अंबरनाथ दि.१५ : पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या चौथ्या वर्धापन सोहळा २०२५ नुकताच अंबरनाथ येथील अंबर रोटरीभवन येथे गुरूपुत्र गुरूवर्य श्री.ऊमेश महाराज शेडंगे तसेच गुरूवर्य श्री.ह.भ पं . रघुनाथ दादा मोरे वै.हनुमंत बाबा मोरे वारकरी सांप्रदाय प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यात गेली पंधरा वर्षे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम कारणाऱ्या सध्या कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला संघटक सौ आरती रविंद्र भोईर यांचा राज्यस्तरीय समजरत्न पुरस्कारं अंबरनाथ म.न.पा.नगरसेवक मा.श्री.तुळशीराम चौधरी यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला.
महिला वर्गाचे अनेक प्रकारच्या समस्या सोडविणे, महिलांना न्याय मिळवून देणे, गरजूंना मदत मिळवून देणे, सरकारी योजनाचा लाभ मिळवून देणे अशा विविध प्रकारची कामे करत असतांना त्यांनी केलेल्या कामाची दखल मुख्य संपादक शैलेश साणस यांनी घेऊन आपल्या पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केले.यावेळी सन्मानचिन्ह सन्मानपत्र,शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या १५ व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.





























