Homeशहरदोन अल्पवयीन मोटरसायकल चोरट्यांवर झडप : ६ मोटरसायकली जप्त : विठ्ठलवाडी पोलिसांची...

दोन अल्पवयीन मोटरसायकल चोरट्यांवर झडप : ६ मोटरसायकली जप्त : विठ्ठलवाडी पोलिसांची कामगिरी

उल्हासनगर दि ८ ( प्रमोद दळवी ) : विठ्ठलवाडी पोलीस पहाटेच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या दोन विधी संघर्षित  बालकांकडून मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून जवळपास ६  चोरीच्या मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत करण्याची कामगिरी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सध्या मोटरसायकल चोरीच्या घटना घडत असल्याने या घटनेवर नियंत्रण आणण्यासाठी व मोटरसायकल चोरट्यांना रंगीहात पकडण्याकरिता विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, व पोलीस निरीक्षक  ( गुन्हे ) चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक बंकटस्वामी दराडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास मिसाळ, पोलीस हवालदार दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस शिपाई चंद्रकांत गायकवाड व सागर मोरे हे पहाटेच्या सुमारास चिंचपाडा परिसरात पेट्रोलिंग करीत होते. मोटरसायकल चोरटे हे पहाटेच्या सुमारास मोटर सायकलची चोरी करत असल्याने पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी दोन विधी संघर्षित बालक मोटरसायकल वरून येताना दिसले. पोलिसांनी संशयित म्हणून त्या दोघांकडे विचारपूस सुरू केली. इतकंच नव्हे तर त्यांच्या जवळील मोटर सायकलचा नंबर काय आहे याबाबत विचारपूस केली असता ते देखील त्यांना सांगता आले  नाही. यावरून पोलिसांचा संशय अधिकच बळावला. दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील दोन मोटरसायकलींबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्या मोटरसायकली चोरीच्या असल्याचे उघड झाले . अधिक चौकशीत ते नेवाळी परिसरात राहणारे असून त्यांच्या घराजवळ त्यांनी आणखीन चार मोटरसायकली त्या ठिकाणी ठेवले असल्याचे पोलिसांना समजले. त्यादेखील मोटरसायकली पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतल्या. त्या दोन विधी संघर्षित बालकांकडून ६ चोरीच्या मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

हे दोघे मध्यरात्री किंवा पहाटेच्या  सुमारास मोटरसायकली ज्या ठिकाणी उभे आहेत व ज्या ठिकाणी कोणतीही रहदारी नाही हे पाहून त्या मोटरसायकलीचा लॉक तोडून ती मोटरसायकल चोरी करून घेऊन जात असल्याचे तपासात समजले आहे. त्यांनी २ मोटरसायकली विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून व ४ मोटरसायकली कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्या असल्याचे तपासात व चौकशीत उघडकीस आले आहे. मोटरसायकली चोरीच्या गुन्ह्यात त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ते विधी संघर्षित बालक असल्याने त्यांची रवानगी भिवंडी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने ही कौतुकस्पद कामगिरी केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी पोलिसांना शाब्बास दिली आहे. पोलिसांची अशी ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असे देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी सांगितले.

या कारवाईत पोलीस उप निरीक्षक बंकटस्वामी दराडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास मिसाळ हवालदार दिलीप चव्हाण, संतोष सांगळे,, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस शिपाई चंद्रकांत गायकवाड, व सागर मोरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मध्य रेल्वेने इगतपुरी गुड्स शेडमधून ऑटोमोबाईल मालवाहतूक सेवा सुरू केली

मुंबई: 2 मे रोजी नव्याने अधिसूचित इगतपुरी गुड्स शेडमधून ऑटोमोबाईल लोडिंग सुरू करून मध्य रेल्वेने मालवाहतुकीतील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या...

उपग्रह आणि ग्राउंड डेटा वापरून अंदाज अचूकता सुधारण्यासाठी आयआयटीएम-इस्रो करार

पुणे: भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटर यांच्यातील सहकार्याचा उद्देश उपग्रह निरीक्षणे आणि जमिनीवर आधारित मोजमापांची जोड देऊन हवामान...

मित्तल फॅमिली, आदर पूनावाला यांनी राजस्थान रॉयल्स सुमारे $1.65 बिलियनमध्ये विकत घेतले

आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचा फाइल फोटो. लक्ष्मी एन मित्तल, आदित्य मित्तल आणि अदार पूनावाला यांच्या कन्सोर्टियमने IPL फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स आणि त्याची...

प्रेमानंद महाराज जी: प्रेमानंद महाराज जी यांचे आजचे प्रेम उद्धरण: “खरे प्रेम असते…”

आजच्या जगात, गोंडस कपल शॉट आणि मजेदार कॅप्शनसह "Instagram-अधिकृत" नसल्यास तुमचे नाते खरे आहे का, असा प्रश्न लोकांना पडू लागतो. आम्ही प्रेमाला...

पुण्यातील 3 वर्षीय बलात्कार-हत्या प्रकरण: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड आंदोलन

पुण्यातील 3 वर्षीय बलात्कार-हत्या प्रकरण: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड आंदोलन पुणे : तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर शनिवारी पुण्यातील शेकडो आंदोलकांनी...

error: Content is protected !!