अंबरनाथ दि ३१ : अंबरनाथ शहरातील मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांची मनसेच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ठाणे येथील सीकेपी हॉलमध्ये शनिवारी झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिर्के यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले.
काही आठवड्यांपूर्वी मनसेचे माजी शहराध्यक्ष कुणाल भोईर, माजी नगरसेवक संदीप लकडे, स्वप्नील बागुल आणि इतर काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. या घटनेमुळे स्थानिक मनसैनिकांमध्ये नाराजी पसरली होती. त्यावेळी शैलेश शिर्के यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांसमोर निषेध करत घोषणाबाजी केली होती.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, पक्षाला पुन्हा बळकटी देण्यासाठी शिर्के यांच्यावर शहराध्यक्षपदाची ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे अंबरनाथमध्ये मनसेला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली जात





























