Homeशहरदिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाला उल्हासनगरातून पाठिंबा; भर पावसात शिवाजी चौकात शांततामय धरणे आंदोलन

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाला उल्हासनगरातून पाठिंबा; भर पावसात शिवाजी चौकात शांततामय धरणे आंदोलन

उल्हासनगर दि. २० ( प्रमोद दळवी ) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक ३ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने भर पावसात शांततामय धरणे आंदोलन करण्यात आले. मुसळधार पावसाची पर्वा न करता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या आंदोलनाचे आयोजन प्रख्यात शास्त्रज्ञ व संशोधक सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तसेच विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते अभिजीत दिपके यांच्या पाठिंब्यासाठी करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान उपस्थितांनी शांततेच्या मार्गाने घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणावी, पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई करावी आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. देशभरात वाढत्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असून याबाबत जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी शिवाजी रगडे, बंडू देशमुख, भगवान भालेराव यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वक्त्यांनी लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा आवाज शासनापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली.

समाजसेवक शिवाजी रगडे यांनी सांगितले की, उल्हासनगरातील विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांनी दिल्ली पोलिसांकडून सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटविण्यात आल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. “हे कोणत्याही राजकीय पक्षाचे आंदोलन नसून विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे. पेपरफुटी ही राष्ट्रीय समस्या बनली असून लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर अन्याय होत आहे. मेहनत करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सरकारने आंदोलन दडपण्याऐवजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा,” असे समाजसेवक शिवाजी रगडे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, “आंदोलनाला अनेक दिवस उलटूनही सरकारकडून संवाद साधला गेला नाही. विद्यार्थी म्हणून आम्ही त्यांच्या संघर्षाशी जोडलेले आहोत. पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारने जबाबदारी निश्चित करून भविष्यात अशा घटना होणार नाहीत याची प्रभावी उपाययोजना करावी.”

आंदोलना दरम्यान  बंडू देशमुख यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. त्यांनी सांगितले की, “देशातील विद्यार्थ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. नीटसारख्या परीक्षांमध्ये पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. गरीब विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करून परीक्षा देतात, मात्र परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींमुळे त्यांच्या भविष्याशी खेळ केला जात आहे.” ते पुढे म्हणाले की, “शिक्षणाचे वाढते खाजगीकरण, सरकारी शाळा व महाविद्यालयांची होत असलेली उपेक्षा आणि वैद्यकीय शिक्षणातील वाढते व्यापारीकरण यामुळे सामान्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षण दूर जात आहे. सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची घटना निषेधार्ह असून सरकारने लोकशाही पद्धतीने संवाद साधला पाहिजे.” असे बंडू देशमुख म्हणाले.

मुसळधार पावसातही आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले. पावसाची पर्वा न करता नागरिक, विद्यार्थी, महिला आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ आंदोलनाचे लक्षवेधी वातावरण निर्माण झाले. विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त सहभागामुळे आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलनाच्या शेवटी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदेशीर उपाययोजना करण्याची तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आता तुम्ही संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशीप्रमाणेच केएल राहुललाही खराब करत आहात’: भारताच्या माजी...

केएल राहुल (इमेज क्रेडिट: बीसीसीआय) नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार क्रिस श्रीकांतने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेदरम्यान केएल राहुलला सहाव्या क्रमांकावर पाठवल्याबद्दल भारतीय...

बेस्ट अपघातात ठार झालेले 65 वर्षीय शेतकरी आपल्या मुलीला भेटण्यासाठी आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी...

मुंबई : मानखुर्द येथे सायन-पनवेल महामार्गावर सोमवारी बेस्टची बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर आदळल्याने दहा जण गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यू...

आंतरराष्ट्रीय अभ्यास कोविड उघड झाल्यानंतर पुरवठा साखळीतील अंतर स्थानिक उपाय देते | पुणे बातम्या

पुणे : कोविड साथीच्या रोगाने जग कसे असुरक्षित आहे हे दाखवून दिल्यानंतर महाद्वीपांमध्ये पसरलेल्या प्रयोगशाळा स्थानिक पातळीवर निदान आणि संशोधनासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे जैविक...

एलोन मस्कचे कोट: इलॉन मस्कचे दिवसाचे कोट: “तुम्ही चुकीचे आहात असा दृष्टीकोन घ्यावा. तुमचे...

आत्मविश्वासासह यशाची जोड पुरेशी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इलॉन मस्कचे प्रसिद्ध कोटेशन अगदी विरुद्ध आहे: "तुम्ही चुकीचे आहात असा दृष्टीकोन घ्यावा. तुमचे ध्येय कमी...

शिक्रापूर येथील गृहप्रकल्पातील चार एकर जमिनीचा लिलाव हायकोर्टाने रद्द केला; महारेरा वॉरंटच्या अंमलबजावणीतील त्रुटींसाठी...

पुणे : महारेराने 2021 मध्ये जारी केलेल्या रिकव्हरी वॉरंटच्या विरोधात शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील ऑरा सिटी गृहनिर्माण प्रकल्पाचा एक भाग असलेल्या 4.42...

error: Content is protected !!