Homeशहरमहाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांच्या अध्यक्षतेखाली उल्हासनगर महानगरपालिकेत...

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांच्या अध्यक्षतेखाली उल्हासनगर महानगरपालिकेत आढावा बैठक संपन्न

  • उपाध्यक्षांनी स्वतःचे स्वागत नाकारत प्रथमच सफाई कामगारांचा केला शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
  • सफाई कामगारांच्या विविध मागण्यांवर आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा

उल्हासनगर दि २७ : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी  उल्हासनगर महानगरपालिका स्थायी समिती सभागृहात एक विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सामाजिक न्याय विभाग व नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार सफाई कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी महापालिकेत प्रभावीपणे होत आहे की नाही, याचा आढावा घेणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता.

या दौऱ्याचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, महापालिकेत आगमन झाल्यानंतर माननीय उपाध्यक्ष. मुकेश सारवान यांनी स्वतःचे स्वागत स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. त्याऐवजी, शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अहोरात्र मेहनत करणाऱ्या महापालिकेतील सफाई कामगारांचा (महिला व पुरुष) त्यांनी स्वतः शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. आयोगाच्या उपाध्यक्षांनी दाखवलेल्या या आदरामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण होते.यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनी उपाध्यक्ष. मुकेश सारवान यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पालिकेच्या वतीने अधिकृत स्वागत केले.

बैठकीतील मुख्य मुद्दे आणि चर्चाः

या आढावा बैठकीत विविध कामगार संघटनांचे अधिकारी, पदाधिकारी व सदस्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन उपाध्यक्षांना सादर केले. या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करुन तसा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. बैठकीत प्रामुख्याने खालील विषयांवर सविस्तर चर्चा झाली :

. वारसा हक्क प्रकरणेः वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांची सद्यस्थिती काय आहे आणि त्यावर आतापर्यंत काय कार्यवाही झाली, याचा आढावा घेण्यात आला.

२. मॅन्युअल स्कॅव्हेंजर्सना नुकसान भरपाईः दूषित गटारांमध्ये काम करताना मृत्यू पावलेल्या, कायमचे अपंगत्व आलेल्या किंवा तात्पुरते अपंगत्व आलेल्या सफाई कामगारांना/मॅन्युअल स्कॅव्हेंजर्सना नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा झाली.

३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनाः २५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा झालेल्या सफाई कामगारांना मालकी तत्त्वावर मोफत सदनिका देण्याच्या प्रकरणांची सद्यस्थिती तपासण्यात आली.

. पदांची माहितीः सफाई कामगारांची मंजूर पदे, प्रत्यक्षात भरलेली पदे आणि सध्या रिक्त असलेल्या पदांची सविस्तर माहिती मागवण्यात आली.

५. शासकीय योजनांची अंमलबजावणीः सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती घेऊन, त्यावर महापालिकेने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

मान्यवरांची उपस्थितीः

या प्रसंगी उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर सौ. अश्विनी कमलेश निकम यांनीही महाराष्ट्र राज्य सफाई आयोगाचे उपाध्यक्ष मुकेशजी सारवान यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.या महत्त्वपूर्ण बैठकीला स्थायी समिती सभापती कलवंतसिंह सोहता, शिक्षण समिती सभापती सौ. साक्षी संदीप सुर्वे, नगरसेवक दुर्गा राय, माजी नगरसेवक मनोज लासी उपस्थित होते. तसेच प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण, उप आयुक्त डॉ. दिपाली चौगले, मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखा परीक्षक श्रीम. सुषमा पाटील, सहायक आयुक्त विशाल कदम, आणि संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

नेमारने स्कॉटलंडविरुद्ध ऐतिहासिक पुनरागमन केल्यानंतर ब्राझीलच्या दुर्मिळ विश्वचषकात पेलेशी बरोबरी केली

मियामी गार्डन्स, फ्ला., बुधवार, 24 जून 2026 रोजी स्कॉटलंड आणि ब्राझील यांच्यातील विश्वचषक गट सी सॉकर सामन्यानंतर ब्राझीलचा नेमार (10) साजरा करत आहे....

मुंबई लोकलमध्ये हत्या: पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णाचा कसा माग काढला

मुंबई लोकल ट्रेनच्या दरवाजाच्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा आरोप मुंबई: मुसळधार पावसात रेल्वेचा दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादाने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

मालदीव, स्वित्झर्लंड किंवा बाली परवडत नाही? हे 6 बजेट-अनुकूल पर्याय वापरून पहा

आपल्या सर्वांनाच आपल्या स्वप्नातील गंतव्यस्थानी प्रवास करायचा आहे, परंतु काहीवेळा याचा अर्थ खिशात छिद्र पाडणे होय. मालदीव, स्वित्झर्लंड, दुबई आणि बाली सारखी ठिकाणे नेहमी...

error: Content is protected !!