Homeशहरमराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा

मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा

भांडुप दि. २ : रामानुजन आर्य डी.ए.व्ही. कॉलेज भांडुप येथे मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या संवर्धनाची व जतनाची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याच्या उ‌द्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून सौ. साधना जोशी यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य बालचंद्र शेट्टी, उपप्राचार्या श्रीमती सुनिता भामरे, सुपरवायझर श्रीमती कीर्ती वेंकटरमन तसेच समन्वयक डॅनियल सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा वाघरे यांनी समर्पक शब्दांत केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय अनिता महाजन यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन योगिता पाटील यांनी व्यक्त केले. तसेच ऋजुता मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सुरुवात आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून झाली. विद्यार्थ्यांनी मराठी कवितांचे प्रभावी वाचन, भाषणे तसेच अभंग आणि पोवाडे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महावि‌द्यालयातील निळोबा खोसे ‘मामा’ यांनी सादर केलेल्या अभंगामुळे वातावरण अधिकच भारावून गेले.

प्रमुख वक्त्या सौ. साधना जोशी यांनी आपल्या ओजस्वी आणि प्रेरणादायी भाषणातून मराठी भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. पाळण्यातील बडबडगीतांपासून ते प्रेमगीते, विडंबनगीते आणि विविध काव्यप्रकारांपर्यंत मराठी भाषा आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कशी साथ देते, हे त्यांनी प्रभावी उदाहरणांसह स्पष्ट केले. त्यांच्या विचारांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात मातृभाषेब‌द्दल अभिमानाची भावना अधिक दृढ झाली. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाची नवी ऊर्जा सर्वांना मिळाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शहरात पावसाची संततधार, घाट भागात जोरदार पाऊस

रविवारी झालेल्या पावसामुळे पुण्यातील कर्वे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती पुणे : शनिवार ते रविवार सकाळी 8.30 या 24 तासांत पुणे...

इतिहास! नोव्हाक जोकोविचने रॉजर फेडररचा सर्वकालीन विम्बल्डन विक्रम मोडला

नोव्हाक जोकोविच (इमेज क्रेडिट: विम्बल्डन) नोव्हाक जोकोविचने रविवारी विम्बल्डनच्या इतिहासातील सर्वात विजेते पुरुष खेळाडू बनून त्याच्या चमकदार कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड जोडला.सात...

ऑनलाइन मद्यविक्री प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला, ‘संघटित अवैध धंदे’

मुंबई : कथित ऑनलाइन मद्यविक्रीच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला असताना, मुंबई सत्र न्यायालयाने खार-आधारित वाइन शॉप परवानाधारकाला अटकपूर्व जामीन नाकारला आहे, असे...

या मान्सूनच्या सर्वाधिक २४ तासांच्या पावसाने पुणे भिजले; पुढील 24 तासांत आणखी पावसाची शक्यता

शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत शहरात या पावसाळ्यातील सर्वाधिक 24 तासांच्या पावसाची नोंद झाली, एनडीएमध्ये 33 मिमी, त्यानंतर पाषाण (31.4 मिमी), शिवाजीनगर (30.5 मिमी)...

शीर्ष 5 सर्वात सक्रिय कुत्र्यांच्या जाती

तुमच्या परिपूर्ण वीकेंडच्या कल्पनेमध्ये लांब चालणे, हायकिंग ट्रेल्स किंवा उद्यानात काही तासांचा समावेश असल्यास, काही कुत्र्यांच्या जाती आनंदाने टिकून राहतील - आणि नंतर आणखी...

error: Content is protected !!