उल्हासनगर दि १४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त उल्हासनगर – ५ मधील स्वामी शांती प्रकाश वृद्धआश्रम येथे ८५ वृद्धाना कंबळ, टॉवेल व जेवण वाटप करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी वृद्ध आश्रमातील सर्व जेष्ठ नागरिकांनी मनसे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व तुमच्या साहेबांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो असे आशीर्वाद दिले.या कार्यक्रमाचे अयोजन जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख,शहर अध्यक्ष संजय घुगे उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव यांनी केले होते.

यावेळी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख,मनविसे जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव,शहर अध्यक्ष संजय घुगे उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके, मुकेश शेठपलांनी, शैलेश पांडव,विभाग अध्यक्ष प्रमोद पालकर,रोहित देवकर,दीपक सावंत हितेश मेहरा,अनिल गोधडे, गणेश साळवे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





























