Homeशहररस्त्यासाठी उल्हासनगरातील तरे चाळीतील नागरिक आक्रमक : जोपर्यंत रस्त्याचा मार्ग खुला करून...

रस्त्यासाठी उल्हासनगरातील तरे चाळीतील नागरिक आक्रमक : जोपर्यंत रस्त्याचा मार्ग खुला करून देत नाही तोपर्यंत मतदान नाही

उल्हासनगर दि.२ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगर शहरातील पॅनल क्रमांक १५ मधील विटीसी ग्राउंडचा मेन एंट्रीचा गेट आहे तो चाळीस वर्षांपूर्वीचा तरे चाळीकडे जाणारा रस्ता होता. पण गेल्या पाच वर्षापासून तो रस्ता नूतनीकरणाच्या कामासाठी बंद केल्याने त्यातील रहिवाशांचे हाल होत आहेत. जोपर्यंत आमच्यासाठी रस्त्याचा मार्ग खुला करून देत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही अशी भूमिका त्यातील नागरिकांनी घेतली आहे. विटीसी ग्राउंड बाहेर सर्व तरे चाळीतील नागरिकांनी निषेध करत रस्त्याची मागणी केली.

शहरातील कॅम्प  नंबर -४  परिसरातील पॅनल क्रमांक १५ मधील विटीसी ग्राउंड येथे तरे चाळी असून या चाळीत जवळपास ३००  ते ४००  घरांची  वस्ती आहे. विटीसा ग्राउंडचा जो मेन एंट्री चा गेट आहे तो चाळीस वर्षांपूर्वीचा जुना रस्ता होता. तो रस्ता दीड वर्षांपूर्वी नूतनीकरणाच्या कामासाठी बंद केला होता. अद्याप पर्यंत तो रस्ता चालू केला नाही. स्थानिक नागरिकांची मागणी अशी आहे की हा रस्ता पहिले खुला करावा. जोपर्यंत रिंग रोड होत नाही तोपर्यंत मधला रस्ता गेट एन्ट्रीचा तो खोलून द्यावा जेणेकरून ॲम्बुलन्स, रिक्षा दारा पर्यंत येऊ शकते. पेशंट झाले किंवा घरातला कोणी आजारी पडला किंवा कोणी घरातला वारला तर आमच्या इथे काही सोय नाही आहे . पेशंटला आम्हाला झोळीमध्ये उचलून घेऊन जावे लागते. किंवा पेशंटला खुर्चीत बसून न्यावे लागते एवढे हाल या परिसरातील  माणसांना सहन करावा लागत आहे. याशिवाय पावसाळ्यामध्ये देखील या परिसरातील नागरिकांना भरपूर त्रास आहे. पावसाळ्यामध्ये विटीसीचा रस्ता आहे तो पूर्णपणे बंद होऊन जातो.येण्या- जाण्यासाठी  नागरिकांचे खूप मोठे हाल होत असतात.

या परिसरातील सर्वच नागरिकांची एकच मागणी आहे विटीसी ग्राउंडचा जो इंट्रीचा रस्ता आहे तो पूर्णपणे खोलून द्यावा आणि जे पण करणार आहेत ते लीगली लिखित स्वरूपात देण्यात यावे. कारण दोन-चार महिन्यानंतर पुन्हा रस्ता बंद करतील असे नागरिकांचे म्हणणे आहे. रिंग रोड होईपर्यंत आम्हाला या मधला गेटचा वापर करण्याची परवानगी देण्यात यावी. आम्हाला येण्या-जाण्याची सोय सध्या कुठेच नाही आहे. आमच्या रहिवाशांचा रस्ता चारी बाजूंनी पूर्ण ब्लॉक केलेला आहे. आम्हाला पूर्ण चारी बाजूने फिरून जावे लागते. आमच्याकडे पाहुणे यायचे असतील तर त्यांना एड्रेस काय द्यायचा. असा प्रश्न आम्हाला पडतो. विटीसी ग्राउंडचा मागचा गेट आहे तो  खोलून  तिथूनच उमेदवारांनी प्रचारासाठी आत मध्ये यावे. जोपर्यंत गेट नाही उघडणार तोपर्यंत उमेदवारांनी आत मध्ये येऊ नये आमच्या सगळ्या रहिवाशांची एवढी मागणी आहे असे विकिता वैभव तरे यांनी सांगितले. गेट उघडा करत असतील तरच प्रचाराला या अन्यथा तेव्हाच मतदान होईल.आमचा गेट उघडला नाही तर आमच्या परिसरातील एकही जण मतदानासाठी येणार नाही. अशी भूमिका येथील नागरिकांनी घेतली आहे.

याबाबत प्रमिला बाविस्कर यांनी सांगितले मी विटीसी मैदाना परिसरात तरे चाळीत राहते. आम्हा सर्व वयोवृद्धांना येणे जाण्याचा  एवढा त्रास आहे. आमची लहान लहान मुले देखील शाळेत किंवा क्लासला रस्ता नसल्यामुळे  जाऊ शकत नाही. याशिवाय या परिसरात मोठ्या संख्येने नशेडी, गांजाडी मुले बसलेले असतात त्यांच्यापासून आमच्या मुलांना खूप धोका आहे. या ठिकाणी राहण्यासाठी आम्हाला खूप त्रास होत आहे. असं वाटतं की घर सोडून इथून निघून जावं. या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे चाळीतील  अर्धे लोक या ठिकाणाहून निघून गेले आहेत. त्यामुळे आम्हाला हा रस्ता मोकळा करून द्यावा नाहीतर आम्ही मतदान करणार नाही अशी अशी आमची भूमिका आहे असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतासाठी दुखापतीची भीती: शुभमन गिल इंग्लंड एकदिवसीय सामन्यात निवृत्त दुखापतग्रस्त झाला | क्रिकेट बातम्या

शुबमन गिल दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे मंगळवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या २५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उजव्या पायात दुखापत...

मुंबईतील खाद्यपदार्थांवर एफडीएची धडक; स्वच्छतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३ जणांचे परवाने निलंबित

स्वच्छतेच्या गंभीर त्रुटींमुळे महाराष्ट्र FDA ने मुंबईतील तीन भोजनालयांचे खाद्य परवाने निलंबित केले (फोटो क्रेडिट: X) मुंबई: तपासणीत स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांचे...

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी 4,000 इबोला व्हॅक्सचे डोस यूकेला पाठवले

ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या या चाचणीमध्ये १८ ते ५५ वयोगटातील ५० निरोगी स्वयंसेवकांचा समावेश असेल. पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने...

तुम्हाला गायी माहित आहेत असे वाटते? हे 5 आश्चर्यकारक तथ्य अन्यथा सांगतात

तुम्ही शेवटच्या वेळी गायीकडे कधी बघितले होते आणि विचार केला होता की, “या प्राण्याबद्दल काहीतरी आश्चर्यकारक आहे”? कदाचित कधीच नाही. ते इतके सामान्य आहेत...

मोशी दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्याने समिती स्थापन केली, पीसीएमसीने शहर आणि पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता...

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (पीसीएमसी) प्रशासकीय इमारतीवर 8 जुलै रोजी झालेल्या मोशी कचरा ते ऊर्जा प्रकल्पातील दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने...

error: Content is protected !!