अंबरनाथ दि. २ ( प्रमोद दळवी ): अंबरनाथ नगरपालिकेच्या घरपट्टी विभागाने शहरातील मालमत्ता कर धारकांकडून ९९.५४ पैकी ८२.६० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे. त्यामुळे विक्रमी कर वसुली करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपनगराध्यक्ष सदाशिव (मामा )पाटील यांनी सन्मान केला.

नगरपालिकने पुन्हा एकदा सलग चौथ्यांदा वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करून शहराच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. विक्रमी कर वसुली करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सदाशिव (मामा ) पाटील, नगरसेवक सचिन पाटील व नगरसेविका पूनम शेलार यांनी सन्मान करत त्यांचे अभिनंदन केले. घरपट्टी विभागातील कर अधिकारी नरेंद्र संखे, प्रतिक्षा सावंत, कर निरीक्षक प्रशांत राणे, नवनीत देवरे यांनी संपूर्ण शहरांमधील विविध ठिकाणी वसुली कॅम्प , घारोघरी जाऊन वसुली टीम तसेच जप्तीपूर्व नोटीस तसेच जप्तीचे पत्र बजावून वर्ष अखेर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या तिजोरीत भरघोस वाढ झालेली आहे. कर विभागातील सर्व कर्मचारी व महिला कर्मचारी यांच्या सहकार्याने ही वसुली झालेली आहे. याकरिता अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, नगरसेवक सचिन पाटील नगरसेविका पूनम शेलार आदींनी घरपट्टी विभागातील कर अधिकारी नरेंद्र संखे, प्रतीक्षा सावंत, कर निरीक्षक प्रशांत राणे, नवनीत देवरे यांच्यासह सर्व कर्मचारी व महिला कर्मचारी यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यावेळी कर अधिकारी नरेंद्र संखे, यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

याबाबत उपनगराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील यांनी सांगितले सर्वात जास्त करवसुली ११३ कोटी मधून ८२ कोटी ६० लाख रुपये कर वसुली करण्यात आली आहे. ती कर वसुली होण्यामागचं कारण म्हणजे अधिकारी व कर्मचारी यांनी कुठलीही विकली ऑफ न घेता खास करून महिला वर्ग यांनी कर वसुलीसाठी जास्त वेळ दिल्याबद्दल त्यांचं सदाशिव (मामा) पाटील यांनी मनःपूर्वक आभार प्रकट केले. आम्ही छोट्या खाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कर विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. सर्वात जास्त कर वसुली करणारा अंबरनाथ नगरपरिषद मधल्या या कर विभागाला कौतुकाची थाप देण्यासाठी हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असे उपनगराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटीलयांनी सांगितले .






























