Homeशहरपानखंडा येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर'

पानखंडा येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर’

ठाणे दि.२५ :  पानखंडा येथे ज्ञान गंगा एज्युकेशन ट्रस्ट संचलित ज्ञानगंगा कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.), ठाणे, व रोजा गार्डेनिया आरोग्य केंद्र, ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराच्या आयोजनापूर्वी आदल्या दिवशी दिनांक २२/१२/ २०२५ रोजी बी.एड. महाविद्यालयाच्या विद्यार्थी शिक्षकांनी पानखंडा गावातील पानखंडा व बामनोईपाडा या  संपूर्ण परिसरात मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचीपत्रके वाटून  जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (२३/१२/२०२५)प्रत्यक्ष आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा ससाणे मॅडम तसेच रोजा गार्डेनिया आरोग्य केंद्राच्या डॉ. सोनाली सरतापे व डॉ. भाविका पाटील या तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाने आरोग्य तपासणी शिबिराचे कार्य उत्तमरीत्या पार पडले.या शिबिराचा लाभ गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, लहान बालके तसेच वयोवृद्ध पुरुष व महिला यांनी घेतला. शिबिरादरम्यान विविध आजारांची तपासणी करून आवश्यक त्या वैद्यकीय सेवा व उपचार मोफत स्वरूपात देण्यात आले. या आरोग्य शिबिराचा लाभ सुमारे शंभर पेक्षा अधिक नागरिकांनी  घेतला.

या उपक्रमात बी.एड. महाविद्यालयाच्या विद्यार्थी शिक्षकांना  आभा कार्ड,महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना कार्ड काढून देण्याचे प्रशिक्षण  ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या प्रशिक्षकांनी केले. ज्यामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव प्राप्त झाला. हा उपक्रम सन्माननीय प्रा. बी. डी. पाटील व डॉ. अनिता पाटील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. या शिबिराच्या आयोजनात बी.एड. विभागाच्या प्राचार्या सविता उपासनी यांच्यासह संपर्क उपक्रम समन्वयक प्रतिभा कांबळी, IQAC समन्वयक रचना दास – ,इतर अध्यापक वर्ग सौ. सुरभी  सोना ,डॉ.  कविता कांबळे ,शिक्षकेतर कर्मचारी – श्री. पराग पडेलकर  , श्री. ज्ञानेश्वर ,श्री. प्रीतम शिर्के तसेच जनसंपर्क  अधिकारी प्रा. अनिल आठवले यांनी मोलाचे सहकार्य केले.

या शिबिरात डॉ. सोनाली सारतापे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. भाविका पाटील (वैद्यकीय अधिकारी), डॉ. महेश दिवटे (नेत्रतज्ज्ञ), डॉ. झिशान मन्सूरी (दंततज्ज्ञ) यांच्यासह एक्स-रे व रक्त तपासणी तंत्रज्ञांची तसेच परिचारिका सौ . कुसुम  ताई, व सौ. सुनंदा ताईं व आशा वर्कर या सर्वांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चेतनने पैसे दिले नाहीत, केतन परत आला नाही: लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा रक्षक 400 फूट...

लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा रक्षकाच्या (एल) खात्याने केतन अग्रवालच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या थंड घटनांवर प्रकाश टाकला आहे. पुणे: 18 जूनच्या सकाळी लोहगड किल्ल्यातील तिकीट...

मॅट हेन्रीने ३६ वर्षांची प्रतीक्षा संपवली, जसप्रीत बुमराहला संयुक्त क्र. आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत...

न्यूझीलंडचा मॅट हेन्री (बेन व्हिटली/पीए द्वारे एपी) मॅट हेन्री अधिकृतपणे जसप्रीत बुमराहच्या ICC पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर सामील झाला आहे. 24...

हवामान बदलामुळे 2030 पर्यंत भारतातील 90% अक्षय ऊर्जा पाइपलाइन धोक्यात येऊ शकते, असे अहवालात...

मुंबई/नवी दिल्ली: भारताच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला मोठ्या हवामान आव्हानाचा सामना करावा लागू शकतो, देशाच्या नियोजित नूतनीकरणक्षम उर्जा क्षमतेपैकी जवळपास 90% प्रकल्पांना...

दिवाळीच्या पार्टीत चेतनला भेटले, जवळीक वाढली, मग ‘स्क्रिप्टेड’ मंगेतराची हत्या: पोलिसांनी सिया गोयलचा लोहगडचा...

दिवाळीच्या पार्टीत उफाळून आलेली मैत्री कथितपणे प्राणघातक ठरली, ज्याचा पर्यवसान लोहगड किल्ल्यावरील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येमध्ये झाला. पुणे ग्रामीण पोलिसांचा दावा आहे...

युएन एजन्सीकडून 4 देशांमध्ये पेटंटसाठी आमंत्रण: 9 वर्षीय रितान्या कौशिकची विलक्षण कथा आणि तिच्या...

बहुतेक नऊ वर्षांची मुले शाळा, गृहपाठ आणि खेळण्यात दिवस घालवतात. पण रितन्य कौशिक बहुतेक मुलांप्रमाणे नाही. ज्या वयात अनेक मुलं अजूनही त्यांच्या...

error: Content is protected !!