Homeशहरमहापौरच्या पतीला आयुक्तांच्या दालनात प्रवेश दिल्यावरून आयुक्तांच्या दालना बाहेर भाजपा नगरसेवकांचा गोंधळ

महापौरच्या पतीला आयुक्तांच्या दालनात प्रवेश दिल्यावरून आयुक्तांच्या दालना बाहेर भाजपा नगरसेवकांचा गोंधळ

उल्हासनगर दि . २२ ( प्रमोद दळवी ) : महापौरच्या पतीला पालिका आयुक्तांच्या दालनात प्रवेश दिला पण भाजपाच्या नगरसेवकांना दालना बाहेरच उभे राहण्यास सांगून त्यांना रोखण्यात आल्याने याचा निषेध करत भाजपा नगरसेवकांनी पालिका आयुक्तांच्या कार्याला बाहेर जोरदार घोषणाबाजी करत तिथेच गोंधळ घातल्याची घटना बुधवारी सायंकाळी महापालिकेत घडली. या घटनेमुळे सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये एकच राडा झाला. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपाचे युती टिकणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बुधवारी सायंकाळी महासभा झाल्यावर पालिका आयुक्त यांच्या दालनात शिवसेना गटनेते अरुण आशान आणि शिवसेनेच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम हे गेले होते. त्यावेळी भाजपचे गट नेता राजेश वाधारीया यांना देखील पालिका आयुक्ताच्या दालनात बोलण्यात आले होते. पण त्यावेळी कमलेश निकम हे अरुण आशान सोबत आल्याचे पाहून व त्यांना कोणतेही पद नसताना आयुक्तांच्या दालनात जाऊन दिले गेले आणि भाजपच्या नगरसेवकांना सुरक्षारक्षकांकडून बाहेर रोखण्यात आले याचा राग भाजपा नगरसेवकांना आला. या गोष्टीचा राग येऊन त्यांनी या घटनेचा निषेध करत पालिका आयुक्तांच्या दालना बाहेर घोषणाबाजी करत एकच गोंधळ घातला. त्यावेळी पोलिसांना तातडीने त्या ठिकाणी बोलण्यात आले. या घटनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच झोपली. याशिवाय काँग्रेसचा एक नगरसेवक असताना महासभेमध्ये महापौरांनी थेट काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका अंजली साळवे यांची विरोधी पक्ष नेते म्हणून महासभेत घोषणा केल्याने त्यावेळी भाजपाच्या नगरसेवकांनी त्याला जोरदार विरोध केला. या संदर्भात राजेश वधारिया यांनी सांगितले आम्ही सत्तेत असताना शिवसेना आम्हाला विश्वासात न घेता महापौर हे परस्पर निर्णय घेतात. विरोधी पक्ष नेता निवडी प्रकरणी घेतलेला निर्णय हा चुकीचा असून त्या संदर्भात आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागू असा इशारा दिला. शिवसेनेने युती धर्म पाळला नाही आम्हाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप भाजपने केला.

या घटनेबाबत शिवसेना गटनेता अरुण आशान यांनी सांगितले महासभेच्या अगोदर जी ऑडिशन बैठक होते त्या बैठकीमध्ये निर्णय होतात.आणि यामध्ये काय निर्णय घ्यायचे हे बैठकीच्या अगोदर गट नेत्याला कळवले जातात. आजच्या महासभेमध्ये पहिल्यांदा त्यांचे नगरसेवक खाली डम्पिंग ग्राउंड च्या प्रश्नसंदर्भात जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. युतीमध्ये असताना सुद्धा महापौरांना आणि प्रशासनाला घेरण्याचा प्रयत्न होता. परंतु त्यांना हे समजायला पाहिजे की आपण युतीमध्ये आहोत ज्यावेळेस युतीमध्ये आपण असतो त्यावेळेस त्यांनी युतीचा त्यांना भान नाहीये. प्रत्येक महासभेच्या वेळी त्यांना गोंधळ घालायचा असतो. आणि आज त्यांनी या  पद्धतीत गोंधळ घातला. परंतु जे काही निर्णय झाले ते महापौर सर्वांच्या वतीने सगळ्यांना समक्ष घेऊनच ते निर्णय घेतात. परंतु त्यांची भाषा आता बदललेली आहे हे मात्र नक्की.  पालिका आयुक्तांकडून गट नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. माझ्यासोबत कमलेश निकम हे देखील पालिका आयुक्तांच्या दालनात आले होते. सोबत येण्यास आयुक्तांची परवानगी घेतली होती बाहेरील जास्ती लोक आत मध्ये घेऊन येऊ नका अशा आयुक्तांनी सांगितले होते. आयुक्तांनी बोललेले शिवाय कोणी आत जाऊ शकत नाही. त्यामुळे दालना बाहेर उभे असलेल्या भाजपच्या काही नगरसेवकांना थांबायला सांगितलं होतं. गट नेता असल्यामुळे स्वाभाविक आहे माझ्या  बरोबर जो व्यक्ती आहे तो आत मध्ये आला. त्याच्यामध्ये पद असो की नसो आयुक्तांनी जर कोणाला बोलवलं असेल तर आणि गटनेता बरोबर असेल तर त्यांना आक्षेप घेण्याचा काही प्रश्न येत नाही असे अरुण आशान यांनी सांगितले .

याबाबत शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले भारतीय जनता पक्ष सत्तेत राहते, सत्तेचा सहभाग घेते, सत्तेमध्ये भागीदारी घेते. मग महासभेच्या वेळेला खाली बसणं आणि महापौरांच्या विरुद्ध अविश्वास दाखवणे हे कितपत खरं आहे. युती म्हणून युतीचा धर्म त्यांनी पाळला पाहिजे. जर खाली बसून महापौरांच्या विरुद्ध अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा आहे. युतीच्या बाबतीमध्ये वरिष्ठ नेते विचार करतील त्याचा निर्णय घेतील. आमचे नेते सक्षम आहेत आमचे नेते निर्णय घेतील असे सांगितले. सत्तेत असताना देखील भाजप आणि शिवसेना या घटनेवरून उल्हासनगर महानगरपालिकेत आमने-सामने आल्याने त्यांच्यात झालेल्या या राड्यावरून या सत्तेला तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IPL 2026: ‘तो माझ्या खिशात आहे’- पूरनला बाद केल्यानंतर जडेजाने आनंद साजरा केला

राजस्थान रॉयल्सचा रवींद्र जडेजा (पीटीआय फोटो) राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 40 धावांनी पराभव केल्यामुळे रवींद्र जडेजाने सामना जिंकून देणारी अष्टपैलू...

प्रकाशाची एकच चूक जी शांतपणे तुमच्या घरातील झाडे मारत आहे |

इनडोअर प्लांटचे मालक बहुतेकदा कोमेजणाऱ्या हिरवळीचा सामना करतात, चुकून पाणी पिण्याची किंवा आर्द्रतेला दोष देतात. वास्तविक दोषी हा अपुरा प्रकाश आहे, कारण वनस्पतींना...

PAT पेपर लीक झाल्यानंतर SCERT ने 6 ऑनलाइन चॅनलविरोधात तक्रार दाखल केली | पुणे...

पुणे : परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पीएटी) III च्या प्रश्नपत्रिका प्रसारित केल्याच्या आरोपावरून व्हिडिओ-सामायिकरण प्लॅटफॉर्मवर सहा चॅनेलच्या संचालकांविरुद्ध मंगळवारी गुन्हा...

एक्स्टेसी पिल ओव्हरडोजमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी 11वी अटक केली आहे

मुंबई: गोरेगाव (पूर्व) येथे एका संगीत मैफिलीत एक्स्टसीच्या गोळ्या खाल्ल्याने झालेल्या दोन एमबीए विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी या प्रकरणातील...

आयुष कोमकर खून प्रकरणी तुरुंगात असलेल्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांचा दुसरा जामीन अर्ज कोर्टाने...

पुणे : विशेष न्यायाधीश (MCOCA) एसएस कंठाळे यांच्या न्यायालयाने 5 सप्टेंबर 2025 रोजी आयुष कोमकर (18) हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगलेल्या नगरसेविका लक्ष्मी उदयकांत...

error: Content is protected !!