Homeशहरडेंग्यू प्रतिबंध महिन्यानिमित्त संघवी हिल्स ठाणे येथे जनजागृती व आरोग्य उपक्रम उत्साहात...

डेंग्यू प्रतिबंध महिन्यानिमित्त संघवी हिल्स ठाणे येथे जनजागृती व आरोग्य उपक्रम उत्साहात संपन्न

ठाणे दि. ३१ : डेंग्यू प्रतिबंध महिन्यानिमित्त आनंदनगर आरोग्य केंद्रांतर्गत संघवी हिल्स येथे व्यापक आरोग्य जनजागृती व डास नियंत्रण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची पाहणी महानगरपालिका सर्वेक्षण पथकातील डॉ. तनया आवचट (सहाय्यक सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ), डॉ. अग्रणी सोनावणे (सहाय्यक सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ), श्री. आलोक शिंदे (आयटी अधिकारी) आणि श्री. शुभम कदम (बहुउद्देशीय सहाय्यक) यांनी केली.

हा कार्यक्रम डॉ. माधवी देवल (वैद्यकीय अधिकारी, आनंदनगर आरोग्य केंद्र) यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानगंगा नर्सिंग कॉलेजच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला. यामध्ये प्रा. अनिल आठवले (PRO), उपप्राचार्या कल्याणी तेजे मॅडम, तसेच GNM, ANM, आशा सेविका, MPW, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, परिचर आणि फायलॅरिया पथक यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमात ज्ञानगंगा नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्तन कर्करोग तपासणी व जनजागृती विषयावरील प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थित नागरिकांना नियमित तपासणीचे महत्त्व पटवून दिले. ANM यांनी मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांवर आरोग्य मार्गदर्शन केले. त्यानंतर ‘साथरोग प्रतिबंध’ या विषयावर घोषणा व ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून जनजागृती रॅली काढण्यात आली.

आशा सेविकांनी योग्य हात धुण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच परिसरात अँटी-लार्व्हल फवारणी, फॉगिंग आणि क्लोरीनचे वितरण करून डास नियंत्रणाच्या प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये डेंग्यू, मलेरिया, स्तन कर्करोग तपासणी आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मेरा भारत ठाणे व नशाबंदी मंडळातर्फे ‘नशा मुक्त युवा, विकसित भारतासाठी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

ठाणे दि. ३१  : भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा विभागांतर्गत मेरा भारत ठाणे आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या प्रसारक...

महापौर अश्विनी निकम यांचा पॅनल क्रमांक १५ मध्ये पाहणी दौरा; ३० सेक्शन रस्त्याचे काम...

उल्हासनगर दि. ३१ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील प्रभाग (पॅनल) क्रमांक १५ मधील विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी महापौर अश्विनी निकम यांनी...

उल्हासनगर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वितरणात विलंब; विजय कदम यांचे प्रशासनाला...

उल्हासनगर दि.३१ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश व आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले नसल्याने...

माता आणि आजी-आजोबांचे मतदार तपशील मॅपिंगसाठी वैध: राज्य मतदान कार्यालय | पुणे बातम्या

SIR साठी कोंढव्यात BLO कॅम्प पुणे : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या उच्च प्रतिनिधींनी म्हटले आहे की 2002 च्या SIR मधील माता आणि आजी-आजोबा...

दिल्लीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची राजेंद्र चौधरी यांची सदिच्छा भेट; उल्हासनगरातील पहिली...

उल्हासनगर दि . ३० ( प्रमोद दळवी )  : शिवसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नवी दिल्ली येथील...

error: Content is protected !!