Homeशहरबदलापूर मध्ये शिवसेनेच्या २५ वर्षाच्या सत्तेला भाजपाकडून सुरुंग : नगराध्यक्षपदी रुचिता घोरपडे...

बदलापूर मध्ये शिवसेनेच्या २५ वर्षाच्या सत्तेला भाजपाकडून सुरुंग : नगराध्यक्षपदी रुचिता घोरपडे विजयी

  • सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन बदलापूर शहराचा विकास करू – रुचिता घोरपडे

बदलापूर दि.२१ ( प्रमोद दळवी ) : बदलापूर नगरपरिषदेमध्ये गेल्या २५  वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती तर बदलापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. शिवसेनेचे वामन म्हात्रे यांची पत्नी विना म्हात्रे यांचा पराभव झाला आणि भाजपाच्या रुचिता घोरपडे या साडेसहा हजार मतांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. बदलापूर नगरपरिषदेमधील शिवसेनेचा पराभव हा एकनाथ शिंदे व यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा झटका ठरलेला आहे .कारण बदलापूर मध्ये शिवसेनेची २५ वर्ष सत्ता होती. मात्र आता जेव्हा तीन-चार वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडली त्यानंतर झालेली नगरपरिषदेची ही पहिली निवडणूक यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला.

विजयी झालेल्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी सांगितले. बदलापूरच्या जनतेला शांत आणि सुसंस्कृत असा उमेदवार हवा होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो माझ्या रुपेने त्यांना दिसला म्हणून त्यांनी माझा चेहरा एक्ससेप्ट केला. तसेच आमची प्रभागामध्ये झालेली विकास कामे ही जनतेने बघितली आहेत त्यामुळे जनतेला कुठेतरी मनात विश्वास होता की ही व्यक्ती कुठेतरी शहराचा विकास नक्कीच करू शकते. हा त्यांच्या मनात विश्वास आहे म्हणून सगळ्यांनी आपल्याला एक्ससेप्ट केले. आज राजेंद्र घोरपडे सरांची मेहनत आहे की मी नवीन असून सुद्धा मी प्रभागापूर्ती मर्यादित होती पूर्ण शहरांमध्ये मी सगळीकडे तर तेवढी पोहोचली नव्हती पण राजेंद्र घोरपडे साहेबांचं काम हे पूर्ण बदलापूर मध्ये बोललं आणि त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांना मी दिलेली साथ आहे ती सगळ्यांनी एक्सेप्ट केली. लोकांनी विकास कामाला महत्त्व दिलय मी एवढाच सांगेल कारण त्या लोकांना बदलापूरचा विकास हवा होता. राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले मी बदलापूर जनतेला  मनापासून धन्यवाद देतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि स्थानिक आमदार किसन कथोरे या तिघांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती बदलापुरात मुख्यमंत्र्यांच जे भाषण होतं ते या विकासाला धरूनच होतं की बदलापूर  हे चांगलं स्मार्ट सिटी बनू शकतो. त्याकरता येथे मेजॉरिटी आली पाहिजे. या ठिकाणी थेट नगराध्यक्ष आला पाहिजे कारण मी दिलेला जो पैसा आहे तो इकडे तिकडे न झरपता  तो थेट विकासाला  लागल्या गेल्या पाहिजे अशी धारणा सातत्याने मुख्यमंत्र्यांची होती. आणि त्यांनी जनतेला आव्हान सुद्धा केलं होतं आणि जनतेने ते आवाहन स्वीकारलं आणि या ठिकाणी मतदान केलं असे राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले .

कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी एकूण ५ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते.  प्रिया दिगंबर गवळी(उबाठा), रुचिता राजेंद्र घोरपडे(भाजप), चेंदवणकर संगिता मोहन चेंदवणकर(अपक्ष), मांजरेकर आस्था विजय मांजरेकर(आम आदमी पक्ष) आणि वीणा वामन म्हात्रे (शिवसेना शिंदे गट) हे उभे होते. मात्र मतदान प्रक्रियेनंतर झालेल्या मतमोजणीत भाजपच्या उमेदवार रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी तब्बल ६४,६०४ मते मिळवत नगराध्यक्ष पदावर दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते शहरात जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपच्या उमेदवार रुचिता राजेंद्र घोरपडे यांना ६४,६०४ मते मिळाली. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर ७,६३४ मतांच्या आघाडीने विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर दणदणीत यश संपादन केले आहे.

मतांनुसार खालीलप्रमाणे पक्षीय बलाबल
भारतीय जनता पक्ष-२३ जागा,
शिवसेना ( शिंदे गट)-२३ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)- ३ जागा,
विजयी उमेदवार (प्रभागानुसार):
प्रभाग क्र.१ अ गौरी बाबू (शिवसेना) ३१६५ मते
१ब- तुकाराम बारकू म्हात्रे (शिवसेना)- ३०६१ मते,
प्रभाग क्र.२अ- हेमांगी तेजस म्हस्कर(भाजप)- ७६५८ मते
२ब- मोहन अनंत चतुरे(भाजप)- ७२७० मते,
प्रभाग क्र.३अ रुचिता राजेंद्र घोरपडे( भाजप)४७९८मते
३ब- शरद सुभाष तेली(भाजप)-४४२९ मते
प्रभाग क्र.४अ- स्वप्ना श्रीधर (शिवसेना) २९५५ मते
४ब- श्रीधर दत्तात्रय पाटील (शिवसेना)- २५९६ मते
प्रभाग क्र.५अ- सुगंधा राजेश पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट)-३२६९ मते
५ब- हर्षाली संदीप गायकवाड (राष्ट्रवादी अजित पवार गट)-३३४७ मते,
प्रभाग क्र.६अ- प्रियंका आशिष दामले(राष्ट्रवादी अजित पवार गट)- ३२१९ मते
६ब- किरण शंकर भोईर (भाजप)- २८३९ मते,
प्रभाग क्र.७अ- रिद्धीता रवींद्र घोरपडे(भाजप)- २४९५ मते
७ब- राजेंद्र पंढरीनाथ घोरपडे (भाजप)- २१८३ मते
प्रभाग क्र.८अ- सोनिया भारत ढमढेरे(शिवसेना शिंदे गट)- २५७५ मते
८ब- तुषार त्रिंबक बेंबळकर(शिवसेना शिंदे गट)- २७६५ मते
प्रभाग क्र.९अ- उषा तुकाराम म्हात्रे (शिवसेना शिंदे गट)- २२०७ मते
९ब- संदेश भारत ढमढेरे (शिवसेना शिंदे गट)- २२२४ मते
प्रभाग क्र.१०अ- सुवर्णा सुनील भगत (शिवसेना शिंदे गट)- ४४५९ मते
१०ब- अकिब मसूद कोहारी (शिवसेना शिंदे गट)- ३६२३ मते
प्रभाग क्र.११अ प्रणिता प्रशांत कुलकर्णी (भाजप)- २२६४ मते
११ब- रेश्मा दीपक राठोड (शिवसेना शिंदे गट)- २२३३ मते,
प्रभाग क्र.१२अ- संध्या सुरज मुठे(भाजप) २७२० मते
१२ब- संजय अनंत गायकवाड (शिवसेना शिंदे गट)- २५९६ मते,
प्रभाग क्र.१३अ उज्वला उल्हास आंबवणे (शिवसेना शिंदे गट)- १७१४ मते
१३ब- चंद्रकांत विनायक कोंडीलकर ( शिवसेना शिंदे गट)- २०९४ मते,
प्रभाग क्र.१४अ- रती नंदकिशोर पातकर (भाजप)- १७८६ मते
१४ब- संभाजी ज्ञानोबा शिंदे(भाजप)- १४७० मते,
प्रभाग क्र.१५अ- भाविता हर्षल घोरपडे(भाजप)- ५३६१ मते
१५ब- हर्षदा उमेश पवार (भाजप)- ४२३८ मते
१५क- आदित्य नरहरी पाटील(भाजप)- ४८९९ मते,
प्रभाग क्र.१६अ- उर्मिला संभाजी शिंदे(भाजप)- १७४१ मते
१६ब- रोहन जनार्दन पाटील (शिवसेना शिंदे गट)- २७०९ मते
प्रभाग क्र.१७अ-दिपाली गणेश लांबतुरे (शिवसेना शिंदे गट)- १७३१ मते
१७ब- प्रदीप वसंत गिते(भाजप)- २२४७ मते,
प्रभाग क्र.१८अ- मोहन विजया राऊत( शिवसेना शिंदे गट)- २६३२ मते
१८ब- प्रफुल्ल मारुती मोरे (भाजप)- ३२३८ मते
प्रभाग क्र.१९अ- शितल प्रवीण (शिवसेना शिंदे गट) बिनविरोध विजयी
१९ब- वामन बारकू म्हात्रे (शिवसेना शिंदे गट)- १६१४ मते,
प्रभाग क्र.२०अ- ज्योती रामास्वामी डार्विन(भाजप)- २२८८ मते
२०ब- सौरव राजेंद्र लाड(भाजप)- २६५२ मते,
प्रभाग क्र.२१अ- दूर्वा गणेश राणे (शिवसेना शिंदे गट)- २३४१ मते
२१ब- शैलेश केसरीनाथ वडनेरे(भाजप)- २४७५ मते,
प्रभाग क्र.२२अ- हर्षदा रमेश सोळसे (भाजप)- २०७७ मते
२२ब- रमेश जनार्दन सोळसे(भाजप)- २१४७ मते,
प्रभाग क्र.२३अ- सलोनी घनश्याम गायकवाड(शिवसेना शिंदे गट)- ४४४३ मते
२३ब- अरुण तुकाराम सुरवळ(शिवसेना शिंदे गट)- ४६०८ मते,
प्रभाग क्र.२४अ- सविता मंगेश धुळे (शिवसेना शिंदे गट)- ४३२१ मते
२४ब- राजेंद्र भगवान धुळे (भाजप)- ४२७५ मते

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शितल राऊत यांना आधीच बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले होते.अर्ज मागे घेण्याच्या दरम्यान शेवटच्या दिवशी भाजप आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने शिंदेंच्या बदलापुरातील प्रभाग क्रमांक १९ अ मधून उमेदवार शितल प्रविण राऊत बिनविरोध निवडून आल्या आहेत.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वचषकातील सर्वात चर्चेत असलेला नवीन नियम मोडूनही जुड बेलिंगहॅमला का पाठवले नाही

ज्यूड बेलिंगहॅमने इंग्लंडच्या विश्वचषकाच्या ड्रॉ दरम्यान फिफाच्या नवीन नियमाबद्दल गोंधळ निर्माण केला/ प्रतिमा: एक्स इंग्लंडचा मिडफिल्डर ज्युड बेलिंगहॅम मंगळवारी घानाबरोबरच्या गोलशून्य बरोबरीच्या वेळी...

एफडीएने जेजे महानगर रक्तपेढीची तपासणी केली, चौकशीचे आदेश दिले

तक्रारीनंतर ही तपासणी करण्यात आली मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अनेक तक्रारींनंतर भायखळा येथील जेजे रुग्णालय संकुलात असलेल्या सरकारी जेजे महानगर...

प्रेयसीच्या इशाऱ्यावरून आरोपी चौधरीने लोहगड किल्ल्यावर रियाल्टरला ढकलून दिले.

पुणे : अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल हिच्यासोबत रचलेल्या योजनेनुसार 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन...

मुंबई पाऊस अपडेट: आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला, उड्डाणे आणि रेल्वे सेवांना फटका; प्रवाशांनी...

मान्सून अखेर कोरड्या मुंबईत दाखल झाला आणि कसा! अलीकडील अपडेटमध्ये, मुंबईतील पावसाच्या गोंधळामुळे प्रवास विस्कळीत झाला आहे आणि ऑरेंज अलर्ट सुरू झाला...

पत्नीवर चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी सफाई कामगारावर गुन्हा दाखल

पुणे : काही घरगुती वादातून मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरी 32 वर्षीय पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली खराडी पोलिसांनी एका सफाई कामगारावर गुन्हा...

विश्वचषकातील सर्वात चर्चेत असलेला नवीन नियम मोडूनही जुड बेलिंगहॅमला का पाठवले नाही

ज्यूड बेलिंगहॅमने इंग्लंडच्या विश्वचषकाच्या ड्रॉ दरम्यान फिफाच्या नवीन नियमाबद्दल गोंधळ निर्माण केला/ प्रतिमा: एक्स इंग्लंडचा मिडफिल्डर ज्युड बेलिंगहॅम मंगळवारी घानाबरोबरच्या गोलशून्य बरोबरीच्या वेळी...

एफडीएने जेजे महानगर रक्तपेढीची तपासणी केली, चौकशीचे आदेश दिले

तक्रारीनंतर ही तपासणी करण्यात आली मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अनेक तक्रारींनंतर भायखळा येथील जेजे रुग्णालय संकुलात असलेल्या सरकारी जेजे महानगर...

प्रेयसीच्या इशाऱ्यावरून आरोपी चौधरीने लोहगड किल्ल्यावर रियाल्टरला ढकलून दिले.

पुणे : अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल हिच्यासोबत रचलेल्या योजनेनुसार 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन...

मुंबई पाऊस अपडेट: आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला, उड्डाणे आणि रेल्वे सेवांना फटका; प्रवाशांनी...

मान्सून अखेर कोरड्या मुंबईत दाखल झाला आणि कसा! अलीकडील अपडेटमध्ये, मुंबईतील पावसाच्या गोंधळामुळे प्रवास विस्कळीत झाला आहे आणि ऑरेंज अलर्ट सुरू झाला...

पत्नीवर चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी सफाई कामगारावर गुन्हा दाखल

पुणे : काही घरगुती वादातून मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरी 32 वर्षीय पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली खराडी पोलिसांनी एका सफाई कामगारावर गुन्हा...

error: Content is protected !!