Homeशहरउल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या या मागणीसाठी हस्तक्षर अभियान

उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या या मागणीसाठी हस्तक्षर अभियान

उल्हासनगर दि ८ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर – ३ परिसरात शासकीय मध्यवर्ती रुग्णालय आहे. या रुग्णालयात विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या या मागणीसाठी हस्तक्षर अभियान शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. या अभियानाला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

उल्हासनगर – ३ येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालय हे सर्व आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज असे चारशे खाटांचे सुपर स्पेश्यालिटी रुग्णालय मंजूर करणे, ग्रामीण भागातून रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी धर्मशाळेची ईमारत बांधणे, सदर रुग्णालय असलेल्या  आरोग्यसंस्थेचे श्रेणीवर्धन करणे, सदर रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान उपलब्ध करून देणे संबंधी मागणी करण्यासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालय बाहेर हस्ताक्षर अभियान आयोजित करण्यात आले होते.ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधील  कॅम्प – ३ येथील या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, टोकावडे, गोवेली, शहापूर, अंबरनाथ,  बदलापूर या ग्रामीण भागातील तसेच कल्याण व उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण मोठया प्रमाणात रुग्णसेवेसाठी येत असतात. विशेषतः उल्हासनगर क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता येणाऱ्या रुग्णांना योग्यरीत्या आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात सर्व आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज असणे आवश्यक आहे. या मागणीसाठी शुक्रवारी हस्ताक्षर अभियान आयोजित करण्यात आले,

इंडियन्स सोशल मुव्हमेंट, महामाया असंगठित कामगार संघटना, अपंग आधार सेवा संस्था, अंबेडकरी बटालियन, सोहम फाउंडेशन व इंटरनेशनल मानव अधिकार संघटना या अभियानात सामिल होत्या. सदर हस्ताक्षर अभियानात शेकडो रुग्णासमवेत मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरनी सुद्धा सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलेच्या हत्येप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर 5 दिवसांनी महाराष्ट्रातील तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला

पुणे - एका युवतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी गुरुवारी रात्री थेरगाव येथील गणराज कॉलनी येथे एका १९ वर्षीय...

कृणाल पांड्याची मुलाखत: ‘देशासाठी खेळण्यापेक्षा मोठे काहीही नाही’ – RCB स्टारने भारताचे स्वप्न पूर्ण...

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कृणाल पांड्या (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) बेंगळुरू: सुमारे 15 वर्षांपूर्वी, गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील पालेज या छोट्याशा गावात मॅटिंग विकेटवर, एका दुबळ्या...

सोहराब ‘बनावट चकमक’ प्रकरणात 21 पोलिस आणि नागरिकांची निर्दोष मुक्तता मुंबई उच्च न्यायालयाने कायम...

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेशातील २१ पोलीस अधिकारी आणि २००५ च्या सोहराबुद्दीन शेख 'बनावट चकमक' प्रकरणातून एका...

नांदेडमध्ये 4,796 धारदार शस्त्रे जप्त, महाराष्ट्रातील एका दिवसातील सर्वात मोठा शस्त्रसाठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : नांदेड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री सुमारे 24 तास चाललेल्या छाप्यात तलवारी, खंजीर, गुप्ती आणि चाकू यासह 4,796 धारदार शस्त्रे जप्त केली.पोलिसांनी...

पश्चिम बंगालचे मतदान, लग्नाचा हंगाम यामुळे पुण्यातील रेस्टॉरंट्स, उद्योगांमध्ये कामगारांची गर्दी

पुणे: पश्चिम बंगाल आणि उत्तर भारतीय राज्यांमधून मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार त्यांच्या गावी परतल्यामुळे शहरातील रेस्टॉरंट्स आणि विविध उद्योगांना मोठ्या प्रमाणात मजुरांच्या तुटवड्याचा सामना...

error: Content is protected !!