- महानगरपालिकेच्या वतीने प्रथमच मोफत फिजिओथेरपीची सोय
उल्हासनगर दि ८ : उल्हासनगर महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राची व दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाचे मार्फत सुरू असलेल्या फिजिओथेरपी सेंटरची उल्हासनगर महापालिका प्रशासक तथा आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी पाहाणी केली.यावेळी त्यांचे सोबत दिव्यांग विभागाचे उपायुक्त श्री. अनंत जवादवार व विभाग प्रमुख श्री. राजेश घनघाव उपस्थित होते.

सदरचे सेंटर मे २०२५ पासुन सुरू केले असुन मागील महिन्यात सुमारे १०७ दिव्यांगांनी फिजिओथेरपीचा लाभ घेतला आहे. सदर ठिकाणी मोफतपणे विविध प्रकारच्या थेरपी दिल्या जातात यामध्ये विशेष सल्लागार १) शारीरिक चिकित्सा २) व्यावसायीक चिकित्सा ३) वाणी आणि भाषा चिकित्सा ४) मनोवैज्ञानिक सल्लागार ५) योगा थेरपी ६) दैनिक जीवनातील क्रिया ७) नर्सिंग देखभाल ८) पालकांचे प्रशिक्षण आणि समुपदेशन अशा विविध प्रकारच्या थेरपी दिल्या जातात. सदरचे थेरपी सेंटर हे सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या वतीने प्रथमच मोफत फिजिओथेरपीची सोय निर्माण करून देण्यात आली आहे. त्यामुळे उल्हासनगर शहरातील दिव्यांग नागरीक/व्यक्ती/संस्था यांनी जास्तीत जास्त प्रमाणात याचा फायदा घ्यावा असे मा. प्रशासक तथा आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से) यांनी आवाहन केले आहे.





























