Homeशहरउल्हासनगर रेल्वे स्थानकातील ओवर ब्रिजवर सहा जणांच्या टोळीचा इसमावर प्राणघातक हल्ला

उल्हासनगर रेल्वे स्थानकातील ओवर ब्रिजवर सहा जणांच्या टोळीचा इसमावर प्राणघातक हल्ला

  • लुटमार करण्याच्या इराद्याने हल्ला केल्याची शक्यता
  • पोलिसांनी नशेखोर टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी

उल्हासनगर दि १४ ( प्रमोद दळवी ) : रेल्वे प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या सोयीसाठी उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ स्काय वॉक बनवण्यात आले आहे. या स्काय वॉकची देखभाल करण्यात येत नसल्याने हा स्काय वॉक आता नशेखोर , गांजाडी यांचा एक प्रकारे अड्डा बनला आहे. रात्री कामावरून घरी जाणाऱ्या इसमावर स्काय वॉक वर उभ्या असलेल्या सहा जणांच्या नशेखोर टोळीने त्या इसमाला लुटण्याच्या इराद्याने त्याला अडवून त्याच्यावर जीवघेणे हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तो इसन गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार  उल्हासनगरात  राहणारे  हरीओम दिवेदी  हे कामावरून रात्री साडेनऊच्या सुमारास उल्हासनगर रेल्वे स्थानकातील ओवर ब्रिजवरून ( स्काय वॉकवरून ) घरी जात होते. ते मोबाईलवर बोलत घरी चालले होते. त्यावेळी त्या ठिकाणी सहा जणांची नशेखोर टोळी उभी होती. त्यांनी हरीओम यांना पाहताच या ठिकाणाहून का चालला आहेस असे दम देत विचारले. हरिओम बोलले या ठिकाणाहून जाणं काय गुन्हा आहे का, असे बोलताच ते संतापले त्यांनी आपापसात बोलणे करत हरीओम यांच्याकडे आले. त्यावेळी हरीओम यांनी माझं घर इथेच आहे मी रोजच या ठिकाणाहून जातो असे सांगताच  त्यांनी लादी उचलून हरीओम यांच्या डोक्यात घातली. हरी ओम हे जखमी झाले त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होते. अशा जखमी अवस्थेत असताना देखील हरीओम यांनी  त्या ठिकाणाहून पळत असणाऱ्या सहा जणांपैकी एकाला पकडले.त्यावेळी त्या तरुणाने दोन जणांची नावे हरीओम यांना सांगितले आहेत. कदाचित या टोळीने मोबाईल लुटण्याच्या बहान्याने हरिओम यांना मारहाण केल्या असल्याचे ते सांगत आहेत. या घटनेमुळे उल्हासनगर रेल्वे स्थानकात भीतीचे वातावरण पसरले असून. या नशेखोर  टोळीचा पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.

या ओवर ब्रिज वरून जाताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले असते. या ठिकाणी रोज सायंकाळी आणि रात्री नशेखोर टोळी वावरत असते. या आधी देखील या ओवर ब्रिजवर अनेक प्रकारच्या लूटमारीच्या आणि मारहाणीच्या घटना झाल्या आहेत. या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा पोलीस गस्त नसल्याने असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. उल्हासनगर रेल्वे स्थानकाचा हा ओव्हर ब्रिज नशेखोर टोळीचा अड्डा बनला आहे . वेळीच पोलिसांनी या ठिकाणी या नशेखोर टोळीचा बंदोबस्त केला नाही तर आणखीन अनुचित प्रकाराच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हरीओम यांनी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार केले असून पोलिसांनी या नशेखोर  टोळीचा शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

2,004 कॉल, 238 तास आणि 1 अंतिम ‘सिग्नल’: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर केतन अग्रवालच्या...

पुणे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे की रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूमागील कथित षडयंत्र अनेक महिन्यांच्या गुप्त संवाद, अनेक बैठका आणि त्यांना...

19 चौकार, 6 षटकार! वैभव सूर्यवंशीचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी याने धडाकेबाज शतक ठोकले

वैभव सूर्यवंशी आणि त्यांचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी नवी दिल्ली : क्रिकेट हे सूर्यवंशी कुटुंबात चालत असल्याचे दिसते. सराव सामन्यात शतक झळकावल्यानंतर काही...

‘बंद ठेवण्यास सांगितल्यावर अपमानास्पद वाटले’: मुंबई लोकलमध्ये दरवाज्यावरील रांग कशी झाली जीवघेणी; प्रवाशाच्या पोटात...

आरोपी रोशन सुवर्णा (एल) मुंबई : मंगळवारी रात्री चर्चगेट-नालासोपारा ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादातून मुसळधार पावसात घरी परतणाऱ्या 21...

सिया गोयलचा दुसरा प्रयत्न: लोहगड हत्येपूर्वी केतन अग्रवालचा पासपोर्ट फाडला, महिलांच्या वॉशरूममध्ये टाकला

चेतन चौधरी (एल), सिया गोयल (सी), केतन अग्रवाल (आर) पुणे: रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात टाकून दिलेला पासपोर्ट, हजारो फोन कॉल्स आणि कथित...

प्राचीन देवी आणि त्यांच्या शक्तिशाली अर्थांनी प्रेरित 10 सुंदर लहान मुलींची नावे

प्राचीन देवींनी प्रेरित केलेली नावे केवळ सौंदर्यापेक्षा अधिक देतात. त्यांच्यात धैर्य, शहाणपण, लवचिकता, करुणा आणि नेतृत्वाच्या कथा आहेत. ही नावे शतकानुशतके टिकून आहेत कारण...

error: Content is protected !!