उल्हासनगर दि.७ : सर्टिफाईड शाळेच्या शेजारी नवीन पाण्याच्या टाकी लगत असलेल्या ए ब्लॉक ३१३ ते ३१४ समोरील विकास आराखडय़ातील रस्त्याच्या शेवटी असलेल्या मोकळ्या जागेत माता रमाबाई आंबेडकर अभ्यासिका व वाचनालयाचे उद्घाटन जनहितार्थ करण्यात आले.

“विद्येचे मंदिर बनविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी केलेली मेहनत व इच्छा हे वाखाणण्याजोगे असून, आज देशाला अशाच वाचनालय व अभ्यासिकांची गरज असून जिथे संविधान व लोकशाहीचे मुल्य जोपासली जातील आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अश्याच पद्धतीने पुढे नेता येईल व ते काम महिला वर्गचं योग्यरीत्या करू शकतात व या जनहितार्थ कार्यासाठी साठी भोयर दांपत्याचे अनेक आभार ” असे वक्तव्य यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुबोध गोंडाणे यांनी केले.

हजारों शाळेचे विद्यार्थी या रस्त्याने येणे जाणे करीत असून, त्यांना व विक्रमशिला सह परिसरातील महिला व नागरिकांसाठी हे वाचनालय उघडण्यात येणार असून, या शांत परिसरात विद्यार्थी आपल्या ज्ञानार्जनासाठी अभ्यासिकेचा यथेच्छ वापर करून आपला भविष्य उज्वल करू शकतात, असे मत समाजसेवक वामदेव भोयार यांनी यावेळी व्यक्त केले. वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी सुनंदा भोयार, वंदना इंगळे, लता बाळे, लता रुपवते, जयश्री सपकाळ, उषा भगत, नारायण भगत, माया भगत, भीमराव भगत, शोभा तोडकर आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.




























