Homeशहरबँक राष्ट्रीयीकरण दिनानिमित्त डीजीईटी पदवी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे यशस्वी आयोजन

बँक राष्ट्रीयीकरण दिनानिमित्त डीजीईटी पदवी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे यशस्वी आयोजन

ठाणे दि. २२ ( प्रमोद दळवी )  बँक राष्ट्रीयीकरण दिन २०२६ निमित्त डीजीईटी पदवी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील बँकिंग अँड इन्शुरन्स विभागाने, वाणिज्य मंडळ (कॉमर्स क्लब) आणि बीएमएस विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा तसेच पॉवरपॉइंट (PPT) सादरीकरण स्पर्धांचे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी आयोजन केले. या स्पर्धांना विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दि. २० जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत डीजीईटी पदवी महाविद्यालयासह विविध महाविद्यालयांतील एकूण १५ संघांनी सहभाग नोंदविला. बँकिंग, अर्थव्यवस्था, वित्तीय साक्षरता आणि चालू घडामोडींवर आधारित विविध फेऱ्यांमधून स्पर्धकांनी आपले ज्ञान आणि विश्लेषणात्मक कौशल्य सिद्ध केले. या स्पर्धेत डीजीईटी पदवी महाविद्यालयाच्या टी.वाय.बी.ए.एफ.च्या अभिलाषा भारती आणि अर्पिता दास यांनी प्रथम क्रमांक पटकावला. एफ.वाय.बी.एम.एस.च्या जास्मिन आनंद आणि एफ.वाय.बी.कॉम.च्या प्रीती विश्वकर्मा यांनी द्वितीय क्रमांक मिळविला, तर एफ.वाय.बी.एम.एस.चे हर्ष कदम आणि याद्नेश गोंधळे यांनी तृतीय क्रमांक संपादन केला.

दि. २१ जुलै रोजी पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन पॉवरपॉइंट (PPT) सादरीकरण स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला. बँकिंग क्षेत्रातील बदल, डिजिटल बँकिंग, आर्थिक समावेशन, वित्तीय व्यवस्थापन आणि आधुनिक बँकिंग प्रणाली यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण करून आपली अभ्यासपूर्ण तयारी आणि संवादकौशल्य प्रदर्शित केले. या स्पर्धेत भाऊसाहेब नेने महाविद्यालय, पेण येथील आर्यन अनंत भोईर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. बी.एन.एन. महाविद्यालय, भिवंडी येथील प्रदीप देवराम राठोड आणि प्रवीण रामू सरगम यांनी द्वितीय, तर शंकर नारायण महाविद्यालय, भाईंदर येथील वर्षा पटेल आणि सुमय्या इनामदार यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

स्पर्धांचे परीक्षण निवृत्त बँक अधिकारी श्री. योगेश लोहोकारे आणि सहाय्यक प्राध्यापिका पद्मा पाटील यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विषयज्ञान, मांडणी, आत्मविश्वास, विश्लेषणात्मक दृष्टीकोन आणि सादरीकरण कौशल्याच्या आधारे मूल्यमापन केले.विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता, बँकिंगविषयक ज्ञान, विश्लेषणात्मक विचारशक्ती, संवादकौशल्य आणि प्रभावी सादरीकरणाची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत स्पर्धेला विशेष रंगत आणली. या यशस्वी आयोजनासाठी बँकिंग अँड इन्शुरन्स विभागाने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. भाविका करकेरा यांचे मार्गदर्शनाबद्दल विशेष आभार मानले. तसेच परीक्षक, सहभागी महाविद्यालये, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी स्वयंसेवक यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल विभागाने सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजित पवार यांच्या जयंतीदिनी महासरकार कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करणार आहे.

राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी सांगितले की, शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ ३० जुलैपूर्वी शेतकऱ्यांना दिला जाईल. पुणे : या योजनेच्या अंमलबजावणीची...

उल्हासनगरात जिल्हास्तरीय ‘सुब्रतो फुटबॉल कप २०२६-२७’ स्पर्धा उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. २२ ( प्रमोद दळवी )  : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे तथा उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त...

‘आधी कोणीही असं केलं नव्हतं’: हरभजन सिंगचा वैभव सूर्यवंशीचा मोठा दावा

वैभव सूर्यवंशी (एएनआय फोटो) भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने किशोरवयीन फलंदाजीतील खळबळजनक वैभव सूर्यवंशी याचे कौतुक केले आहे, त्याला "अविश्वसनीय" प्रतिभा म्हटले आहे...

मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट कायम, तानसा ओव्हरफ्लो, तलाव साठा 62% वर

मुसळधार पाऊस सुरू असल्याने, IMD ने ऑरेंज सिग्नल वाढवून मुंबई हाय अलर्टवर आहे मुंबई: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) बुधवारी मुंबई आणि मुंबई महानगर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वर्गीय मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘छत्रपती...

उल्हासनगर दि.२२ ( प्रमोद दळवी )  : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या महसूल...

error: Content is protected !!