Homeशहरभारतीय सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रम, त्याग व शौर्यचा सन्मान करण्यासाठी उल्हासनगर शिवसेना शहर...

भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रम, त्याग व शौर्यचा सन्मान करण्यासाठी उल्हासनगर शिवसेना शहर शाखेच्या वतीने तिरंगा बाईक रॅली

  • बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

( प्रमोद दळवी )

उल्हासनगर दि १९: पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी, शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि सीमेवर सेवा देणाऱ्या जवानांना पाठिंबा देण्यासाठी  तसेच  ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर उल्हासनगरात शिवसेनेच्या नेतृत्वात देशभक्ती, एकता आणि अभिमानाचा जल्लोष करण्याकरिता उल्हासनगर शिवसेना शहर शाखेच्या वतीने मोठी भव्य तिरंगा बाईक रॅली सोमवारी काढण्यात आली. ही तिरंगा बाईक रॅली उल्हासनगर -५  कैलाश कॉलनी येथून सुरू झाली. त्यानंतर ही रॅली पवई मार्गे, १७ सेक्शन,छत्रपती शिवाजी महाराज चौक , नेहरू चौक,सिरु चौक, १ – नं पोलीस स्टेशन मार्ग बिर्ला गेट निलकंटेश्वर मंदिर येथे समाप्त झाली.काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.

त्यावेळी महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी संगितले की काही दिवसापूर्वी पहलगाम येथे  आपल्या या भारतातील नागरिकांवर पाकिस्तान मधील अतिरेक्यांनी गोळीबार करून त्यांना ठार केले होते . त्याचा निषेध म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिल आणि त्या उत्तरामधून पाकिस्तान सळो की पळो झाला. पाकिस्तानची अवकात पाकिस्तानला कळाली आणि ते कळाल्या नंतर माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांनी जो काही हमला करुन पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर सर्व शहरांमध्ये शूरवीर जवानांसाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचं ध्येय वाढवण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही आज बाईक रॅली पूर्ण महाराष्ट्रभर काढण्यात आली.

उल्हासनगर मध्ये देखील हि तिरंगा बाईक रॅली कैलास कॉलनी चौक उल्हासनगर – ५  ते बिर्ला गेट निळकंठेश्वर मंदिर उल्हासनगर -१ पर्यंत काढण्यात आली .भारतीय जवानांचे  मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, व  भारत देशाकडे वाकडया नजरेने कोणी पाहिले तर  त्याची परिस्थिती अशी होईल हे दाखवणाऱ्या  आपल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानवर हमला करून आपल्या देशाचे रक्षण केले आणि आपला भारत देश काय आहे ते दाखवले. त्याबद्दल त्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी रॅली होती.असे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी म्हणाले .

त्यावेळी अरुण आशान यांनी देखील आपले मत व्यक्त केले .या तिरंगा बाईक रॅलीमध्ये  शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, दिलीप गायकवाड, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी ,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज), रमेश चव्हाण, उपशहर प्रमुख सुरेश सोनवणे, जितू उपाध्याय , संदिप गायकवाड ,ज्ञानेश्वर मरसाळे, कल्याण लोकसभा सचिव तिरुपती रेड्डी, युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर, महिला शहर संगठक सौ मनीषा भानुशाली, उत्तर भारतीय शहर संगठक के.डी. तिवारी, माजी नगरसेवक कलवंत सिंह सोहता, जयकुमार केणी,वासेना उपजिल्हाधिकारी युवराज पाटील, युवासेना शहर अधिकारी सुशील पवार, उपस्थिती लावली.तसेच यावेळी सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख,शिवसेना, युवा सेना, व महिला आघाडीचे पदाधिकारी ,ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने रैली मध्ये सहभागी झाले होते. ही रॅली एकतेचा आणि देशप्रेमाचा संदेश देणारी होती. शहीद जवानांच्या बलिदानाला मान देत आणि सध्या देशासाठी लढणाऱ्या जवानांना पाठिंबा देणारी ही रॅली प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेम जागवत गेली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘हे लग्न रद्द करा’: सिया गोयलचा दावा पालकांनी फेटाळला, म्हणा की ती केतन अग्रवालसोबत...

सिया गोयलच्या पालकांनी नकार दिला की ती तिचा मंगेतर, केतन अग्रवाल यांच्यावर नाखूष होती, पोलिसांच्या दाव्यांच्या विरोधात आहे. पुणे: सिया गोयलच्या पालकांनी गुरुवारी...

भारत अ विरुद्ध श्रीलंका एक अनौपचारिक कसोटी: ध्रुव जुरेल आणि शेख रशीद यांनी दुसऱ्या...

IND A वि SL A: भारत अ संघ गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंका अ विरुद्ध 333/4 वर कमांडिंग पोझिशनमध्ये पहिल्या अनधिकृत कसोटीचा दुसरा दिवस पुन्हा...

मुंबई लोकल हत्या: आरोपी रोशन सुवर्णा दारूच्या नशेत घरी आला, सहप्रवाशाची हत्या करून रडला

नुकत्याच झालेल्या मुंबईच्या ट्रेनमध्ये झालेल्या चाकूने आरोपीच्या कुटुंबाला धक्का बसला आहे, ज्यांचा दावा आहे की तो दारूच्या नशेत आणि अस्वस्थ होऊन घरी धडकला...

‘ती दोषी असेल तर तिला त्याच गडावरून फेकून द्या’; केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी...

व्यापारी केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयलची आई पूजा गोयल यांनी गुरुवारी आपल्या मुलीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पुणे: व्यापारी...

नोएडा विरुद्ध युरोप: ‘नोएडा युरोपपेक्षा चांगला आहे’: भारतीय प्रवाश्यांच्या वक्तव्यामुळे स्वीडन, जर्मनी आणि ऑस्ट्रियावर...

इंस्टाग्रामवर एका भारतीय प्रवाशाची युरोपियन ठिकाणांबद्दलची वैयक्तिक पोस्ट व्हायरल होत आहे. परंतु प्रवासी अनमोल रैना (@anmolraina13) च्या व्हिडिओने “नोएडा युरोपपेक्षा चांगले आहे”...

error: Content is protected !!