Homeशहरखासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा :...

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा : उपजिल्हा रुग्णालय ५०० खाटांचे, कामगार रुग्णालयाचाही विस्तार

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा ऐतिहासिक निर्णय घेत, मध्यवर्ती उपजिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या २०२ वरून थेट ५०० करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेलू, मुरबाड आणि शहापूर परिसरातील लाखो नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समितीच्या सभापती सविता प्रवीण तोरणे (रगडे) यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि व कल्याण लोकसभेचे खासदार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ही महत्त्वपूर्ण मागणी केली होती. १७ मे २०२६ रोजी माजी आमदार पप्पू कलानी यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक जमनू पुरसवानी, महेश सुखरामाणी, कमलेश निकम आणि शिवाजी रगडे उपस्थित होते. या भेटीदरम्यान शिवाजी रगडे यांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्वांगीण उन्नतीकरणाची (अपग्रेडेशन) आणि खाटांची संख्या वाढविण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसमोर मांडली. या मागणीची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आरोग्यमंत्री आणि खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना मध्यवर्ती रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

रुग्णालयावरील वाढता ताण, वाढती रुग्णसंख्या आणि अपुऱ्या सुविधांची दखल घेत शासनाने या मागणीला मंजुरी देण्याच्या सूचना दिल्या.या मंजुरीनंतर रुग्णालयातील खाटांची संख्या २०२ वरून ५०० पर्यंत वाढविण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार नवीन डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, आधुनिक सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून रुग्णालय अधिक सक्षम करण्यात येणार आहे. यामुळे एकाच खाटेवर दोन रुग्णांना उपचार घ्यावे लागणे किंवा जमिनीवर गाद्या टाकून उपचार करण्याची वेळ येणार नाही. याचबरोबर कामगार रुग्णालयाचा देखील सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याची क्षमता २०० ते ३०० खाटांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ कामगारांनाच नव्हे, तर आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पात्र असलेल्या सर्वसामान्य नागरिकांनाही अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा कामगार रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत.

तसेच शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विकासासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आधुनिक सुविधा, वैद्यकीय उपकरणे आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होऊन नागरिकांना त्यांच्या परिसरातच उपचार मिळणे अधिक सुलभ होणार आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना या बद्दल सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते व रुग्णमित्र शिवाजी रगडे म्हणाले, “उपजिल्हा रुग्णालयाचे ५०० खाटांमध्ये रूपांतर, कामगार रुग्णालयाचा विस्तार आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण हे उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेसाठी ऐतिहासिक पाऊल आहे. या निर्णयामुळे लाखो नागरिकांना दर्जेदार उपचार स्थानिक पातळीवर मिळतील आणि उपचारांसाठी ठाणे किंवा मुंबईला जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल. हा सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि लोकहिताचा निर्णय आहे.” याबद्दल खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांचे विशेष आभार व्यक्त केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंगचा विक्रम, सर्वकालीन टॉप-फाइव्ह एलिट यादीत प्रवेश | क्रिकेट बातम्या

भारताचा विराट कोहली (ANI फोटो) विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या चमकदार कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड जोडला आणि ऑस्ट्रेलियन महान रिकी...

NITI आयोगाच्या अहवालात व्यापक पर्यटन सुधारणांची अपेक्षा आहे; हॉटेलची वाढ मंदावणारी नियामक अडथळे |...

नवीन NITI आयोग अहवाल हॉटेल प्रकल्प आणि पर्यटन वाढीला गती देण्यासाठी जलद मंजूरी आणि सोप्या नियमांची शिफारस करतो (प्रतिनिधित्वात्मक हेतूंसाठी AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा)...

‘निराधार कथा तरंगणे थांबवा’: FDA ने मसाल्यांचे दुकान सील केल्यानंतर सिया गोयलच्या वडिलांचा छळाचा...

प्रवीण गोयल (एल) यांचा दावा आहे की FDA ने त्यांचे दुकान निलंबित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अनावश्यक छळाचा सामना करावा लागला. पुणे: महाराष्ट्राच्या अन्न...

लोक त्यांच्या खिडकीत धातूचा चमचा का ठेवत आहेत? व्हायरल युक्तीमागील विज्ञान |

खिडक्यांवर घनीभूत होणे ही बऱ्याच घरांमध्ये एक सामान्य समस्या आहे, विशेषत: थंडीच्या महिन्यांत जेव्हा उबदार घरातील हवा थंड काचेला भेटते. हे एक...

मुंब्रा परिसरातील निर्घृण हत्येचा उलगडा : ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे मुंडके व हात...

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : मुंब्रा परिसरात एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करून त्याची ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे मुंडके धडापासून...

error: Content is protected !!