Homeशहरउल्हासनगरात मुलीच्या प्रेम संबंधाला विरोध करत आईने घोटला मुलीचा गळा: हत्याप्रकरणी आई...

उल्हासनगरात मुलीच्या प्रेम संबंधाला विरोध करत आईने घोटला मुलीचा गळा: हत्याप्रकरणी आई अटकेत

उल्हासनगर दि २७ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरात आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या १९ वर्षीय मुलीच्या प्रेमसंबंधांना विरोध करत एका आईने रागाच्या भरात तिचाच स्कार्फने गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प नं –  २, भैय्यासाहेब आंबेडकर नगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून तिच्याविरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव अमृता गरड (वय १९) असे असून ती आपल्या आई आणि कुटुंबीयांसोबत भैय्यासाहेब आंबेडकर नगर परिसरात राहत होती. अमृताचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती तिची आई आशा गरड (वय ४०) हिला मिळाली होती. या कारणावरून आई-मुलीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.रविवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास प्रेमसंबंधांच्या मुद्द्यावरून दोघींमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यवसान अत्यंत भीषण स्वरूपात झाले. रागाच्या भरात आशा गरड हिने मुलगी अमृता हिचा स्कार्फने गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

सोमवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अमृताचा मृतदेह विच्छेदनासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीदरम्यान हत्येचे धक्कादायक कारण समोर आले. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आई आशा गरड हिला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी सांगितले की, अमृता गरड हिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून आई-मुलीमध्ये वाद होत होते. रविवारी मध्यरात्री झालेल्या भांडणादरम्यान रागाच्या भरात आशा गरड हिने स्कार्फने मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली. आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे उल्हासनगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आईनेच आपल्या मुलीचा जीव घेतल्याच्या घटनेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

परीक्षा केंद्रातील फेरफार व्हिडिओ व्हायरल झाल्याची तक्रार महाराष्ट्र सीईटी सेलने केली आहे मुंबई बातम्या

मुंबई : अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील तफावत आणि परीक्षा केंद्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप करणारे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर सीईटी...

रुग्णाच्या नातेवाईकांकडून ससून जनरल हॉस्पिटलमधील वैद्यकीय व्यावसायिकावर शुल्क | पुणे बातम्या

पुणे : ससून जनरल हॉस्पिटलमधील 26 वर्षीय वैद्यकीय व्यावसायिकाने घोरपडी येथील एका रुग्णाच्या 30 वर्षीय नातेवाईकाविरुद्ध तक्रार दाखल केली असून, रविवारी सकाळी...

कॉमनवेल्थ गेम्स : बिंद्याराणी देवीने कांस्यपदक जिंकले; भारताने ग्लासगो येथे वेटलिफ्टिंगमध्ये पाचवे पदक जिंकले...

सोमवारी, 27 जुलै 2026 रोजी ग्लासगो, स्कॉटलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची देवी बिंदयाराणी सोरोखिबाम महिला वेटलिफ्टिंगच्या 58 किलोग्रॅम प्रकारात स्पर्धा करते. (एपी...

सारनाथ हे आता भारताचे ४५ वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे पण जेव्हा एखाद्या...

सारनाथ आता भारताच्या ४५व्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये आहे भारतासाठी ही एक अभिमानाची बातमी आहे, किंबहुना खूप छान! 2,500 वर्षांहून अधिक काळ, यात्रेकरूंनी...

उल्हासनगर ४ व ५ मधील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अंबरनाथ दि. २७ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील उल्हासनगर क्रमांक ४ व ५ परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित...

error: Content is protected !!