Homeशहरमध्यवर्ती रुग्णालयातील CT-SCAN ( सिटीस्कॅन ) सेंटर गेल्या आठ ते दहा दिवसापासून...

मध्यवर्ती रुग्णालयातील CT-SCAN ( सिटीस्कॅन ) सेंटर गेल्या आठ ते दहा दिवसापासून बंद : गोरगरीब रुग्णांचे हाल

उल्हासनगर दि ३० : मध्यवर्ती रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटर हे गेले आठ ते दहा दिवसापासून बंद असून यामुळे गोरगरीब रुग्णांची प्रचंड गैरसोय  होत अशी तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांना मिळताच त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसह या बाबत जिल्हा शल्यचिकित्सक मनोहर बनसोडे यांना जाब विचारला. मध्यवर्ती रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असताना जिल्हा रुग्णालयाच्या कोणत्याही सोई -सुविधा या रुग्णालयात उपलब्ध नाहीत.या रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटर हे गेल्या आठ ते दहा दिवसापासून बंद असल्यामुळे गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. व आर्थिक परिस्थिती मुळे गोर-गरीब रुग्णांना बाहेरून सोनोग्राफी करणे परवडत नाही. किंवा यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य नाही. असे असतांना रुग्णालय प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे असा आरोप जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला.तसेच रुग्णालयात असलेले पथोलॉजी सेंटर सुद्धा ज्या पद्धतीने सुसज्य असायला हवं त्या पद्धतीने ते नाही व त्या पद्धतीने या ठिकाणी कर्मचारी काम सुद्धा करीत नाहीत.यामुळे सुद्धा रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

या रुग्णालयात दररोज उल्हासनगर सह कर्जत / कसारा व ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून हजारो नागरिक उपचारासाठी येत असतात.परंतु या रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची संख्या अपुरी असल्याने ओपीडी मध्ये सुद्धा प्रचंड गर्दी पहोते आणि यावर सुद्धा रुग्णालय प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.आपल्या रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असल्याने या ठिकाणी येणाऱ्या गोर गरीब रुग्णांची संख्या पाहता येथे एम. आर. आय ची सुविधा तात्काळ उपलब्ध करून दयावी अशी मागणी मनसे च्या वतीने करण्यात आली.मनसेच्या निवेदनातील मागण्यांन बाबत रुग्णालय प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा गोरगरीब रुग्णांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागेल असा ईशारा सुद्धा मनसेच्या वतीने देण्यात आला.यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख मनविसे जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव,उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके, मुकेश सेठपलांनी, विभाग अध्यक्ष अक्षय धोत्रे,नटवर वासिटा,कैलास घोरपडे,उपविभाग निर्मल मायकल,शाखा अध्यक्ष सचिन सिरसाठ यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मनसेच्या वतीने १ )  आपल्या रुग्णालयातील सिटीस्कॅन सेंटर ( CT – SCAN )  तात्काळ सुरू करण्यात याव.२ ) पॅथॉलॉजी मध्ये रुग्णांची गैर होणारी गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात.३ ) आपल्या रुग्णालयात शक्य तितक्या लवकर एम आर आय ( MRI ) सेंटर सुरू करण्यात याव.४ ) रुग्णालयातील रुग्णांची गर्दी पाहता डॉक्टर व ओ.पी.डी. ची संख्या वाढवण्यात यावी.५) आपल्या रुग्णालयात कमीत कमी ३ रुग्ण वहिका व एक शव वाहिनी तात्काळ उपलब्ध करण्यात यावी.६) सकाळी गर्दीच्या वेळी केस पेपर काऊंटरची संख्या वाढविण्यात यावी.७) रुग्णालयातील व रुग्णालयाच्या सौच्छालयातील अस्वछता पाहता रुग्णालयाच्या स्वच्छतेवर भर देण्यात यावा.८) कर्मचारी व डॉक्टर यांना रुग्णालयात वेळेत उपस्थित राहण्याची सक्त ताकीद देण्यात यावी. व जे डॉक्टर किंवा कर्मचारी वेळेत उपस्थित नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

९) डॉक्टर व कर्मचारी यांनी रुग्णांशी सौजण्याने वागण्याच्या सूचना देऊन सक्त देण्यात याव्यात. १०) एखादा रुग्ण आपल्या रुग्णयात आणल्याणानंतर त्या रुग्णवर उपचार करण्याऐवजी आपले डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना ठाण्याला घेऊन जा मुंबईला घेऊन जा रायगडला जा असे सल्ले देऊन रुग्णांवर उपचार करण्याऐवजी आपलं काम कमी कस होईल यासाठी प्रयत्नशील असतात अश्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आमच्या मोहिमेला कशामुळे अडचणीत आणण्यात आले…’- सलग सहाव्या पराभवानंतर पीबीकेएस प्रशिक्षकाचा प्रामाणिक प्रवेश

धर्मशाला येथील HPCA क्रिकेट स्टेडियमवर दुपारच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) कडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पंजाब किंग्ज (PBKS) ने त्यांचे पूर्ण लक्ष...

मुंबईतील ७९ नगरसेवकांना राजकीय वारसदार म्हणून निवडणूक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, माजी नगरसेवकांनी...

BMC मतदान" decoding="async" fetchpriority="high"/> मुंबई: माजी बीएमसी नगरसेवक, शिवसेनेच्या विद्यमान खासदाराची मुलगी आणि नुकत्याच झालेल्या बीएमसी निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप पक्षाच्या कार्यकर्त्याचा सात...

मुलगा न झाल्याने पुण्यातील व्यक्तीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ॲसिड टाकले, गुन्हा दाखल

पुणे - मुलगा झाला नसल्यामुळे तिच्यावर टॉयलेट क्लिनिंग ॲसिड टाकून पत्नीला मारहाण करून तिच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी...

मे महिन्यात 10 हंगामी भाज्या खाव्यात

जसजसे तापमान वाढते आणि शरीराला हलके, ताजे जेवण हवे असते, तसतसे थंड, हायड्रेटिंग आणि नैसर्गिकरित्या मुबलक असलेल्या भाज्यांकडे झुकण्यासाठी मे महिना एक स्मार्ट महिना...

आदिवासी महिला धाडसी डोंगराच्या पायथ्याशी पाण्यात चालत पडण्याचा धोका पत्करतात

पुणे : पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, पावसाळ्यात सरासरी 1,900 ते 2,000 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडतो, त्यामुळे पाणीटंचाईची तक्रार करायला हरकत नाही. पण इथला...

error: Content is protected !!