Homeमनोरंजन“ बाबा रे बाबा ” हा धम्माल कॉमेडी एपिसोड लवकरच आपल्या भेटीला

“ बाबा रे बाबा ” हा धम्माल कॉमेडी एपिसोड लवकरच आपल्या भेटीला

नाशिक दि. २९ (प्रमोद दळवी ) : एखाद्या रुग्णाला डॉक्टरांनी औषध दिले तर तो ते औषध घेण्यास तोंड वेडेवाकडे करत असतो. पण एखाद्या साधू महाराजांनी जर त्या रुग्णाला विभूती दिली तर तो त्यावर विश्वास ठेवून ती आपल्या अंगाला  फासत असतो. त्या विभूतीने आपला रोग पूर्ण बरा होईल अशी भोळी भाबडी अपेक्षा त्याला असते आणि तिथेच तो फसतो. आपली फसवणूक झाल्यावर जेव्हा त्याला कळतं तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात  येते. आणि आपण भोंदू बाबाच्या नादी लागून काय करून बसलो याचा त्याला पश्चाताप होतो. अशाच एका बाबाची कहाणी आपल्याला खळबळ या मराठी वेब सिरीज मध्ये पाहायला मिळणार आहे.

गावात आलेल्या या पावरफुल बाबाची चर्चा जेव्हा गावात सर्वत्र पसरते तेव्हा अनेक जण त्याच्या दर्शनासाठी जातात. आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी ते काय काय करतात. आणि हा बाबा महाराज त्यांच्याकडून काय काय करून घेतो. हे आपल्याला लवकरच “ बाबा रे बाबा “ या एपिसोड मध्ये पाहायला मिळणार आहे. खळबळ या मराठी वेब सिरीजच्या निर्मात्या / दिग्दर्शक रेखाताई मंजुळकर आहेत. त्यांनी या एपिसोडमध्ये बाबाची अफलातून भूमिका केली आहे. याशिवाय त्यांची डायलॉगबाजी देखील कॉमेडी आहे. बाबा रे बाबा या कथेची लेखिका आशा भोईर असून पूर्ण एपिसोड आपल्या कॅमेरात कैद करणारे प्रसिद्ध कॅमेरामन राजेश जाधव यांची उत्कृष्ट फोटोग्राफी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत हा एपिसोड कॉमेडी असला तरी या एपिसोड मधून एक वेगळा संदेश देण्याचे काम निर्मात्या / दिग्दर्शक रेखाताई मंजुळकर यांनी केले आहे. नुकताच नाशिक येथे बाबा रे बाबा या कॉमेडी एपिसोडचे चित्रीकरण पार पडले . पुंजा जाधव यांचे बहुमोलचे सहकार्य खळबळ टीमला लाभले आहे. बाबा रे बाबा या एपिसोड मध्ये स्वतः निर्मात्या / दिग्दर्शक रेखाताई मंजुळकर यांनी काम केले असून, लेखिका आशा भोईर यांनी देखील सेविकेची भूमिका केली आहे. यात सरपंचाची भूमिका ज्येष्ठ कलाकार राजेंद्र जाधव, यांनी उत्कृष्ट रित्या केली आहे. सरपंचाच्या पत्नीची भूमिका शितल दंडगव्हाळ, शेतकऱ्याची भूमिका नाना जाधव, गावातील खबरीची भूमिका प्रमोद दळवी, तर भक्ताची भूमिका स्नेहा  भगत या कलाकारांनी केली आहे. मेकअप मॅन म्हणून नाना जाधव यांनी काम पाहिले आहे. बाबा रे बाबा या धम्माल कॉमेडी एपिसोड ची एडिटिंग प्रसिद्ध कॅमेरा मॅन /एडिटर  पार्थ भगवान देवकर यांनी केली आहे. लवकरच बाबा रे बाबा ही कॉमेडी वेब सिरीजचा एपिसोड आपल्या भेटीसाठी येणार आहे. आर .एस. पी फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत व निर्मात्या / दिग्दर्शक रेखाताई मंजुळकर निर्मित खळबळ या मराठी वेब सिरीज मध्ये आपल्याला लवकरच हा धमाल कॉमेडी एपिसोड पाहायला मिळणार आहे. भोंदू बाबाच्या आहारी जाऊन त्यांच्या आमिषाला  बळी पडणाऱ्या नागरिकांचे डोळे उघडण्यासाठी त्यांना संदेश देण्याकरिता हा आगळावेगळा धम्माल कॉमेडी एपिसोड रेखाताई मंजुळकर हे प्रसारित करणार आहेत. तेव्हा प्रेक्षकांनी हा एपिसोड पाहिल्यावर त्याला लाईक करा , सबस्क्राईब करा,  आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा असे आव्हान रेखाताई मंजुळकर व आशा भोईर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रत्येक मुलाला आत्मविश्वास वाटण्यासाठी आणि समाविष्ट करण्यासाठी 10 वर्षापूर्वी या 4 सामाजिक कौशल्यांची आवश्यकता...

सामाजिक कौशल्ये अशी काही नाही जी लहान मूल आपोआप घेते. ही कौशल्ये मार्गदर्शन, दैनंदिन संवाद आणि निरीक्षणाद्वारे शिकली जातात. जशी मुले वाचायला, लिहायला किंवा...

पुरवठा घटल्याने टोमॅटोचे भाव ३० टक्क्यांनी वाढले

पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

पोर्तुगाल विरुद्ध उझबेकिस्तान, फिफा विश्वचषक सामन्याचा निकाल: रोनाल्डो 5-0 च्या वर्चस्वाने विजय मिळवून रेकॉर्डब्रेकर...

मंगळवार, 23 जून 2026 रोजी ह्युस्टन येथे पोर्तुगाल आणि उझबेकिस्तान यांच्यातील विश्वचषक गट के सॉकर सामन्यात रोनाल्डोने आपल्या संघाचा तिसरा गोल केल्यानंतर पोर्तुगालचा...

मंत्री लोढा यांनी ब्रिटिश राजाचे वर्णन ‘किंग कसाब’ असे केले.

मुंबई: किंग एडवर्ड मेमोरिअल (केईएम) रुग्णालयाचे नाव ज्यांच्या नावावर आहे त्या ब्रिटिश राजघराण्याचा निषेध करत महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा...

चुकीचा पासपोर्ट आणि तीन अयशस्वी प्रयत्न: अग्रवालची मंगेतर आणि तिचा जोडीदार लोहगड किल्ल्यावर खून...

पुणे : रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल आणि तिचा साथीदार, चेतन चौधरी यांनी लोहगड किल्ल्यावर त्याला ठार मारण्याचा...

error: Content is protected !!