Homeशहरभोरगाव लेवा पंचायतच्या मुंबई कोंकण विभागीय समुपदेशन समितीची सभा संपन्न

भोरगाव लेवा पंचायतच्या मुंबई कोंकण विभागीय समुपदेशन समितीची सभा संपन्न

उल्हासनगर दि २६ : मुंबई व कोकण विभाग भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे समुपदेशन समिती डोंबिवलीची पहिली सभा उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघ उल्हासनगर – ४  द्वारे संचालित शिवलिला गाजरे लेवा पाटीदार हॉल येथे अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाली सभेस समुपदेशन समितीचे ११ सदस्य उपस्थित होते.

सभेची सुरुवात श्री गणेश पूजन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन.डॉ.ज्ञानेश्वर पाटील व श्यामसुंदर पाटील तसेच समुपदेशन समिती अध्यक्ष तुकाराम नेहेते दादा, समिती सचिव.सौ.भाग्यश्री ताई पाचपांडे व उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाचे अध्यक्ष.वसंत नेहेते व सर्व मानवरांच्या उपस्थितीत झाले. सभेच्या सुरुवातीस पहलगाम हल्ल्यातील मृत निरपराध नागरिक व ऑपरेशन सिंदूर मधील शहिद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

भोरगांव लेवा पंचायत, कार्यकारिणीचे सदस्य.डॉ ज्ञानेश्वर पाटील, समितीचे कायदेशीर सल्लागार  श्यामसुंदर पाटील तसेच तुकारामदादा नेहेते -अध्यक्ष, सौ.भाग्यश्रीताई पाचपांडे -सचिव, विष्णू प्रभाकर चौधरी -सदस्य,  संजय झांबरे, नितीन जावळे,  गेंदा पाटील, सौ.निशाताई अत्तरदे, सतीश कोल्हे, उज्वल चौधरी सर्व पदाधिकारी व सदस्यांचे उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच मुंबई भोरपंचायत समुपदेशन समितीच्या द्वारे उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाच्या वसंत नेहेते -अध्यक्ष, भास्कर पाटील -उपाध्यक्ष, सतीश कोल्हे – सचिव, .उल्हास पाटील – कोषध्यक्ष, प्रेमचंद्र सरोदे – सदस्य व  नितीन जावळे – सदस्य या सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रमाचे प्रायोजक या नात्याने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

सभेचे प्रास्ताविक समुपदेशन समिती सचिव सौ.भाग्यश्री ताई पाचपांडे यांनी करतांना भोरगाव लेवा पाटीदार पंचायतला जुना इतिहास असुन बदलत्या काळाची गरज म्हणून आज भोरपंचायत च्या मागणी होईल तेथे भोरपंचायत समुपदेशन समितीची शाखा व्हावी या भुमिकेतूनच मुंबई कोकण विभागीय समितीची स्थापना होत असल्याचे सहर्ष नमुद केले आणी त्यानंतर या समुपदेशन समितीच्या संचालकांच्या संबोधन सभेची भूमिका व ऊद्दिष्टे मांडली. त्यात प्रामुख्याने सभासदांना भोरपंचायतची सर्वागिण  माहिती देणे, कामकाजासाठी पोषक वातावरणनिर्मिती करणे आणी सर्व समिती सभादांना प्रोत्साहन देणे, विवादग्रस्त समाजबांधवांनी प्रकरणे कशी हाताळावे यासारख्या महत्वाची उद्दिष्टे साध्य करून आज सभासदांना भोरपंचायतची योग्य  माहिती द्यायची भूमिका मांडली. नंतर सर्व समुपदेशन समिती सदस्यांनी स्वतःचा परिचय करून दिला व सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली.

त्यानंतर भोरगांव लेवा पंचायत पाडळसे,कार्यकारणी सदस्य व समुपदेशन समितीचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांनी लेवा पाटीदार भोरपंचायतच्या कुटुंबाचे सभासद म्हणून काम करतांन विषयाच्या अनुषंगानेच प्रथमतः प्रचलित  सामाजिक कार्य आणी भोरपंचायतचे कौटुंबिक व सामाजिक समुपदेशन कार्य यात खुपच फरक असुन समुपदेशन हा या कार्याचा गाभा असल्याचे नमुद केले. त्यामूळे प्रत्येक सभासदाला या संवेदनशील विषयाला न्याय देण्यासाठी आपल्यातील समुपदेशक काळजीपूर्वक घडवावा लागणार  आहे असे सांगून सभासदाने विवादग्रस्तांना कसे हाताळावे, आणी  भावनिक समायोजन  कसे साधावे, यावर सविस्तर माहिती दिली त्यानंतर भोरगांव लेवा पंचायतची रचना, स्वरुप,व्याप्ती  कार्ये आणी ते कसे चालते,तसेच पहिली सुनावणी असतांना दोन्ही बाजू कश्याप्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीनेच कशा समजून घ्याव्या,व पुढील सुनावणी कशी घ्यावी आणी सर्वात महत्वाचे समितीचे प्रयोजन म्हणजे वादविवाद ग्रस्त पती पत्नींमध्ये समुपदेशन समितीने  शक्यतोवर तडजोडीचीच भूमिका घ्यावी असे अधोरेखित केले आणी अंतिम निर्णय भोरगाव पंचायत पाडळसे,येथेच होईल  सांगितले.महत्वाचे म्हणजे आपण समुपदेशन करून कुटुंबव्यवस्था कशी सुदृढ करता येईल हे महत्वाचे आहे असे सांगितले. समुपदेशन समितीचे कायदेविषयक सल्लगार श्यामसुंदर पाटील यांनी कायद्यातील कलमांबाबत सविस्तर माहिती दिली व समुपदेशन करतांना समितीच्या सदस्यांनी कोणते संकेत पाळावे ? समोरच्या दोन्ही बाजूना समजून घेतांना काय करावे व काय करणे टाळावे यावर सविस्तर माहिती दिली भोरगाव लेवा पंचायतीच्या घटनात्मक चौकटीत राहून कसे कार्य करावे याबाबत माहिती दिली,

समुपदेशन समितीचे अध्यक्ष तुकारामदादा नेहेते यांनी पहिल्या सभेत आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की काही कारणास्तव प्रथम सभेस विलंब झाला आहे  पण आपली सुरवात छान झाली आहे पुढील कार्य जोमाने व उत्साहाने करू असे सांगितले व सभेच्या उत्कृष्ठ नियोजनाबद्दल उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाचे कौतुक केले.  उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाचे अध्यक्ष वसंत नेहेते यांनी समितीच्या सर्व सदस्य यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात व भविष्यात उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघ आवश्यक ती मदत करेन असे आश्वसन दिले.

सर्व उपस्थितांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.सभेच्या शेवटी नितीन जावळे यांनी उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाचे हॉल व भौक्तिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले सर्व समिती सदस्य उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले तसेच सभेच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.सभेचे सूत्र संचालन.सतीश कोल्हे यांनी अतिशय प्रभावीरित्या केले.सभेच्या नंतर विवाद ग्रस्त बांधवाची सुनावणी घेण्यात आली.सर्व सभासद सुनावणीवेळी उपस्थित असल्यामुळेच नवीन सभासदांना सुनावणी कशी घ्यावी,सुनावणी वेळी विशेषतः शामसुंदर पाटील यांनी त्यांचे कायदा तंत्रानुसार सुरुवात केली,त्यामूळे तंत्रही लक्षात आले आणी सभासद संबोधनाबरोबरच प्रत्यक्ष कामकाजालाही सुरूवात झाली.सभा संपन्नतेनंतर सर्वांनी सुग्रास स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एक नाजूक फिटनेस प्रणाली? हॅमस्ट्रिंगच्या दुखापतींमुळे टीम इंडिया, CoE स्कॅनरखाली आहे

नितीश कुमार रेड्डी (पीटीआय फोटो) नवी दिल्ली : भारताचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल याने इंग्लंडमधील एकदिवसीय मालिका पराभवानंतर आपल्या संघाच्या तंदुरुस्तीबाबत...

मुंबई उच्च न्यायालय: मोटर वाहन कायद्यांतर्गत नातेवाईकांसाठी पेआउटची गणना करताना अपघातग्रस्तांच्या उत्पन्नातून गृह कर्जावरील...

मुंबई उच्च न्यायालयाने मोटार वाहन कायद्यांतर्गत अपघात प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई देताना गृहनिर्माण कर्जावरील व्याज पीडिताच्या उत्पन्नातून वजा केले जाऊ नये, असे नमूद केले...

कात्रज येथे अल्पवयीन मुलांनी प्रतिस्पर्धी अल्पवयीन मुलाची हत्या | पुणे बातम्या

AI-व्युत्पन्न केलेले चित्र एक चाकू चालवणारी व्यक्ती दाखवते. चित्रण एक हत्या प्रतिनिधित्व आहे. पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी मंगळवारी सकाळी चार अल्पवयीन मुलांना...

सिंगापूरच्या पर्यटकाने विचारले, ‘आप मेड इन चायना?’ भारतीय भोजनालयात; त्याचे शांत उत्तर मन जिंकते

इंटरनेटवरील काही सर्वात मोठे व्हायरल क्षण नियोजित नाहीत. ते दैनंदिन जीवनात घडणाऱ्या सामान्य संभाषणातून येतात. भारतातील सिंगापूरच्या पर्यटकाचा नुकताच आलेला व्हिडिओ त्याचा...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

error: Content is protected !!