मुरबाड दि.३ (सतिशचंद्र घरत) : मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वैशाखरे गावातील सोमनाथ नवले यांनी प्रामाणिकपणे केलेल्या शिक्षक सेवेची पोचपावती म्हणून त्यांना शिक्षण विभाग पंचायत समिती मुरबाड यांच्या कडुन २०२५ ते २०२६ चा मुरबाड तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले.
आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले सोमनाथ काशीनाथ नवले यांची वैशाखरे जवळील मोहवाडी या शाळेत प्रथम नियुक्ती झाल्याने तेथुनच त्यांची शिक्षक सेवेची सुरुवात झाली संबंधित शाळेमध्ये नवले यांनी जवळपास दहा वर्षं सेवा केल्यानंतर त्यांनी ऊमरोली,बळेगाव या गावातील शाळानमधे शिक्षक म्हणून काम केले. सध्या तालुक्यातील कदमपाडा येथील शाळेत शिक्षण सेवेत कार्यरत असुन तेथुनच त्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार जाहीर झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे वैशाखरे गावातील नवले कुटुंबातील बहुतांश युवक शासकीय सेवेत आहेत.त्यातील सोमनाथ नवले व कमलाकर नवले हे दोघेही शिक्षक सेवेत असून सोमनाथ नवले यांच्या पत्नी आरोग्य खात्यात कार्यरत आहेत. तर त्यांचे भाऊ धनाजी नवले टोकावडे येथील वनखात्या मध्ये शासकीय सेवेत कार्यरत असुन नवले कुटुंबातील विश्वनाथ नवले हे वैशाखरे गावाचे पोलिस पाटील म्हणून काम करीत असल्याने शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व बहुतांशी शासकीय सेवेत असलेल्या नवले कुटुंबातील सोमनाथ नवले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने परीसरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .





























