Homeशहरउल्हासनगर रेल्वे स्थानकातील समस्या बाबत बैठक संपन्न

उल्हासनगर रेल्वे स्थानकातील समस्या बाबत बैठक संपन्न

  •  महिन्यातून एक बैठक घेऊन आणखीन काही समस्या असतील त्या सोडवल्या जातील प्रबंधक यांचे आश्वासन

 उल्हासनगर दि १२ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर रेल्वे स्थानकात अनेक समस्या आहेत. या समस्या कोणत्या आहेत. रेल्वे प्रशासन या समस्या सोडवतील का याबाबत उल्हासनगर स्थानकातील प्रबंधक यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उल्हासनगर शहरातील प्रवासी वर्ग,सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसह विविध संस्था तसेच आरपीएफ जीआरपीएफ कर्मचारी देखील उपस्थित होते.

उल्हासनगर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १  आणि २ मध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या समस्या अद्याप पर्यंत सोडवण्यात आल्या नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. या समस्या बाबत अनेक तक्रार रेल्वे प्रशासनाकडे केल्या होत्या. पण या कोणत्या समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी उल्हासनगर स्थानक प्रबंधक सबिता  नित्यानंद मॅडम यांनी गुरुवारी सकाळी प्रवासी वर्ग सामाजिक क्षेत्रात काम करणारे व विविध संस्थेचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ॲड प्रशांत चंदनशिव, मुकेश भाटिया,  आकाश मेंजी, उमेश देबनाथ. युवासेनचे सुशील पवार ,रवी वर्मा शिवनेरी, फाउंडेशनचे रवींद्र मिंडे तसेच आर पी एफ जी आर पी एफ कर्मचारी उपस्थित होते

त्यावेळी उल्हासनगर रेल्वे स्थानकात काय समस्या आहेत. असे जवळपास नऊ समस्याचे निवेदन रेल्वे स्थानकाचे प्रबंधक नित्यानंद मॅडम यांना देण्यात आले. उल्हासनगर रेल्वे स्थानकात १) बंद असलेला सरकत्या जिना त्वरित सुरू करावे.२) स्थानकावर होम गार्ड नाही, RPF चे कर्मचारी ची संख्या वाढविण्या बाबत.३) बंद असलेले शौचालय सुरू करण्या बाबत तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील शौचालय ची साफ सफाई बाबत.४) पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्या बाबत.५) ॲम्ब्युलन्स सुरू करण्या बाबत ६) कचऱ्याचे डब्बे बसवण्या बाबत तसंच सफाई कर्मचारी पूर्ण वेळ उपलब्ध करण्या बाबत.७) प्लॅटफॉर्म क्रमांक १ ची उंची वाढविण्या बाबत.८) TC उपलब्ध करून देण्यात बाबत.९) तिकीट खिडकी वेळेत सुरू करण्या बाबत.अशा विविध समस्या आहेत. या सर्व समस्या एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याची मागणी त्यावेळी करण्यात आली. त्यावेळी उल्हासनगर रेल्वे स्थानकाचे प्रबंधक नित्यानंद मॅडम यांनी उपस्थित असलेल्या सर्वांना दर महिन्यात एकदा बैठक घेण्यात येणार असून ज्या ज्या समस्या असतील त्याची माहिती घेऊन त्यावर काम करण्यात येईल असे आश्वासन दिले. या बैठकीत आरपीएफ, जीआरपीएफ कर्मचारी देखील उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शुभमन गिलने फिफा वर्ल्ड कपमध्ये फुटबॉल दिग्गज रोनाल्डिन्होला भेटले, फोटो व्हायरल झाला

शुभमन गिल आणि रोनाल्डिन्हो (एजन्सी इमेज) भारताचा कर्णधार शुभमन गिलने युनायटेड स्टेट्समध्ये फिफा विश्वचषक 2026 दरम्यान ब्राझीलचा फुटबॉल आयकॉन रोनाल्डिन्हो गौचोला भेटताना क्रिकेटच्या...

मोठ्या सवलतीच्या खरेदीसाठी मुंबईतील इन्फिनिटी मॉलमध्ये उन्माद

मुंबई: मालाड पश्चिम येथील इन्फिनिटी मॉलमधील कपड्यांच्या रिटेल आउटलेटच्या प्रमोशनल ऑफरबद्दल सोशल मीडियावरील संदेशांनी शनिवारी मॉलच्या परिसरात मोठी गर्दी केली. पोलिसांना हस्तक्षेप...

MahaTET गळतीमुळे सेवांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी TET रद्द करण्याची मागणी पुनरुज्जीवित झाली, शिक्षक आणि राजकारणी वारंवार...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मंचाचे राज्य अध्यक्ष विजय कोंबे म्हणाले की, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये. पुणे : 2018...

तीन जंगली हिमालयी भक्षक समान टरफ शेअर करतात, एकाच वेळी शिकार करतात आणि कधीच...

नेपाळच्या लॅपची खोऱ्यातील एका महत्त्वपूर्ण अभ्यासात तीन शिखर शिकारींमध्ये आश्चर्यकारक शांतता दिसून येते: हिम तेंदुए, सामान्य बिबट्या आणि हिमालयी लांडगे. प्रादेशिक विभाजनांऐवजी, त्यांचे...

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

error: Content is protected !!