उल्हासनगर दि .१ ( प्रमोद दळवी ) : समाजसेवेत सातत्याने अग्रेसर असणारे समाजसेवक नितीन सपकाळे यांचा वाढदिवस “समाजसेवक चषक” या उपक्रमाच्या निमित्ताने अत्यंत उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.या प्रसंगी गटनेता व नगरसेवक अरुण भाऊ आशान यांनी उपस्थित राहून नितीन सपकाळे यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या समाजकार्यातील योगदानाचे कौतुक केले.

या आनंददायी क्षणाला अधिक रंगत आणण्यासाठी वरिष्ठ नगरसेवक दिलीप गायकवाड, नगरसेविका सौ. संगिता नितीन सपकाळे, सौ. इंदिरा निखिल पाटील, विभागप्रमुख संदीप सुर्वे, उपशहर प्रमुख शिवसेना सुरेश सोनवणे, समाजसेवक निखिल पाटील, निलेश बोबडे, समाजसेविका सौ. रेश्मा नवले बोबडे तसेच अनेक शिवसैनिक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी नितीन सपकाळे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या .समाजासाठी सतत झटणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणारे असे उपक्रम निश्चितच समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे ठरतात.





























