसेवक प्रदीप गोडसे, सुरज सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच युवा सेनेचे शहर अधिकारी सुशील पवार, यांच्यासह सुनील पवार, समीर शेख, साळवी, अनिल मराठे  यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या वतीने पालिका अधिकारी एकनाथ पवार, यांच्यासह सफाई कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी देखील या स्वच्छता मोहीम व जनजागृती अभियानामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमाद्वारे परिसरातील नागरिकांना स्वच्छताबाबत महत्त्व पटवून देण्यात आले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शहर स्वच्छतेसाठी नागरिकांचेही महत्त्वाची भूमिका आहे. आणि अशाच अभियानाद्वारे उल्हासनगर शहर स्वच्छ व सुंदर दिसून येईल.

याबाबत सुशील पवार यांनी सांगितलेया स्वच्छता अभियानामध्ये पॅनल क्रमांक १३  मधील शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका, स्वच्छता निरीक्षक मुकादम, पालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्वच्छता मोहीम व जनजागृती अभियानामध्ये नागरिकांना ओला कचरा सुका कचरा हा वेगळा करून टाकण्याबाबत तसेच प्लास्टिकचा वापर न करणे याबाबत सांगण्यात आले. तसेच आपल्या घरातला कचरा घराजवळ येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कचराकुंडीत व घंटागाडी मध्ये टाकण्यात यावा. तो नाल्यात किंवा इतर ठिकाणी टाकू नये असेही नागरिकांना सांगण्यात आले. आपला प्रभाग स्वच्छ राहिला तर रोगराई देखील होणार नाही असेही सांगण्यात आले. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसावा याकरिता कचरा कचराकुंडीतच टाकावा अशाही सूचना नागरिकांना देण्यात आल्या. आपण जो कचरा नाल्यात टाकता त्यामुळे नाल्या चोकोप होतात. नाल्यात तुमल्या की  दुर्गंधी पसरते आणि रोगराई उद्भवते. याशिवाय त्या नाल्यातील सांडपाणी आपल्या घरात शिरते. त्यामुळे नाल्यात कचरा टाकू नका. आजारपणाला  आमंत्रण देऊ नका असेही सूचना नागरिकांना या जनजागृती अभियानामध्ये देण्यात आल्या.

याबाबत पालिकेचे अधिकारी एकनाथ पवार यांनी सांगितले पालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार तसेच  महापौर अश्विनी कमलेश निकम  व उपमहापौर अमर लुंड व प्रभागाचे  नवीन नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या संकल्पनेतून पूर्ण १३ नंबर पॅनल मधून स्वच्छता अभियान जनजागृती रॅली आज काढण्यात आलेली आहे. त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आणि स्थानिक नगरसेवक यांनी खूप जोमाने आणि उत्साहाने आज कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन नागरिकांमध्ये उत्सुकता चांगल्या प्रकारे त्यांनी जनजागृती करून नागरिकांना आवाहन केलेले आहे की आपला कचरा येणाऱ्या घंटागाडीमध्ये द्यायचा आहे, आपला वार्ड हा कचरामुक्त करायचा आहे आपलं शहर आपला वार्ड  स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनीच सहकार्य केले पाहिजे असेही एकनाथ पवार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘तू एक जादूगार आहेस’: ऐतिहासिक टप्पा पार केल्यानंतर शाहरुख खानची सुनील नरीन यांना भावनिक...

KKR स्टार सुनील नरेनसोबत शाहरुख खान. (फोटो क्रेडिट: एसआरकेची एक्स पोस्ट) नवी दिल्ली: कोलकाता नाईट रायडर्सचा सह-मालक शाहरुख खान याने सोशल मीडियावर...

“लोग क्या कहेंगे”: सामाजिक दबाव भारतीय मुलांना कसा आकार देतो

"लोग क्या कहेंगे" हे चिंतेसारखे वाटते, परंतु मुलांसाठी ते अनेकदा पाळत ठेवते. हे त्यांना शिकवते की कौटुंबिक प्रतिमा भावनिक प्रामाणिकपणापेक्षा अधिक महत्त्वाची असते. ते...

महाराष्ट्र जनगणना 2027: डेटा गोपनीय, घरोघरी पडताळणी अनिवार्य, अधिकारी म्हणतात

पुणे: 2027 च्या जनगणनेसाठी स्वयं-गणना शुक्रवारी राज्यभरात सुरू झाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अचूकता आणि गोपनीयतेची खात्री करून डेटा संरक्षण आणि...

मुंबई : खून आणि दंगल प्रकरणी 41 वर्षे पूर्ण झाली

मुंबई: 41 वर्षांनंतर सत्र न्यायालयाने शनिवारी मुंब्रा येथील मोहम्मद शेख या 58 वर्षीय व्यक्तीला जातीय दंगल आणि खून प्रकरणातून आरोपींचा हिंसाचाराशी संबंध...

नसरापूर बलात्कार-हत्येतील आरोपी यापूर्वी दोनवेळा लैंगिक गुन्ह्यातून निर्दोष सुटले आहेत

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात तीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणातील ६५ वर्षीय आरोपीने यापूर्वी दोनदा लैंगिक गुन्ह्याच्या आरोपांना...

error: Content is protected !!