Homeशहरसद्गुरु दौलत बाबा यांनी परिसरात अध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली- ज्येष्ठ समाजसेवक...

सद्गुरु दौलत बाबा यांनी परिसरात अध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली- ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार हिंदू रत्न डॉ. रवींद्र भोळे महाराज

पुणे दि २७ : श्री क्षेत्र शिंदेवाडी: श्रीनाथ संप्रदायातील सद्गुरु दौलत बाबा यांनी पंचक्रोशी मध्ये अध्यात्मिक कार्य केले. अष्टांग योगातील समाधी अवस्थेपर्यंत पोहोचून त्यांनी संजीवन समाधी घेतली. पूर्वीच्या या दुर्गम भागामध्ये त्यांनी अध्यात्मिक पावित्र्य निर्माण करून परिसर चैतन्यमय केला. श्रीनाथ संप्रदाय सद्गुरु दौलत बाबा मठ भविष्यामध्ये भक्तांना साधनेचे ऊर्जा स्तोत्र ठरेल , सद्गुरु नाथपंथीय दौलत बाबा यांनी पंचक्रोशीत अध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली असे मत ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार हिंदू रत्न ह भ प डॉ. रवींद्र भोळे उरुळी कांचन यांनी येथे व्यक्त केले.नाथ संप्रदाय सदगुरू दौलतबाबा (मठ) किर्तन भव्य सभामंडप उद्घाटन सोहळा कार्यक्रमाचे येथे आयोजन करण्यात आले होते.

ह. भ. प. श्री नंदकुमार किसनराव गोते यांनी स्व. किसनराव गेनबा गोते यांच्या स्मरणार्थ २५ लाख रुपयांचा श्री. नाथ संप्रदाय सदगुरू दौलतबाबा (मठ) यांच्या चरणी भव्य सभामंडप अर्पण केला त्याचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .याप्रसंगी डॉ.रवींद्र भोळे महाराज पुढे म्हणाले की अठराव्या अध्याय मध्ये भगवंतांनी यज्ञ ,दान, तप ,कर्म करणे कलियुगामध्ये महत्त्वाचे असल्याचे अर्जुनाला सांगितले. त्यानुसार भगवंतांचे स्मरण करून व ते गीतेतील तत्त्वज्ञान प्रत्यक्ष कृतीत आणून दानशूर ह भ प नंदकुमार गोते महाराज यांनी आज दान, धर्म करून या परिसरामध्ये नवीन अध्यायाला सुरुवात केली ,खऱ्या अर्थाने त्यांनी आपले जीवन कृतज्ञ करून सर्व ऋणातून ते मुक्त झाले खरोखर ते धन्य असे मत व्यक्त केले. सोहळ्यासाठी मुसळधार पाऊस चालू असताना मुंबई,पुणे जिल्ह्यातून हवेली, दौंड, शिरूर, पुरंदर, खेड, भोर या तालुक्यातून मोठया संख्येने भाविक भक्त उपस्थित राहिले. श्रीमती रंजनाताई किसनराव गोते आणि श्रीमती पार्वतीबाई चंद्रकांत जगताप यांच्या शुभहस्ते सभामंडपाचा उद्धाटन सोहळा पार पडला.

या सोहळ्यासाठी यशवंत सहकारी साखर कारखानाचे चेअरमन श्री सुभाष चंद्रकांत जगताप,उद्योजक श्री प्रकाशराव गोते, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री संतोष कांचन, श्री रमेशराव गोते, जेष्ठ समाजसेवक ह.भ.प. श्री डॉ. रवींद्र महाराज भोळे , दौंड बाजार समितीचे सभापती श्री मारुती मगर, नानाश्री आणि स्वागत फर्निचरचे श्री प्रवीणशेठ कदम, फुलगावचे सरपंच श्री अशोक वागसकर, फुलगावचे उपसरपंच श्री भानुदास साकोरे, खेड पंचायत समितीचे सभापती श्री अरुणशेठ चौधरी, श्री.खंडू शिवले, श्री बजरंग होळकर, श्री. मुकुंदराव फडके, ह.भ.प. श्री गणेश महाराज फरातळे, श्री शहाजी गोते, श्री अनिल गोते, ह.भ.प. श्री गोविंद घाडगे, ह.भ.प. श्री शामराव गायकवाड, ह.भ.प. श्री गोरख महाराज, ह.भ.प.श्री चंद्रकांत मोरे, श्री. सुधाकर मोरे, शिंदेवाडी सरपंच श्री संदीप जगताप, श्री. नवनाथ जगताप, श्री. हरीभाऊ शिंदे,हिंगणरावचे सरपंच अंकुश कोतवाल, युवकांचे नेते श्री अक्षय प्रकाश जगताप, श्री.रामभाऊ सोनवणे, श्री. संतोषराव शिंदे, श्री. नामदेव मेमाणे, श्री. अशोक जगताप, श्री. रामदास कोंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

श्री. मारुती मगर, ह. भ. प. श्री नंदकुमार गोते इत्यादी मान्यवरांची सांप्रदिक विचार मांडले. ह. भ. प. श्री. भिबिषण महाराज ठाकूर (मुंबई) यांनी आपल्या मधुर वाणीतून दाता कसा असावा यावर उत्कृष्ट किर्तन सांगितले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने दानशूर व्यक्ती ह. भ. प. नंदकुमार किसनराव गोते यांचा तुकाराम महाराज पगडी, वारकरी शाल, आणि सदगुरू दौलतबाबा यांची प्रतिमा देऊनज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार हिंदू रत्न ह भ प डॉक्टर रवींद्र भोळे वैद्यकीय विभाग प्रमुख वारकरी मंच महाराष्ट्र राज्य हस्ते सन्मान करण्यात आला. देवस्थानचे विश्वत श्री मोहनराव शिंदे, गादीचालक ह.भ.प. श्री दिलीप महाराज शिंदे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. श्री. विकासनाना दांगट (संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक) श्री. प्रकाश चंद्रकांत जगताप (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे) यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बँक राष्ट्रीयीकरण दिनानिमित्त डीजीईटी पदवी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे यशस्वी आयोजन

ठाणे दि. २२ ( प्रमोद दळवी )  बँक राष्ट्रीयीकरण दिन २०२६ निमित्त डीजीईटी पदवी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील बँकिंग अँड इन्शुरन्स विभागाने, वाणिज्य मंडळ (कॉमर्स...

शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, आंदोलकांच्या मागण्या कळवल्या: NCP (SP) |...

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नवी दिल्लीत लक्षवेधी चर्चा झाली पुणे : जंतरमंतरला भेट दिल्यानंतर आणि झुरळ जनता...

‘चार महीने में काफी उतार-चढ़ाव आये’: वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेमध्ये नवीन सुरुवात

वैभव सूर्यवंशी (बीसीसीआय फोटो) नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वीच, वैभव सूर्यवंशी हरारे स्पोर्ट्स क्लबमधून भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजयाचा नायक म्हणून बाहेर पडला. 15 वर्षीय...

हायकोर्टाने बीएमसीला कचऱ्याने साचलेला चारकोप तलाव साफ करण्यास सांगितले

न्यायमूर्तींनी जिल्हाधिकाऱ्यांना “अतिक्रमण हटवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे” निर्देश दिले. मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी बीएमसीला सेक्टर 7, चारकोप, कांदिवली पश्चिम येथील तलावातील...

सिया गोयल, चेतन चौधरी यांनी विषप्रयोगावर संशोधन केले, हत्येचे कट रचणारे चित्रपट पाहिले: केतन...

लोहगड किल्ला निवडण्यापूर्वी या दोघांनी लोणावळा आणि विसापूर किल्ल्यातील टायगर पॉइंटसह अनेक ठिकाणांचे सर्वेक्षणही केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुणे: केतन अग्रवाल खून प्रकरणातील...

error: Content is protected !!