अंबरनाथ दि. ५ : अंबरनाथ शहरातील शेतकी सहकारी सोसायटी येथे १५ एकर ते ६० एकर जागा ही उद्याना करिता राखीव आरक्षित आहे. त्या ठिकाणी ॲग्रो सिटी पार्क व्हावे याकरिता ती जागा नगरपालिकेस विकसित करण्यासाठी देण्यात यावी अशी विनंती पूर्व मागणी अंबरनाथचे मा. नगराध्यक्ष सुनील वामन चौधरी यांनी निवेदनाद्वारे सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी, सचिव यांच्याकडे केली आहे.
अंबरनाथ शहरामध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यांमुळे मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. अंबरनाथ शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शूटिंग रेंज सारखे राष्ट्रीय व राज्यस्तरीय मोठे प्रकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहेत. त्यांच्या पुढाकाराने शिव मंदिर परिसराचा कायापलट होतोय. नाट्यगृह तसेच अनेक भव्य मोठे मोठे शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा ,वैद्यकीय, उद्याने, मैदाने अशी विकास कामे वेगाने होत आहेत.
अंबरनाथ मधील शेतकी सहकारी सोसायटी येथील १५ एकर ते ६० एकर जागाही उद्यानाकरिता राखीव आरक्षित असून आपल्या शहरात आपल्या नावे ॲग्रो सिटी पार्क “ व्हावे असे आमचे प्रयत्न आहेत. आशा भव्य उद्यान सिटी पार्क करिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे भरपूर प्रमाणात निधी देण्याकरिता अग्रेसर आहेत. शेतकी सहकारी सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संमती दिली तर अंबरनाथ शहराचं नाव दर्जा उंचावण्यामध्ये आपलाही शेतकी सहकारी सोसायटीचा मोठा सहभाग राहील. तरी आपण यासाठी सहकार्य करून ॲग्रो सिटी पार्कला ना हरकत संमती, प्रकल्प करण्याकरिता सहमती द्यावी व सहकार्य करावे अशी मागणी सुनील चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.





























