उल्हासनगर दि. २० ( प्रमोद दळवी ) : शुक्रवारी दिनांक १९/०६/२०२६ रोजी दुपारी १:३० वाजता उल्हासनगर महानगरपालिकेतील महिला व बालविकास सभापती श्रीमती मीनाताई सोंडे यांच्या दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रभागातील गरीब व गरजू महिलांना रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षण (Skill Training) प्रदान करण्यासाठी व ‘महामेळावा’ आयोजित करण्याच्या अनुषंगाने या पूर्वतयारी बैठक व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत महामेळाव्याचे नियोजन आणि अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला श्रीमती मीनाताई सोंडे (माननीय सभापती, महिला व बालविकास समिती), राजेंद्र चौधरी (नगरसेवक), सुशील पवार,( समाजसेवक) राजेश डोईफोडे ( एस. एन. उद्योग अधिकारी), राठोड (जिल्हा उद्योग निरीक्षक),अमर पवार ( सामाजिक कार्यकर्ते), महेंद्र जाधव (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते. लवकरच एक भव्य उद्योग मेळाव्याच्या आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नगरसेविका डॉक्टर मीना सोंडे यांनी दिली आहे.





























