Homeशहरलेवा स्पोर्ट्स क्लब,अंबरनाथ तर्फे आयोजित ‘लेवा क्रिकेट प्रीमियर लीग-सीझन-१ (२०२६ ) (लेवा...

लेवा स्पोर्ट्स क्लब,अंबरनाथ तर्फे आयोजित ‘लेवा क्रिकेट प्रीमियर लीग-सीझन-१ (२०२६ ) (लेवा युनिटी चषक २०२६)’ यशस्वीरीत्या संपन्न.

अंबरनाथ दि . २५ ( प्रमोद दळवी )  : लेवा स्पोर्ट्स क्लब, अंबरनाथ तर्फे आयोजित लेवा क्रिकेट प्रीमियर लीग-सीझन-१(२०२६) (लेवा युनिटी चषक २०२६) ही स्पर्धा उत्साहात व जल्लोषात पार पडली.

स्पर्धेचे उद्घाटन सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी शिरीष बेंडाळे (ओम टेक्नोचे संचालक),डॉ.गुणवंत भंगाळे (सोनम ट्युशनचे संचालक), डॉ.जयेश वराडे (अमृत विश्व आयुर्वेदचे संचालक),सौ.प्रतिभा ताई वराडे,डॉ.राहुल चौधरी (गणपती नेत्रालयचे संचालक) तसेच लेवा स्पोर्ट्स क्लबचे सर्व सदस्य व सहभागी संघ उपस्थित होते. मान्यवरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व नारळ फोडून स्पर्धेची सुरुवात केली.या स्पर्धेत एकूण १० संघांनी सहभाग घेतला.त्यामध्ये अंबरनाथचे ३ संघ, उल्हासनगरचे २ संघ,बदलापूरचे २ संघ,कल्याणचे २ संघ आणि जळगावचा १ संघ सहभागी झाला होता.दिवसभर विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून खेळाडूंचे मनोबल वाढवले.यामध्ये वराडे ग्रुपचे संचालक श्री.विजय वराडे, श्री.प्रशांत पाटील (भोरगांव लेवा पंचायत चे अंबरनाथ युवा समिती शहर अध्यक्ष),डॉ.उमेश पाटील (लेवा यूथ फोरम,अंबरनाथ अध्यक्ष),श्री.निलेश झांबरे (भोरगांव पंचायत युवा समिती,उपाध्यक्ष),सौ.वैशाली पाटील (भोरगांव पंचायत युवा समिती सदस्य) आणि चेतन चौधरी (भोरगांव पंचायत युवा समिती सदस्य) यांचा समावेश होता.

स्पर्धेला लाभलेले प्रमुख पाहुणे खान्देश सेना प्रमुख सुहासदादा बोंडे,खान्देश सेना उपाध्यक्ष नितीन जावळे,बिल्डर असोसिएशनचे एकनाथ शेठ,श् विजय वराडे, परिमल चौधरी,नगरसेवक निखिल पाटील, दिपक नेमाडे, शिरीष बेंडाळे,तन्मय चौधरी(पायलट)तसेच सौ.हर्षला किरण नेमाडे,सौं.कामिनी जावळे,सौं.स्मिता चौधरी,श्रीमती.जया जी यांनी विशेष उपस्थिती दर्शवून उपांत्य व अंतिम सामन्यांदरम्यान खेळाडूंचे मनोबल वाढवले.अंतिम सामना ‘सरदार इलेव्हन, कल्याण’ व ‘लेवा वॉरियर्स,उल्हासनगर’ या संघांमध्ये रंगला.अत्यंत चुरशीच्या सामन्यात ‘सरदार इलेव्हन,कल्याण’ संघाने जिगरबाज खेळ करत विजेतेपद पटकावले.त्यांचे हार्दिक अभिनंदन.तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात ‘लेवा राघव योद्धा,जळगाव’ संघाने ‘लेवा ब्लास्टर्स,अंबरनाथ’ संघाचा पराभव करत तृतीय क्रमांक मिळवला. मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.प्रमुख पाहुणे सुहास दादा बोंडे यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवसही यावेळी केक कापून साजरा करण्यात आला.संपूर्ण स्पर्धेचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडले असून सुहास दादा बोंडे यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.

लेवा स्पोर्ट्स क्लब,अंबरनाथ तर्फे सर्व मान्यवर व प्रायोजकांना अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराचे फोटोफ्रेम भेट देण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांना तुळशीचे रोप प्रदान करण्यात आले.सहभागी सर्व खेळाडूंनी लेवा स्पोर्ट्स क्लब,अंबरनाथचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन लेवा स्पोर्ट्स क्लब,अंबरनाथच्या सदस्यांच्या एकजुटीमुळे शक्य झाले.विशेष परिश्रम घेणारे सदस्य म्हणजे भूषण विश्वनाथ चौधरी,किरण नेमाडे,लोकेश विश्वनाथ चौधरी,पंकज नारखेडे,कृष्णा संजय महाजन,प्रतीक वराडे आणि समीर चौधरी तसेच समस्त लेवा स्पोर्ट्स क्लब,अंबरनाथ. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे लेवा समाजात एकतेचा,मैत्रीचा आणि सकारात्मकतेचा संदेश अधिक दृढ झाला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंग्लंड महिला 11.0 षटकात 21/1

भारत विरुद्ध इंग्लंड महिला लाइव्ह स्कोअर, वन-ऑफ कसोटी: भारताने शिस्तबद्ध फलंदाजीचा प्रयत्न केला परंतु लॉर्ड्सवरील महिला कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या उशिरा पुनरुत्थानामुळे संपूर्ण नियंत्रण...

बॉलीवूडमध्ये हेमा मालिनी यांची हीरक जयंती साजरी होत असताना ड्रीम गर्ल पूर्ण वर्तुळात आली...

हेमा मालिनी यांना चित्रपटसृष्टीत साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हिंदी चित्रपटसृष्टी जमली होती. नॉस्टॅल्जियाच्या संध्याकाळमध्ये स्पष्ट संभाषणे आणि संगीत सादरीकरण होते. उद्योगातील दिग्गजांनी पडद्यामागील...

वारकऱ्यांनी पुण्यात मुक्काम केल्याने प्रार्थना, विश्रांती आणि सेवा

पुण्यातील कॉलेजमधील फिजिओथेरपीचे विद्यार्थी वारकऱ्यांना पायाची मालिश आणि स्ट्रेचिंग सेशन्स देतात पुणे : पुण्यात थांबलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीच्या...

एर्लिंग हॅलंडचे आई आणि वडील कोण आहेत? नॉर्वेच्या सुपरस्टारच्या मागे क्रीडा परिवार

एर्लिंग हॅलँडचा जागतिक फुटबॉलच्या शीर्षस्थानी उदयास अगणित प्रसंगी विलक्षण म्हणून वर्णन केले गेले आहे परंतु जेव्हा आपण तो ज्या कुटुंबातून आला त्याचा...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांचे अंबरनाथ मध्ये जोरदार स्वागत

अंबरनाथ दि. ११ ( प्रमोद दळवी )  : राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार या मुरबाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा व प्रियजन...

error: Content is protected !!