मुरबाड दि २६ : गेल्या आठवड्यात मुरबाड तालुक्यातील किसळ येथे राहणारे प्रदीप दत्तात्रय माळवे यांना झोपेत मण्यार हा विषारी साप चावल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत व कुटुंबातील कमवता व्यक्तीचा मृत्यू झाल्याने समाज बांधवांच्या वतीने माळवे कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली.
मुरबाड तालुक्यातील किसळ येथील प्रदीप दत्तात्रय माळवे यांचे मण्यार ह्या सर्पदंशाने निधन झाले होते, प्रकाश माळवे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी,व लहान मुलगा एवढाच परीवार असुन त्यांच्या लहान मुलाचे ऑपरेशन करावयाचे आहे.सामाजिक बांधिलकी म्हणून १७,५७० /- सर्व समाज बांधवांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार सर, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी संतोष खंडागळे, सुनील पडवळ,पोलीस पाटील जगन्नाथ पडवळ,विष्णू पवार यांच्या उपस्थितीत पत्नी व भाऊ यांच्याकडे उत्तरकार्य दिवशी आर्थिक मदत सुपूर्द केली .
कै.प्रदीप माळवे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असल्याचे शिवाय कुटुंबात कमवती व्यक्ती कोणीच राहिले नाही. पश्चात वयोवृद्ध वडील,पत्नी व लहान मुलगा एवढाच परिवार, शिवाय ह्या हालाखीच्या परिस्थितीत लहान मुलाचं ऑपरेशन या सर्व गोष्टीचा विचार करून सामाजिक बांधिलकी म्हणून व्हॉट्सॲप ग्रुपवर समाजातील वेगवेगळ्या लोकांना मदतीसाठी आवाहन केले होते. विविध समाजातील दशरथ(बाळू) पष्टे,प्रीती हरेश कदम, अरुण सोलसे,गजानन चौधरी,विजय थोरात,महेश तुकाराम पवार,युवराज पडवळ,मिलिंद(बबलू) मडके,रमेश कुर्ले,भावेन झुंजारराव,सुनील लक्ष्मण पडवळ,संतोष खापरे,क्रांती गायकवाड,भालचंद्र मिरकुटे,तानाजी थोरात,राजेंद्र शिंगोळे,भास्कर दाजी पवार,संतोष पांडुरंग खंडागळे दिगंबर शिंगोळे,सुनील सुरोशे,मनोज विभुते, केतन पवार, शंकर शिंदे व इतर दानशूर व्यक्तींनी माळवे कुटुंबाला आर्थिक मदत केले. विशेषतः मागील महिन्यात केळेवाडी येथील चार बैलांवर वीज पडलेल्या शेतकऱ्यांच्या बैल जोडीसाठी प्रकाश पवार सर, माजी जि प सदस्य संजय पवार व रघुनाथ खाकर सर यांच्या प्रयत्नाने काढलेली आर्थिक मदत यामध्ये राहिलेली शिल्लक रक्कम सहा हजार पाचशे वीस रुपये माळवे कुटुंबाला देण्यात आली.





























