Homeशहरमहामानवांची संयुक्त जयंती महोत्सव : भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न

महामानवांची संयुक्त जयंती महोत्सव : भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न

( प्रमोद दळवी )

निशा भगत यांच्या गाण्यांवर अनेकांनी धरला ठेका

उल्हासनगर दि.२७ : उल्हासनगरातील कॅम्प  नं ४ परिसरातील सुभाष टेकडी येथील दहाचाळ, नालंदा शाळेसमोर महामानवांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्राची महागायिका निशा भगत यांनी लोकप्रिय भीम गीत सादर केले. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित हजारो उल्हासनगरकरांनी अक्षरशा गाण्यांवर ठेका धरत निशा भगत यांना दाद दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४  व्या जयंतीनिमित्त दहा चाळ रहिवासी संघटना, एकता मित्र मंडळ, नागसेन क्रिकेट क्लब, नवयुवक मित्र मंडळ यांच्यातर्फे महामानवांची संयुक्त जयंती महोत्सव व भीम गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्राच्या प्रसिद्ध महागायिका निशा भगत यांनी  भीम गीतांच्या या कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस अशी भीम गीते सादर केली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयायींनी प्रचंड गर्दी केली होती. दहा चाळ इथे दरवर्षी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. यावेळी देखील विविध कार्यक्रम आयोजित केले होते. घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सोहळाही या कार्यक्रमात मान्यवर मंडळींच्या हस्ते पार पडला.

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगरसेवक प्रमोद टाळे, रमेश चव्हाण, प्रशांत धांडे, तसेच संदीप डोंगरे सोनू माथारू, राहुल कोजगे, सुधीर बागुल, सुरेश देशमुख आधी उपस्थित होते. नुकताच १०  एप्रिल रोजी सुभाष टेकडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण झाले होते. त्यामुळे भीम अनुयायींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले पसरले आहे. त्यातच दहा चाळ येथे महामानवांची संयुक्त जयंती महोत्सव व भीम गीतांच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी जमली होती.

हा कार्यक्रम यशस्वीरित्य पार पडण्यास दहा चाळ रहिवाशी संघटना उल्हासनगर – ४ चे अध्यक्ष भीमा गायकवाड,उपाध्यक्ष आशिष रोकडे,सचिव संजय वाघमारे,खजिनदार रवींद्र राडे, कार्याध्यश किरण सावळे, कायदेशीर सल्लागार ॲड प्रशांत चंदनशिव , सदस्य सिद्धार्थ खडताळे ,सागर रोकडे ,अक्षय गायकवाड, मेहुल गायकवाड ,अस्मित गावंडे, राहुल शिंदे, रोहन कांबळे, विकी म्हस्के, तुशीत सोनवणे, अनिकेत राडे  यांनी भरपूर मेहनत घेतली. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, धुमधडाक्यात आनंदाने साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अलेक्झांडर झ्वेरेव्हने फ्लॅव्हियो कोबोलीचा पराभव करून रोलँड गॅरोस येथे पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले...

पॅरिसमधील फ्रेंच ओपनमध्ये इटलीच्या फ्लॅव्हियो कोबोलीविरुद्धचा अंतिम टेनिस सामना जिंकल्यानंतर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हची प्रतिक्रिया (एपी फोटो) ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी अलेक्झांडर झ्वेरेव्हची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर...

मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य जखमी

नवी मुंबई: रविवारी दुपारी मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या कॅरेजवे ओलांडणाऱ्या दोन महिलांपैकी एका महिलेला दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर...

प्रवाशांची सुरक्षा सुधारण्यासाठी जीआरपीने पुणे रेल्वे स्थानकातून ६० भिकाऱ्यांना पुनर्वसन गृहात हलवले

पुणे : गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (GRP) च्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि परिसराची स्वच्छता सुधारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गेल्या दोन महिन्यांत...

रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर करणे, दिशानिर्देशांमध्ये मदत करणे आणि बरेच काही: मुलाचा आत्मविश्वास वाढवण्याचे 7 सोपे...

जरी तुम्हाला तुमच्या मुलापेक्षा जास्त माहिती असेल तरीही, कधीकधी, त्यांचा विद्यार्थी बनणे ही आत्मविश्वास वाढवण्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे. त्यांना समजेल असे काहीतरी शिकवायला सांगणे,...

पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत CBSE विद्यार्थ्यांकडून भौतिकशास्त्रातील सुधारणांबद्दल कमाल तक्रार

सीबीएसईच्या चुकांबद्दल अनेक दिवसांचा निषेध पुणे : हजारो विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी प्रवेश केलेल्या मूल्यांकन केलेल्या इयत्ता बारावीच्या CBSE उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती दाखवतात की भौतिकशास्त्र ही...

error: Content is protected !!