Homeशहरनगरसेविका मीना सोंडे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक कार्ड व शासकीय दाखले शिबिर...

नगरसेविका मीना सोंडे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक कार्ड व शासकीय दाखले शिबिर संपन्न

उल्हासनगर दि. ८ ( प्रमोद दळवी )  : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक शासकीय दाखले सहज उपलब्ध व्हावेत तसेच ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने महिला व बालविकास समितीच्या सभापती तथा शिवसेना नगरसेविका श्रीमती मीना सोंडे यांच्या पुढाकाराने बुधवारी ज्येष्ठ नागरिक कार्ड व शासकीय दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५, कुर्ला कॅम्प, रवींद्रनगर येथील मीना सोंडे यांच्या कार्यालयात हे शिबिर पार पडले. उल्हासनगर तहसील कार्यालयाच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बुधवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत आयोजित शिबिरात शहरातील ६२ हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आदी शिक्षणासाठी आवश्यक शासकीय दाखल्यांसाठी अर्ज भरले. तसेच मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर केले.

या शिबिरात अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना आवश्यक शासकीय दाखले व ज्येष्ठ नागरिक कार्ड लवकरच वितरित करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका मीना सोंडे यांनी दिली. तसेच या उपक्रमासाठी उल्हासनगर तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. नायब तहसीलदार यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना शासकीय दाखले व ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील, असा विश्वास मीना सोंडे यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रातील घाटात पावसाचा जोर कायम, महाबळेश्वरला दरड कोसळली

मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरमध्ये वाहतूक मंदावली आहे पुणे: महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच असून सह्याद्रीच्या घाटात मंगळवारी सकाळी 8. 30 वाजता संपलेल्या 24...

इस्रायली हल्ल्यात गाझाच्या अर्जेंटिना-इजिप्त फिफा विश्वचषक स्क्रिनिंग आयोजक किकऑफपूर्वी ठार

पॅलेस्टिनींनी अर्जेंटिना आणि इजिप्त यांच्यातील नुसेरात, मध्य गाझा पट्टी (डावीकडे) येथे विश्वचषक फेरीच्या 16 सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहिले आणि लिओनेल मेस्सी इजिप्तच्या मोहनाद...

मुसळधार पावसानंतर मुंबईतील सात तलावांना महिनाभराचा पाणीपुरवठा एकाच दिवसात झाला मुंबई बातम्या

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईच्या पाणीसाठ्यात झपाट्याने सुधारणा झाली असून,...

पुण्यात मुसळधार पावसात इमारत कोसळून १६ जण अडकल्याची भीती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी (WTE) प्लांटमधील मोशी येथील तीन मजली प्रशासकीय इमारत बुधवारी मुसळधार पावसात कोसळलीImage Credit: TNN पुणे : मोशी येथील...

मानसशास्त्रज्ञ-मंजूर पालकत्वाचा आजचा कोट: “मुलांसाठी, खेळ हे गंभीर शिक्षण आहे. हे बालपणीचे काम आहे.”

मानसशास्त्रज्ञ-मंजूर पालकत्वाचा आजचा कोट: "मुलांसाठी, खेळ हे गंभीर शिक्षण आहे. हे बालपणीचे काम आहे." आजचे बालपण नेहमीपेक्षा जास्त वेळापत्रकबद्ध झाले आहे. शाळा, शिकवणी,...

error: Content is protected !!