आसनगाव दि .२६ : कल्याण कसारा मार्गावरील मोठे स्थानक म्हणून आसनगाव स्थानकाकडे पाहिले जाते. या स्थानकातून दिवसाला ५० हजारापेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करतात. नव्यानेच १५ ऑगस्ट २०२५ रोजी आसनगाव येथे पोलिस ठाणे सुरू करण्यात आले आहे. यात ५८ पोलीस अधिकारी , कर्मचारी आणि ४० होमगार्ड कार्यरत आहेत. टिटवाळा ते कसारा अशी एकूण ९ रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची सुरक्षा करण्यात येत आहे. आसनगाव हे शहापूर तालुक्यातील एकमेव असे स्थानक आहे की, या स्थानकातून शहापूर तालुक्यातील ४० ते ५० गावातील,खेड्यापाड्यातील नागरीक येथूनच प्रवास करतात.

प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान चांगली सुरक्षा मिळावी या साठी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून मागील आठ वर्षांपासून पोलिस स्टेशन सुरू करावे यासाठी पाठपुरावा सुरू होता, अखेर १५ ऑगस्ट २०२५ रोजी उद्घघाटन करण्यात आले आहे.
आज कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री राजेश घनघाव यांच्या हस्ते आसनगाव स्थानकात पोलीस मदत केंद्राचे उद्घघाटन करण्यात आले, सोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक.सचिन मोरे, प्रवाशी संघटनेचे कसारा स्थानक प्रतिनिधी युवराज पंडित , सहा पोलिस निरीक्षक सौ.भगत,पोलीस, हेड कॉन्स्टेबल चव्हाण,कॉन्स्टेबल.शेवाळे, शिंदे ,.शहारे,.रावते , चव्हाण आणि मोठ्या प्रमाणात प्रवाशी उपस्थित होते. सदरचे मदत केंद्र मधल्या ब्रीज जवळ सुरू करण्यात आले आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांनी पोलिस कक्षाचा लाभ घ्यावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन मोरे यांनी केले आहे





























