Homeशहरशिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा कक्ष प्रमुखपदी सौ. मीना (ताई) सोंडे...

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा कक्ष प्रमुखपदी सौ. मीना (ताई) सोंडे यांची नियुक्ती

उल्हासनगर दि १६ ( प्रमोद दळवी )  : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा (उल्हासनगर व अंबरनाथ) कक्ष प्रमुखपदी सौ. मीना (ताई) सोंडे यांची सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथजी शिंदे , खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे कल्याण जिल्ह्यातील उल्हासनगर व अंबरनाथ परिसरातील सर्वसामान्य, गोरगरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय मदत अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालयांमध्ये राखीव असलेल्या १० टक्के खाटांचा लाभ पात्र रुग्णांना मिळवून देणे, निकष पूर्ण करणाऱ्या गरीब रुग्णांना पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करणे, तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

याशिवाय, गंभीर व अत्यंत खर्चिक शस्त्रक्रियांची आवश्यकता असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट आदी विविध विश्वस्त संस्थांमार्फत मदत उपलब्ध करून देण्यासाठी बाळासाहेब भवन येथील मुख्य कार्यालयाशी समन्वय साधण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णसेवा अधिक व्यापक, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याचा प्रयत्न असून, सौ. मीना (ताई) सोंडे यांच्या नियुक्तीमुळे उल्हासनगर व अंबरनाथ परिसरातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक मार्गदर्शन, शासकीय योजनांचा लाभ आणि आर्थिक मदत मिळवून देण्याचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नियुक्तीपत्र दिले त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार बालाजी किणीकर, गटनेते अरुण आशान, परांजपे, कमलेश निकम, सुशील पवार, आधी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IND vs ENG 2रा ODI: विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या आणखी एका ODI अर्धशतकासह व्हिव्ह रिचर्ड्सची...

विराट कोहलीने व्हिव्ह रिचर्ड्सची बरोबरी केली विराट कोहलीने गुरुवारी कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणखी एक अर्धशतक झळकावून इंग्लंडविरुद्धचा...

मुंबई उच्च न्यायालयाने सर्व पोलिस ठाण्यांमधील सीसीटीव्ही, फुटेजचा कालावधी जतन केल्याबद्दल डीजीपीचा अहवाल मागवला

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तथ्य शोधून काढण्याचे निर्देश दिले आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेरे आणि...

बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचा आत्महत्या, 14 जणांवर गुन्हा | पुणे बातम्या

पुणे : गुलटेकडी, मार्केट यार्ड येथे गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एक 65 वर्षीय इमारत कंत्राटदार घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.स्वारगेट...

यूएस मधील 5 कमी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने जी आश्चर्यकारकपणे रिकामी आणि शांत आहेत

नॉर्थ कॅस्केड्स नॅशनल पार्क हे अमेरिकन आल्प्स म्हणूनही ओळखले जाते. 300 पेक्षा जास्त हिमनद्या असूनही हे यूएस मधील सर्वात कमी भेट दिलेल्या राष्ट्रीय उद्यानांपैकी...

विठ्ठलवाडी रेल्वे ट्रॅकजवळ गांजा विक्री करणाऱ्यावर पोलिसांची झडप; ५३० ग्रॅम गांजा जप्त

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक-३ परिसरातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळील गोपाळ समाज परिसरात रेल्वे ट्रॅकच्या कडेला एक इसम...

error: Content is protected !!