Homeशहरमनसे विद्यार्थी सेनेच्या ‘जिल्हा संघटक – कल्याण लोकसभा’पदी ॲड कल्पेश माने...

मनसे विद्यार्थी सेनेच्या ‘जिल्हा संघटक – कल्याण लोकसभा’पदी ॲड कल्पेश माने यांची नियुक्ती

उल्हासनगर दि . २९ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुन्हा एकदा ॲड कल्पेश माने यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांची ‘जिल्हा संघटक – कल्याण लोकसभा’ या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे मनसे विद्यार्थी सेनेच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक बळ मिळणार असून विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची जबाबदारी ॲड . माने यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या नियुक्तीनंतर ॲड . कल्पेश माने यांनी पक्षप्रमुख मा. राजसाहेब ठाकरे, मा. अमितसाहेब ठाकरे, मा. राजू दादा पाटील आणि मा. संदीप पाचंगे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि अथक परिश्रमाने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना ॲड . माने म्हणाले, “हे पद माझ्यासाठी केवळ एक संघटनात्मक जबाबदारी नसून पक्षाच्या विचारधारेचा अधिक प्रभावीपणे प्रसार करण्याची, विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आवाज उठवण्याची आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची संधी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन संघटना अधिक सक्षम, मजबूत आणि जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने कार्यरत राहीन.”

त्यांनी पुढे पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, सहकारी आणि कार्यकर्त्यांनी सातत्याने दिलेल्या प्रेम, विश्वास आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. आगामी काळात विद्यार्थी हिताचे प्रश्न, संघटन विस्तार आणि पक्षाची विचारधारा अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ॲड. कल्पेश माने यांच्या र्नियुक्तीबद्दल मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कल्याण लोकसभा क्षेत्रात विद्यार्थी संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रीय कार्यशाळेत सायबर गुन्हे, पीडित केंद्रीत पोलीसिंग केंद्रस्थानी

प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान, विद्यार्थ्यांनी सामाजिक बदलामध्ये तरुणांची भूमिका, स्क्रीनशॉट यावर चर्चा केली पुणे: कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनी महिलांवरील गुन्ह्यांच्या तपासाचा दर्जा आणि गती सुधारण्यासाठी...

मुंबईच्या अटल सेतूवर बाईकस्वार चालवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एफआयआर दाखल, पोलिसांनी सुरू केली शोध

मुंबई: अटल सेतूवर दुचाकी पकडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध एफआयआर दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.अटल सेतूवर दुचाकी...

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या शासनावर राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

स्पेन-अर्जेंटिना फायनलच्या एका आठवड्यानंतर विश्वचषक अंतिम रेफ्री स्लाव्हको विन्सिक यांनी करिअरचा मोठा निर्णय घेतला

स्पेन-अर्जेंटिना विश्वचषक फायनलनंतर विश्वचषक अंतिम पंच स्लाव्हको विन्सिक यांनी निवृत्ती घेतली स्लोव्हेनियन रेफ्री स्लाव्हको विन्सिक यांनी अधिकृतपणे रेफरी कारकिर्दीचा शेवट केला आहे, 2026...

उल्हासनगरातील राजकीय गुरूला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी

उल्हासनगर दि. २९ ( प्रमोद दळवी )  : गुरुपौर्णिमा निमित्त प्रत्येक जण आपल्या गुरुची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत त्यांचा आशीर्वाद घेत असतात. उल्हासनगरातील...

error: Content is protected !!