Homeशहरउल्हासनगरात महापौर आपल्या भेटीला या उपक्रमाला सुरुवात : पहिल्याच उपक्रमात पॅनल...

उल्हासनगरात महापौर आपल्या भेटीला या उपक्रमाला सुरुवात : पहिल्याच उपक्रमात पॅनल क्रमांक – १ मधून १४ तक्रारी

उल्हासनगर दि. ७ ( प्रमोद दळवी )  : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या महापौर आपल्या भेटीला या उपक्रमाला उल्हासनगरातील पॅनल क्रमांक एक मधून सुरुवात करण्यात आली आहे, पहिल्याच उपक्रमात जवळपास १४  नागरिकांनी आपल्या विविध समस्या महापौरांकडे मांडल्या.

उल्हासनगर शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांच्या थेट समस्या ऐकण्यासाठी महापौर आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची प्रत्यक्ष पॅनल क्रमांक -१ मधून सुरुवात करण्यात आली आहे. महापौर आश्विनी निकम यांनी पॅनल क्रमांक -१  मध्ये गुरुवारी जाऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. या पहिल्याच उपक्रमात एकूण १४ नागरिकांनी आपल्या विविध समस्या महापौरांकडे मांडल्या त्यामध्ये शहर विकास आराखड्यानुसार रस्त्याचे रुंदीकरण, परिसरातील अस्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांची संबंधित प्रश्नांचा समावेश होता.

महत्त्वाचे म्हणजे या भेटीदरम्यान महापालिकेचे संबंधित अधिकारी  देखील उपस्थित असल्याने तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापौर आश्विनी निकम यांनी दिले. त्यामुळे नागरिकांच्या समस्या जलद गतीने मार्गी लागतील असा विश्वास आज व्यक्त करण्यात आला. यावेळी पॅनल क्रमांक एकचे नगरसेवक दिलीप गायकवाड, पूजा भोईर महापालिकेचे अधिकारी तसे शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .दरम्यान महापौर आपल्या भेटीला हा उपक्रम दर सोमवार आणि गुरुवारी राबवण्यात येणार असून  नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर त्वरित तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा उपक्रम खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शीतल तेली-उगले यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

पुणे: राज्य सरकारने गुरुवारी शीतल तेली-उगले, 2009 बॅचच्या IAS अधिकारी, यांची पुणे विभागाच्या नवीन विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केली, त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, IAS,...

सुभाष टेकडीत शासकीय दाखले शिबिर संपन्न: नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद

 उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : समाजसेवक महेंद्र अहिरे ( माही ) यांच्यावतीने उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४  परिसरातील सुभाष टेकडी येथे नागरिकांसाठी...

पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग : महिलेसह तिच्या कुटुंबावर जीव घेणे हल्ला : महिलेचे...

उल्हासनगर दि. १५ (  प्रमोद दळवी ) : मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा  राग मनात धरून सात जणांच्या टोळीने बेकायदेशीर जमाव जमवून एका महिलेससह...

‘मला घरी पाठवले. हा संताप आहे!’: शार्दुल ठाकूरने PBKS प्लेऑफच्या आशा चिरडून 2016 पंजाब...

शार्दुल ठाकूर" decoding="async" fetchpriority="high"/> प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सने गुरुवारी धरमशाला येथे झालेल्या त्यांच्या IPL 2026 सामन्यात पंजाब किंग्जचा सहा गडी...

मुंबई हॉरर: अल्पवयीन मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बिहारमधील व्यक्तीला अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते मुंबई : पश्चिम उपनगरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक...

error: Content is protected !!