Homeशहरउल्हासनगर महापालिकेची ऑनलाइन प्रणाली : आता नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदवता येणार.

उल्हासनगर महापालिकेची ऑनलाइन प्रणाली : आता नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदवता येणार.

उल्हासनगर दि.०४ : शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आता नागरिकांना पालिकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत. कारण आता उल्हासनगर महापालिकेची ऑनलाईन प्रणाली सुरू झाली असून घरबसल्या नागरिकांना विविध समस्यांच्या तक्रारी आता नोंदविता येणार आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे, कचऱ्याचे ढिगारे तसेच रोजच्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आता महापालिकेने ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित केली आहे.

शहरातील नागरिकांना महापालिकेला कर अदा करूनही रोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, वाहतूककोंडी, फुटलेली जलवाहिनी, विविध भागात कचऱ्यांचे ढिगारे साठल्याचे चित्र असते. त्याविषयी तक्रारी करण्यासाठी महापालिकेत फेऱ्या माराव्या लागतात. या दैनंदिन अडचणींचे वेगाने निवारण आणि पारदर्शक कारभारासाठी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यामुळे रहिवाशांना घरबसल्या संबंधित विभागाकडे तक्रार करता येणार आहे. त्यानंतर ठराविक कालमर्यादेत समस्येवर कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या  ऑनलाइन प्रणालीवर नागरिकांना उल्हासनगर महापालिकेच्या ‘तक्रार निवारण पोर्टल’ https://grievances. smartumc.info वर लॉग-इन करावे. तक्रार नोंदवल्यानंतर ती तत्काळ संबंधित विभागाकडे पाठवली जाईल. निवारणाची प्रक्रिया पारदर्शक राहील आणि ठराविक कालमर्यादेत पूर्ण केली जाईल.तक्रार नोंदणी व निवारण प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी https://umc.gov.in या संकेतस्थळावर माहितीपट उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IPL 2026 च्या प्लेऑफच्या आशा धुळीस मिळाल्याने CSK ‘अधिक मजबूत युनिट’ म्हणून परत येईल...

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाड म्हणाला की, सीएसकेला सोमवारी चेन्नईमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला तरीही मला "मुलांचा...

मुंबईतील उद्योजकाची ओळखीच्या व्यक्तीने 7 कोटी रुपयांची जीएसटी थकबाकी फसवणूक केली आहे

मुंबई: एका विधवा उद्योजकाने तिच्या GST खात्यावर फसवणूक करून फसवणूक केल्याबद्दल आणि बनावट विक्री पावत्या सादर करून तिच्या कंपनीची 7 कोटी रुपयांपर्यंतची...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

भीती, स्वातंत्र्य आणि एड्रेनालाईन वाटण्यासाठी प्रवासी अधिक पैसे का देत आहेत; भारतात साहसी पर्यटनाचा...

अलिकडच्या वर्षांत प्रवासाच्या वर्तनात लक्षणीय बदल झाले आहेत. आराम, विश्रांती आणि विश्रांती महत्त्वाची असली तरीही, बरेच प्रवासी त्यांच्या सुट्ट्या फक्त आरामात घालवण्यात...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

error: Content is protected !!