Homeशहरउपचारादरम्यान रुग्ण दगावल्याने उल्हासनगरातील सेंटर हॉस्पिटलमध्ये तोडफोड : डॉक्टरांचे काम बंद आंदोलन...

उपचारादरम्यान रुग्ण दगावल्याने उल्हासनगरातील सेंटर हॉस्पिटलमध्ये तोडफोड : डॉक्टरांचे काम बंद आंदोलन : महापौरांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

उल्हासनगर दि. ७ ( प्रमोद दळवी ) :उल्हासनगरातील  सेंट्रल हॉस्पिटलमध्ये बुधवारी मध्यरात्री रुग्णाच्या मृत्यूनंतर संताप्त नातेवाईकांनी ड्युटीवरील डॉक्टरांना धक्काबुक्की व शिवीगाळ करत रुग्णालयात तोडफोड केल्याचे घटना घडली आहे . या घटनेमुळे रुग्णालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार भगवान निंबोरे नावाच्या इसमाला बुधवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास उपचारासाठी रुग्णाला दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना पहाटे एक वाजण्याचा सुमाराचे रुग्णाचा मृत्यू झाला. या  मृत्यूची  माहिती मिळतच काही संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत तोडफोड सुरू केली. त्यावेळी हॉस्पिटल मधील डॉक्टरांना धक्काबुक्की ढेखील करण्यात आली. रुग्णालयाच्या  काचा फोडण्यात आल्या तसेच विविध बैद्यकीय उपकरणे आणि साहित्याचे नुकसान करण्यात आले. घटना नंतर रुग्णालय प्रशासनाने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत कामधंदा आंदोलन करण्यात आले होते.

रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या संबंधिततांवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडून करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी कमलेश निकम, महापालिकेचे आरोग्य सभापती सौ सविता तोरणे – रगडे, समाजसेवक शिवाजी रगडे यांनी रुग्णालयात धाव घेतली, त्यावेळी सेंट्रल हॉस्पिटलमध्ये सेंट्रल पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना सांगितले की तोडफोड करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर रुग्णाला प्रशासनाने काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले. सेंट्रल रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या मयत रुग्णाच्या संबंधित नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

याबाबत सेंट्रल हॉस्पिटलचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर विठ्ठलराव बनसोडे यांनी सांगितले पेशंट आमच्याकडे रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास आणण्यात आला होता. पेशंट अतिशय सिरीयस होता. या पेशंटच्या संदर्भात महापौर अश्विनी निकम यांनी मला फोन पण केला होता मेसेज पण केला होता या पेशंट संदर्भात करायचं काय त्यावेळी माझी त्यांच्याबरोबर चर्चा झाली. डॉक्टर बरोबर चर्चा झाली. पेशंट सिरीयस होता. अशा पेशंटला आम्ही पुढे पण पाठवू शकत नव्हतो. कारण तो अर्ध्या वाटप मृत्यू पावला असता.आम्ही उपचार करत असताना सदर रुग्ण एक दीडच्या सुमारास मरण पावला. जर रुग्ण  मरण पावला तर त्याचा दुःख हे डॉक्टरांना खूप होत असतं, नातेवाईकांना होतच पण त्याच्या दुःखामध्ये आम्ही सुद्धा सहभागी असतो. ही घटना व्हायला नाही पाहिजे. परंतु सदर रुग्णाची लिव्हर किडनी आणि ब्रेन सर्व गोष्टी डॅमेज झालेल्या होत्या अशा पेशंटचा आमच्याकडे उपचार अगदी शेवटच्या टोकापर्यंत करत होतो. या रुग्णाच्या कंडिशन बाबत महापौर मॅडम यांना देखील सांगितले होते. महापौर मॅडम यांनी देखील सांगितलं तुमच्या पद्धतीने जसं करता येईल तसं करा. पण उपचार सुरू असतानाच मध्यरात्री पेशंट दगावला. एक तासानंतर आम्ही पेशंटला मृत घोषित केले

डेट डिक्लेअर केल्यानंतर नातेवाईकांचा पारा चढला त्यांचा राग अनावर होऊन जवळपास पंधरा ते वीस लोकांनी डॉक्टर व  सिस्टर वर मारहाण करण्यास सुरुवात केली. रुग्णालयाच्या काचा फोडल्या ,खुर्च्या फेकल्या, काउंटरच्या काचाही फोडल्या मॉनिटरची पण तोडफोड केली नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड बरीच केली. हा सर्व प्रकार घडत असताना आम्ही पोलिसांना त्वरित फोन केला त्यावेळी १०  ते १५  पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली त्यांना सुद्धा हा जमाव ऐकत नव्हता. अशी घटना रात्री घडलेली आहे असे डॉ मनावर बनसोडे यांनी सांगितले. अशा घटना एकच दिवस नाही ३६५  दिवसांमधून जवळपास ३०० दिवस रोज या घटनांना डॉक्टरांना सामोरे जावे लागते. रोज एक तरी कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात येते. याशिवाय शिवीगाळ देखील करण्यात येते. एक ना एक तरी पेशंटचा नातेवाईक असा प्रकार घडून आणत असतो. तरीदेखील डॉक्टर सहन करत असतात आम्ही मजबुरी म्हणून येथे नोकरी करतो का असा त्याचा अर्थ होतो असे देखील डॉ मनावर बनसोडे यांनी सांगितले.

याबाबत महापौर अश्विनी निकम यांनी सांगितले कालची रात्रीची घटना घडली ती उल्हासनगरसाठी खूप निंदनीय आहे. संबंधित तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे मी प्रशासनाला आश्वासन दिलेले आहे. जे घडले ते कार्यकर्ते म्हणता येणार नाही, मी एक उल्हासनगरची महापौर आहे मला प्रत्येक नागरिकाचा फोन येईल तर मी त्यांच्यासाठी नेहमी उभी असेल. पण नंतर जर अशी काही घटना घडली तर त्याच्यासाठी मी समर्थन कधीच देणार नाही. पोलीस प्रशासनाला इथे बोलण्यात आलेला आहे ज्यांनी ही घटना घडवली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर पोलीस देखील ती कारवाई करतील. मी डॉक्टरांना रिक्वेस्ट केली आहे आंदोलन मागे घ्या त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे असे महापौर अश्विनी निकम यांनी सांगितले .

रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी यासाठी रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळण्यात यावा. रुग्णालयात शस्त्रधारी एक तरी पोलीस नेमण्यात यावा. रुग्णालयात सिक्युरिटी व मॅन पॉवर देखील कमी आहे. रोज घडणाऱ्या घटनेमुळे डॉक्टरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. असे देखील डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी सांगितले.  सेंट्रल हॉस्पिटल मधील तोडफोड प्रकरणी सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

टरबूज खाल्ल्यानंतर मुंबईतील कुटुंबातील मृत्यूंमध्ये जिवाणू संसर्ग आढळला नाही

मुंबई: मुंबईस्थित सरकारी रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालात असे म्हटले आहे की अलीकडेच कथित टरबूज खाल्ल्यानंतर मरण पावलेल्या कुटुंबातील चार...

पुरंदर विमानतळ रस्ता जोडणीसाठी निधी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मंजूर : PMRDA

पुणे: PMRDA अधिकाऱ्यांनी बुधवारी TOI ला सांगितले की पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 636.84 कोटी रुपयांच्या रस्ते जोडणी प्रकल्पासाठी निधी मागील...

‘विराट कोहलीकडे पहा’: संजय मांजरेकर यांनी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांच्या फिटनेस मानकांवर प्रश्न...

विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा (एएनआय/एपी फोटो) नवी दिल्ली: भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीची तंदुरुस्ती संस्कृती आणि रोहित...

कर्मचाऱ्याला नवीन नोकरीवर रुजू झाल्यानंतर फक्त 1 आठवड्यानंतर काढून टाकण्यात आले – सर्व काही...

कधीकधी वास्तविक जीवन काल्पनिकापेक्षा अनोळखी असते आणि सोशल मीडियावर व्यावसायिकाने शेअर केलेली अशीच एक घटना लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकतेच एका...

बंदुकीसह पकडलेल्या डिलिव्हरी मॅनकडून 8 पिस्तुले जप्त करण्यात आली

पुणे : पिंपरी येथे 29 एप्रिल रोजी बंदुकासह डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याने पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आणखी आठ देशी बनावटीची पिस्तुले आणि...

error: Content is protected !!