Homeशहरज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वाय सी एम ओ यु व...

ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वाय सी एम ओ यु व बी.एड. दीक्षांत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

ठाणे दि. ११ : ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट संचालित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बी.एड., ठाणे येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) अध्ययन केंद्रामार्फत एम.ए. शिक्षण (MA-82 व MA-83) तसेच डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट (DSM) 2024–25 बॅचच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.

या समारंभासाठी डॉ. वामन नाखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मुंबई विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच डॉ. राजश्री जोशी या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्या सेवा सदन्स कॉलेज ऑफ एज्युकेशन, उल्हासनगर येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. कार्यक्रमास ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. डी. पाटील, पीआरओ प्रा. अनिल आठवले, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या श्रीमती सविता उपासनी तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन YCMOU अध्ययन केंद्राच्या समन्वयक सहाय्यक प्राध्यापिका प्रा. प्रतिभा कांबळी यांनी प्रभावीपणे केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, दीपप्रज्वलन आणि अध्ययन केंद्राचा संक्षिप्त परिचय यानंतर मान्यवरांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर MA-83 (2023–25) बॅचमधील तीन गुणवंत विद्यार्थ्यांना ‘Roll of Honor’ प्रदान करण्यात आला. तसेच DSM 2024–25 बॅचमधील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

प्रभारी प्राचार्या श्रीमती सविता उपासनी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे डॉ. वामन नाखले यांनी सातत्यपूर्ण शिक्षण, गुणवत्ता आणि व्यावसायिक प्रगती यांचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व सांगितले. दरम्यान, ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट संचालित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बी.एड., ठाणे येथे बी.एड. अभ्यासक्रमाच्या 2023–25 व 2024–26 या दोन वर्षीय बॅचच्या विद्यार्थी-शिक्षकांचा दीक्षांत पदवीदान समारंभ शनिवार, दि. 2 मे 2026 रोजी द्वितीय सत्रात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या समारंभासाठी डॉ. अश्विनी करवंदे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर डॉ. राजश्री जोशी या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. डी. पाटील, मानद प्राध्यापक अनिल आठवले, प्रभारी प्राचार्या श्रीमती सविता उपासनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रभारी प्राचार्या श्रीमती सविता उपासनी यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गुणवंत विद्यार्थी-शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्या डॉ. अश्विनी करवंदे यांनी शिक्षक व्यवसायातील गुणवत्ता, संशोधन वृत्ती आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विशेष अतिथी डॉ. राजश्री जोशी यांनी शिक्षक म्हणून समाज घडविण्यातील जबाबदारी विषद केली.

संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना सतत अध्ययन, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या पदवीदान समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, अभिमान आणि नव्या जबाबदाऱ्यांची जाणीव निर्माण झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्ययन केंद्राच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तसेच बी.एड. महाविद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे बारमध्ये आरपीआय (आठवले) नेत्याची भोसकून हत्या

RPI (A) नेते अनिल मारुती मोरे" decoding="async" fetchpriority="high"/>आरपीआय (ए) नेते अनिल मारुती मोरे पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या कामगार आघाडीचे...

आयपीएल 2026 | हार्दिक पांड्या केकेआरच्या लढतीत परतण्याची शक्यता आहे, मुंबई इंडियन्स संघातील सहकारी...

हार्दिक पंड्या (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) " decoding="async" fetchpriority="high"/>हार्दिक पांड्या (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) नवी दिल्ली : हार्दिक पांड्या कधी परतणार? त्याची दुखापत किती...

मध्य रेल्वेवर 1,300 हून अधिक दलालांना अटक, 43 लाख रुपयांची दारू जप्त

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते मुंबई: मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (RPF) 1300 हून अधिक...

महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआर व्यायामाचा टप्पा 3, अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली पुणे: 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन...

सारा अली खानचे घर एका कलाकाराचे निवासस्थान आहे: 5 कला प्रेरणा ज्या तुम्ही काढून...

सारा अली खान तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “पति पत्नी और वो दो” या चित्रपटाने सर्वांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे, तिच्या व्यक्तिमत्त्वाने जो उबदार,...

error: Content is protected !!