Homeशहरसमाजप्रबोधनाचा वारसा जपणारे अभिनेते महेश्वर तेटांबे यांना 'महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार २०२६' देऊन...

समाजप्रबोधनाचा वारसा जपणारे अभिनेते महेश्वर तेटांबे यांना ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित

मुंबई दि.३० ( प्रमोद दळवी )  : आपल्या प्रभावी अभिनयातून, सामाजिक आशयपूर्ण लेखणीतून आणि निरपेक्ष समाजसेवेतून समाजप्रबोधनाचा वारसा जपणारे प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते, लेखक व दिग्दर्शक महेश्वर भिकाजी तेटांबे यांना शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे प्रदान करण्यात येणारा अत्यंत मानाचा ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.

मुंबई मराठी ग्रंथालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात दिमाखदार वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते गणेश यादव आणि मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते तेटांबे यांना सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तेटांबे यांच्या कला आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

लालबाग-परेलसारख्या कामगार वस्त्यांतील जनसामान्यांच्या समस्या, संघर्ष आणि सामाजिक वास्तव आपल्या सशक्त लेखणीतून तसेच प्रभावी अभिनयातून समाजासमोर मांडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून महेश्वर तेटांबे यांची विशेष ओळख आहे. एकांकिका, व्यावसायिक व प्रायोगिक नाटके, दूरदर्शन मालिका, लघुपट, वेबसिरीज आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून त्यांनी अभिनय, लेखन आणि दिग्दर्शनाचा ठसा उमटविला आहे. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून सामाजिक जाणीव जागृत करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला असून, त्यांच्या कलाकृतींना रसिकांसह समीक्षकांचीही मोठी दाद मिळाली आहे. विशेष म्हणजे, खाजगी नोकरीची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतानाच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे निरपेक्ष भावनेने समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. शिक्षण, सामाजिक जनजागृती, सांस्कृतिक चळवळी आणि सेवाभावी कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, कला आणि समाजसेवेचा सुंदर संगम त्यांनी आपल्या कार्यातून घडवून आणला आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत यापूर्वीही त्यांना ‘जागृत नागरिक’, ‘जागृत पत्रकार’, ‘आदर्श नागरिक’, ‘कलारत्न’, ‘समाजमित्र’ यांसह ३२० हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता या मानाच्या ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार २०२६’ मुळे त्यांच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून कला, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सोहळ्यास ज्येष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक डॉ. सुकृत खांडेकर, विधानमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील भार्गवराम शिर्के यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर, साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी महेश्वर तेटांबे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मेरा भारत ठाणे व नशाबंदी मंडळातर्फे ‘नशा मुक्त युवा, विकसित भारतासाठी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

ठाणे दि. ३१  : भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा विभागांतर्गत मेरा भारत ठाणे आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या प्रसारक...

महापौर अश्विनी निकम यांचा पॅनल क्रमांक १५ मध्ये पाहणी दौरा; ३० सेक्शन रस्त्याचे काम...

उल्हासनगर दि. ३१ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील प्रभाग (पॅनल) क्रमांक १५ मधील विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी महापौर अश्विनी निकम यांनी...

डेंग्यू प्रतिबंध महिन्यानिमित्त संघवी हिल्स ठाणे येथे जनजागृती व आरोग्य उपक्रम उत्साहात संपन्न

ठाणे दि. ३१ : डेंग्यू प्रतिबंध महिन्यानिमित्त आनंदनगर आरोग्य केंद्रांतर्गत संघवी हिल्स येथे व्यापक आरोग्य जनजागृती व डास नियंत्रण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या...

उल्हासनगर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वितरणात विलंब; विजय कदम यांचे प्रशासनाला...

उल्हासनगर दि.३१ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश व आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले नसल्याने...

माता आणि आजी-आजोबांचे मतदार तपशील मॅपिंगसाठी वैध: राज्य मतदान कार्यालय | पुणे बातम्या

SIR साठी कोंढव्यात BLO कॅम्प पुणे : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या उच्च प्रतिनिधींनी म्हटले आहे की 2002 च्या SIR मधील माता आणि आजी-आजोबा...

error: Content is protected !!