Homeशहरमहाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा वर्धापन दिन उल्हासनगर महानगरपालिकेत उत्साहात साजरा

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा वर्धापन दिन उल्हासनगर महानगरपालिकेत उत्साहात साजरा

  • भारताची जनगणना २०२७अंतर्गत नागरिकांना स्व-गणनाकरण्याचे आयुक्त मनिषा आव्हाळे यांचे आवाहन

उल्हासनगर दि.१ : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा वर्धापन दिन शुक्रवारी  उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या माननीय महापौर श्रीम. अश्विनी कमलेश निकम यांच्या शुभहस्ते सकाळी ठीक ०९:१५ वाजता ध्वजवंदन संपन्न झाले.

शासकीय निर्णयानुसार, ध्वजवंदनापूर्वी ‘वंदे मातरम्’ गीताचे गायन करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना ‘राष्ट्रगीत’ व त्यानंतर ‘राज्यगीताचे’ वादन करण्यात आले. मुख्यालयातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे नातलग, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.या सोहळ्याचे औचित्य साधून महानगरपालिका आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी ‘भारताची जनगणना २०२७’ या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमाची घोषणा केली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व अधिकारी यांना प्रत्यक्ष ‘स्व-गणना’ (Self Enumeration) करणेचे प्रात्यक्षिक प्रोजेक्टरद्वारे दाखविण्यात आले.

आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, “जनगणना प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी शासनाने स्व-गणनेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी स्वतःहून आपली माहिती नोंदवून या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा.”जनगणना २०२७ ही भारताची १६ वी जनगणना आहे. तसेच संपूर्ण प्रक्रिया डिजीटल स्वरूपाची असून मोबाईल अॅपद्वारे CMMS पोर्टलवर दोन टप्यात करण्यात येणार आहे. स्वगणना व घरगणना https://sec.census.gov.in या वेबसाईटद्वारे करण्यात येणार आहे. उल्हासनगर शहरात लोकसंख्येची गणना ९५० प्रगणक व १५९ पर्यवेक्षक यांच्याद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी शहरात एकूण ०४ चार्ज कार्यालय व एकूण घरयादी गट ९५० इतके आहेत.

पहिला टप्पा (घरयादी व घरगणना): दि. ०१ मे ते १५ मे २०२६ या काळात नागरिकांना स्वगणनेची सोय https://sec.census.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करूण देण्यात येणार आहे. स्वगणना केलेल्या कुटुंबाची माहिती प्रगणकाच्या प्रगणकाच्या ‘HLO’ अॅपमध्ये नोंदवली जाईल. दि. १६ मे ते १४ जून २०२६ या काळात प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी जाऊन ३३ प्रश्नांद्वारे घराची स्थिती, कुटुंबाची माहिती, उपलब्ध सुविधा व मालमत्ता याविषयी माहिती संकलित करतील. यामध्ये घराचा प्रकार, रचना, भिंत, छप्पर, फरशीसाठी वापरलेले साहित्य, घरातील सदस्यांची संख्या, विवाहीत जोडप्यांची माहिती, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग, जेवण खाण्याची सवय, वाहन व इतर सुविधांची माहिती समाविष्ट असेल.

या सोहळ्याला महापौर श्रीम. अश्विनी कमलेश निकम, उपमहापौर अमर गोविंदराम लुंड, विरोधी पक्ष नेत्या श्रीम. अंजली चंद्रकांत साळवे, गटनेते अरुण लक्ष्मण आशान,. गटनेत्या श्रीम. सुरेखा सुरेश सोनवणे, ज्येष्ठ नगरसेवक जमनुदास खुबचंद पुरस्वानी, मिलींद (नाना) बागूल, दिलीप दशरथ गायकवाड श्रीम. शोभाताई दिनकर जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.तसेच महापालिका आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण, उपायुक्त डॉ. दिपाली चौगले, उपायुक्त श्रीम. विशाखा मोटघरे, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, सहा. आयुक्त (१) तथा जनसंपर्क अधिकारी अंजय साबळे, सहाय्यक आयुक्त श्रीम. सलोनी निवकर, श्रीम. अलका पवार, गणेश शिंपी,. विशाल कदम, सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनिष हिवरे, भांडार विभाग प्रमुख अंकूश कदम, मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहा. आयुक्त (१) तथा जनसंपर्क अधिकारी. अजय साबळे व शिक्षण विभागाचे साधन व्यक्ती/विषय तज्ञ भास्कर शिंदे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्राची गणना आजपासून सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

समाजसेवेत अग्रेसर असणारे समाजसेवक नितीन सपकाळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

उल्हासनगर दि .१ ( प्रमोद दळवी ) : समाजसेवेत सातत्याने अग्रेसर असणारे समाजसेवक नितीन सपकाळे यांचा वाढदिवस “समाजसेवक चषक” या उपक्रमाच्या निमित्ताने अत्यंत उत्साहात...

मुंबईत 1,745 कोटींचे कोकेन जप्त; अमित शहा यांनी निर्दयी कारवाईची शपथ घेतली

प्रातिनिधिक प्रतिमेसाठी वापरलेली प्रतिमा मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत 1,745 कोटी रुपये किमतीचे 349 किलो उच्च दर्जाचे कोकेन जप्त केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेलविरुद्ध...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

‘तुम्ही मजल्यावर असाल!’ फ्युरियस हेनरिक क्लासेन त्याच्या फॅमिलीचे चित्रपट बनवताना शांत होतो, कॅमेरात कैद...

हेनरिक क्लासेन (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) नवी दिल्ली: सनरायझर्स हैदराबादचा स्टार हेन्रिक क्लासेन त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चाहत्याने...

error: Content is protected !!