Homeशहरराष्ट्रीय असंसर्गजन्य आजार कार्यक्रमांतर्गत उल्हासनगरात कॅन्सर तपासणी व जनजागृती मोहीम सुरु

राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार कार्यक्रमांतर्गत उल्हासनगरात कॅन्सर तपासणी व जनजागृती मोहीम सुरु

उल्हासनगर दि १३ : उल्हासनगर महापालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उल्हासनगर महापालिका प्रशासक तथा आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ मे २०२५  रोजी मंगळवारी कॅन्सर तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १५८ लाभार्थ्यांनी तपासणी करून घेतली .

राज्य शासनाच्या कॅन्सर मोबाईल व्हॅनच्या साह्याने हे शिबिर मिड टाऊन रोटरी क्लब, गोल मैदान उल्हासनगर – २ येथे सकाळी १०.००   ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत पार पडले. या शिबिराचे उद्घाटन उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उल्हासनगर महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा, उल्हासनगरातील सेंट्रल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ. मनोहर बनसोडे, शासकीय प्रसूतीगृहचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत दोडे, शासकीय प्रस्तुतिगृहचे बालरोग तज्ञ डॉ. यशवंत सदावर्ते, सेंट्रल हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉ. तृप्ती रोकडे, सेंट्रल हॉस्पिटलचे दंततज्ञ डॉ. जिनल रोकडे, शिबिर समन्वय डॉ. स्नेहल गुलाणे, उल्हासनगर महापालिकेचे सिटी प्रोग्राम मॅनेजर डॉ. विद्या चव्हाण, एन.सी.डी नोडल अधिकारी डॉ. वैशाली नाईक, मुख्यालय सार्वजनिक आरोग्य परिचारिका सौ पौर्णिमा खरात तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कार्यालयातील इतर कर्मचारी या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित होते.

या शिबिरात स्तन, गर्भाशयमुख व तोंडाच्या कॅन्सरची तपासणी करण्यात आली. याशिवाय क्षयरोग ( TB ) व असंसर्गजन्य आजाराची (NCD) तपासणी देखील करण्यात आली. एकूण १५८  लाभार्थ्यांनी तपासणी करून घेतली असून २  संशयित रुग्णांच्या तोंडाच्या कॅन्सर साठी बायोप्सी घेण्यात आली आहे. या मोबाईल कॅन्सर तपासणी द्वारे १४  मे २०२५  रोजी महात्मा फुले नगर उल्हासनगर – ३, व १५ मे २०२५  रोजी ओ.टी सेक्शन उल्हासनगर – ४, १६  मे २०२५  रोजी नेताजी चौक उल्हासनगर -५ , या ठिकाणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 10 ते सायंकाळी ४  या वेळेत  वेळेत होणार आहेत. उल्हासनगर महापालिका मार्फत सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी या शिबिरांना भेट द्यावी आणि कॅन्सर व इतर असंसर्गजन्य आजाराच्या मोफत तपासणीचा लाभ घ्यावा. उल्हासनगर महापालिका कॅन्सरसारख्या गंभीर आजारांची लवकर निदान व उपचार करण्यासाठी आणि जनजागृती साठी कटिबद्ध आहे. आरोग्य विभागाच्या एकात्रीत प्रयत्नांनी व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने मंगळवारी आयोजित केलेल्या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रोहित शर्माने नेटमध्ये जोरदार फटकेबाजी केल्याने शोमध्ये फ्लिक्स, पुल आणि ड्राईव्ह; अफगाणिस्तान वनडे मालिकेसाठी...

मोहालीमध्ये TimesofIndia.com: सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) कडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर, बुधवारी मोहाली येथील IS बिंद्रा पीसीए स्टेडियममध्ये भारताच्या वैकल्पिक प्रशिक्षण सत्रादरम्यान रोहित...

आरटीओला प्रथमदर्शनी ‘मानवी त्रुटी’ आढळली, कोणत्याही तांत्रिक बिघाडासाठी अनेक तपासणी करणार

सोमवारी झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत बेस्ट ओल्या भाडेतत्त्वावरील बसेसची देखभाल करण्यासाठी 125 पूर्णवेळ तंत्रज्ञ...

पुण्यातील तळेगाव एमआयडीसी युनिटमध्ये देखभालीदरम्यान CO₂ लीक झाल्याने 2 ठार, 3 जखमी

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे: तळेगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन (एमएनसी) प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी देखभालीच्या कामात...

“आईने मला मुलाखती देणे थांबवण्यास सांगितले”: प्रसिद्ध किशोरवयीन अन्वेषक सार्थक सिद्धांत त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी...

सार्थक सिद्धांत त्याच्या आईसोबत 18 वर्षीय सार्थक सिद्धांत जेव्हा राष्ट्रीय मथळे बनू लागला तेव्हा अनेकांनी एका निर्भय किशोरवयीन मुलाला शक्तिशाली व्यवस्थेला आव्हान देताना...

पुण्यापासून जगाच्या शिखरावर : एव्हरेस्ट जिंकणाऱ्या तरुण गिर्यारोहकांचे वीरांचे स्वागत | पुणे बातम्या

पुणे: जगातील सर्वोच्च शिखरावर उभे राहिल्यानंतर आठवडाभरात, पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेने 2026 च्या यशस्वी माऊंट एव्हरेस्ट मोहिमेबद्दल भव्य नागरी सत्काराचे आयोजन केल्यामुळे, चार...

error: Content is protected !!