Homeशहरअति उष्णतेमुळे उल्हासनगरात बोअरवेल जवळील पाण्याने भरलेल्या सिंटेक्स टाकीचा स्फोट होऊन दोन...

अति उष्णतेमुळे उल्हासनगरात बोअरवेल जवळील पाण्याने भरलेल्या सिंटेक्स टाकीचा स्फोट होऊन दोन तुकडे

 उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी ): सध्या अति उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पडत असलेल्या कडक उन्हामुळे रस्त्यावर देखील सुखसुकाट पायाला मिळत आहे. या अति उष्णता मुळे उल्हासनगरातील कॅम्प  नंबर -४  परिसरातील दहाचाळ नालंदा शाळेजवळ उल्हासनगर महानगरपालिकेने बसलेल्या बोअरवेल जवळील पाण्याने भरलेल्या भल्या मोठ्या सिंटेक्स टाकीचा उष्णतेमुळे स्फोट होऊन दोन तुकडे झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी घडला. यावरून उष्णतेचा पारा अधिकच वाढला असल्याचे बोलले जात आहे.

उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर – ४  येतील सुभाष टेकडी जवळील दहाचाळ नालंदा शाळेजवळ उल्हासनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत नागरिकांच्या पाण्याच्या सोयीसाठी त्या ठिकाणी बोअरवेल बसवण्यात आली आहे. त्या ठिकाणी लोखंडी स्टैंड वर भली मोठी सिंटेक्स टाकी देखील ठेवण्यात आली होती. बोअरवेलचा पाणी त्या टाकीत जात असल्यामुळे नागरिक त्या टाकीद्वारेच इतर कामासाठी ते पाणी वापरतात. सध्या पडत असलेल्या अति उष्णतेमुळे पाण्याने भरलेली ती टाकी खूपच गरम होत होती. सोमवारी सकाळी पाण्याने भरलेल्या त्या टाकीचा स्फोट होऊन दोन तुकडे झाले. टाकी तुटून खाली पडल्याने त्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. ॲड प्रशांत चंदनशिव यांनी या घटनेबाबत पाणीपुरवठा अभियंता हरीश मिरकुटे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. टाकीचा ब्लास्ट होऊन टाकीचे दोन तुकडे झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्याच्या  भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्या ठिकाणी त्वरित नवीन टाकी बसवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी  व ॲड प्रशांत चंदनशिव यांनी केली आहे. अभियंता हरेश मिरकुटे यांनी दोन-चार दिवसातच नवीन टाकी त्या ठिकाणी बसून बसवण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे चंदनशिव यांनी सांगितले. दुसरीकडे अति उष्णतेमुळे झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये थोडी भीती देखील निर्माण झाली आहे. सध्या अति उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारच्या सुमारास घराबाहेर पडू नका असे आव्हान देखील करण्यात येत आहेत. तेव्हा आता या अति उष्णतामुळे रस्त्यावरील पाण्याच्या सिंटेक्सच्या टाक्याला देखील धोका निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबई आणि पुण्यात पाणी साचल्याने सुप्रिया यांनी भाजपवर निशाणा साधला

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ताथवडे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत...

इक्वेडोर विरुद्ध जर्मनी फिफा विश्वचषक 2026 मॅच हायलाइट्स: इक्वाडोर 2-1 जर्मनी; लवचिक इक्वाडोरने आळशी...

इक्वाडोर वि जर्मनी लाइव्ह स्कोअर: टीम न्यूज: जर्मनीसाठी मोठ्या तोफा परतल्या; Caicedo इक्वेडोर आघाडीवर आहेअधिकृत लाइनअप संपले आहेत आणि दोन्ही व्यवस्थापक आज रात्री कोणतेही...

एअरबॅग तैनातीमुळे मुंबईजवळ पार्क केलेल्या कारमध्ये 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला

स्टीयरिंग व्हील एअरबॅग केसिंग कथितपणे पीडितेला उच्च तीव्रतेने आदळले, ज्यामुळे गंभीर जखमा झाल्या आणि स्थिर वाहनाच्या आत प्राणघातक रक्तस्त्राव झाला मुंबई: मीरा रोड...

पीएमपीएमएल मान्सूनसाठी सज्ज नाही? 2 दिवसांच्या पावसामुळे 264 बस बिघडल्या

एफसी रोडवर नुकतीच तुटलेली पीएमपीएमएल बस क्रेनने ओढली आहे पुणे : पुण्यातील दोन दिवसांच्या मध्यम पावसाने पीएमपीएमएलच्या मान्सूनच्या तयारीचा अभाव उघड केला कारण...

मुंबई विरुद्ध नवी मुंबई: तुमचे ₹2 कोटींचे घर कोठे विकत मिळते? |

मुंबई विरुद्ध नवी मुंबई हा आजकाल घर खरेदीदारांसमोरील सर्वात मोठा गोंधळ आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मधील अनेकांसाठी ₹2 कोटी हे बजेट...

error: Content is protected !!