Homeशहरउल्हासनगरात स्वराज्य संघटनेच्या वतीने महापुरुष संयुक्त जयंतीनिमित्त भव्य व्याख्यानमाला संपन्न

उल्हासनगरात स्वराज्य संघटनेच्या वतीने महापुरुष संयुक्त जयंतीनिमित्त भव्य व्याख्यानमाला संपन्न

  • मान्यवरांना भीमरत्न व भीमयोद्धा पुरस्कार २०२५ ने गौरव

उल्हासनगर  दि १९ : सुभाष टेकडी येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमाला उत्साहात पार पडली. नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विचारमंथनाची पर्वणी घडली.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीची सखोल आणि वैचारिक मांडणी करत अनेक नव्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. अभ्यासक किरण सोनवणे यांनी “दहशतवादावर एकमेव उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर प्रभावी भाषण करून आंबेडकरांचा या विषयावरील दृष्टिकोन उलगडून सांगितला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. गोपाल भगत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ धम्म अभ्यासक शिलाताई जाधव, लताताई पडघाण, आणि शुभांगीताई चव्हाण उपस्थित होत्या. कार्यक्रमात १)  कु. स्मित रवि नागदिवे – IIT मध्ये शिक्षण घेऊन वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरल्याबद्दल भीमरत्न पुरस्कार २०२५. २)  नानासाहेब बागुल, अरुण काकळीस, महेंद्र उबाळे, शशी सावंत – डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा सुभाष टेकडी येथे उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल भीमयोद्धा पुरस्कार २०२५. ३)  जयराम बागुल आणि  काळकथीत आनंदा निकम – १९८९ मध्ये सुभाष टेकडीवरील पहिल्या पुतळ्याच्या स्थापनेतील मोलाचे नेतृत्व केल्याबद्दल भीमयोद्धा पुरस्कार २०२५. ४)  ॲड. गोपाल भगत, ॲड. अमित कटारनवरे, महेंद्र ऊर्फ अण्णा पंडित – अनुसूचित जाती-जमातीच्या ढ्यान्‌पिढ्या वंचित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केल्याबद्दल भीमयोद्धा पुरस्कार २०२५. ५). उत्तम कांबळे व किरण सोनवणे – व्याख्यानांद्वारे महाराष्ट्रात संविधानवादी आणि शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा प्रचार केल्याबद्दल भीमयोद्धा पुरस्कार २०२५. या  मान्यवरांना भीमरत्न व भीमयोद्धा पुरस्कार २०२५ ने गौरवण्यात आले:

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. सचिन खंडागळे यांनी केले.स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी या प्रसंगी सांगितले की, “समाजाला बौद्धिक खाद्य देण्याचे आणि विचारांची मशागत करण्याचे कार्य संघटना सातत्याने करत राहील.”

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल आढाव, ॲड. राहुल बनकर, ॲड. रुपेश उबाळे, ॲड. सुधीर पंडित, ॲड. निलेश धिवरे, मयूर पगारे, छगन पवार, अविनाश उबाळे, सुशील सोनवणे, सुमेध तांबे, वाल्मीक सोनवणे, अक्षय कांबळे, ॲड. नागसेन ब्रह्मराक्षस, सिद्धार्थ मोरे, तुषार मिरपगार, राहुल गच्छे आणि अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबई विरुद्ध नवी मुंबई: तुमचे ₹2 कोटींचे घर कोठे विकत मिळते? |

मुंबई विरुद्ध नवी मुंबई हा आजकाल घर खरेदीदारांसमोरील सर्वात मोठा गोंधळ आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मधील अनेकांसाठी ₹2 कोटी हे बजेट...

नसरापूर येथील मुलीवर (३) बलात्कार करून खून केल्याप्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले;...

29 जून रोजी शिक्षा सुनावल्यानंतर निकालाचा संपूर्ण मजकूर जाहीर होण्याची अपेक्षा आहे पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन...

India Vs बांग्लादेश: महिला T20 विश्वचषक: शफाली वर्माने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी बांगलादेशला...

शफाली वर्मा (फोटो क्रेडिट: बीसीसीआय) नवी दिल्ली: ओल्ड ट्रॅफर्ड येथे गुरुवारी बांगलादेशवर पाच गडी राखून विजय मिळवून भारताने महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील...

मुंबई उच्च न्यायालयाने पालघरमधील वाढवण बंदर प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी खारफुटी साफ करण्यास परवानगी दिली...

आगामी बंदराला NH-48 ला जोडणारा आठ-लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग बांधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला 208 खारफुटीची झाडे तोडण्याची परवानगी दिली. मुंबई...

‘त्याला सांगितले की मला लग्न करायचे नाही’: सिया गोयलचा दावा केतन अग्रवालने सगाई संपवण्यास...

तपासात असे दिसून आले आहे की गोयल (आर) यांनी ही योजना आखली होती, चौधरी (एल) यांनी कथितरित्या केतन (एम) यांना मारण्यासाठी घातक पुश...

error: Content is protected !!