Homeशहरउल्हासनगर महानगरपालिकेत 'e-HRMS' प्रणालीबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांस प्रशिक्षण

उल्हासनगर महानगरपालिकेत ‘e-HRMS’ प्रणालीबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांस प्रशिक्षण

उल्हासनगर दि.२७ : शासनाच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स (e-Governance) आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांना गती देण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या कामकाजात अत्याधुनिकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आता e-HRMS (Electronic Human Resource Management System) प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे.

या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारी, महानगरपालिकेच्या महासभा सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अल्टिमेट इंटग्रेटेड सोल्युशन प्रा.लि.चे महेश खारुडे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना e-HRMS प्रणालीच्या तांत्रिक बाजूंची सविस्तर माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींवर भर देण्यात आला.

डिजिटल उपस्थिती : e-HRMS प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवणे व रजा मंजुरी. दावे व लाभ : कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या सर्व लाभांच्या दाव्यांचे सादरीकरण, परिगणन (Calculation) आणि अधिदान (Payment).निवृत्तीवेतन व्यवस्थापन : मानवी संसाधन निवृत्तीवेतन प्रणालीद्वारे निवृत्तीवेतनाची प्रक्रिया सुलभ करणे.My UMC App : महापालिकेने विकसित केलेल्या ‘My UMC’ या अधिकृत अॅपचा वापर प्रशासकीय कामांसाठी कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमास उल्हासनगर महानगरपालिकेच्या उपआयुक्त (मुख्यालय) श्रीम. दिपाली चौगले, उपआयुक्त श्रीम. स्नेहा करपे, उपआयुक्त तथा महापालिका सचिव अनंत जवादवार, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, सहाय्यक आयुक्त विशाल कदम, सिस्टीम अॅनालिस्ट श्रीम. श्रद्धा बाविस्कर यांच्यासह महापालिकेचे विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी उपआयुक्त (मुख्यालय) श्रीम. दिपाली चौगले यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवाहन केले की, “प्रशासकीय कामात सुसूत्रता आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी त्वरित निकाली काढण्यासाठी e-HRMS प्रणाली अत्यंत प्रभावी ठरणार असल्याने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रणालीचा अवलंब त्वरित करून कामकाजात गतिमानता आणावी.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयपीएल २०२६: वैभव सूर्यवंशीच्या ९३ धावांनी राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या

राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (एपी फोटो) नवी दिल्ली: वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला कारण 15 वर्षीय खेळाडूने केवळ 38 चेंडूत शानदार 93...

डिजिटल अटक घोटाळ्यात 77 वर्षीय मुंबईतील रहिवासी 50 लाख रुपये गमावले

मुंबई: पूर्व क्षेत्र सायबर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरनुसार, डिजिटल अटक घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अधिकारी म्हणून दाखवून सायबर घोटाळेबाजांनी घाटकोपर येथील 77...

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय मुलाचा मृत्यू, पालकांची वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार |...

पुणे: दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (DMH) मध्ये सोमवारी एका सहा वर्षीय मुलीचा डोळ्याच्या प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला, त्यामुळे वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप झाला. रुग्णालयाने या...

7 प्रारंभिक चिन्हे पालकांनी कधीही दुर्लक्ष करू नये आणि कशी मदत करावी

बर्नआउट हे एकेकाळी प्रौढ आणि कार्यरत व्यावसायिकांशी संबंधित होते, परंतु आता ते शाळेत जाणाऱ्या मुलांमध्येही सामान्य झाले आहे. शैक्षणिक दबाव आणि भरलेले...

पुणे हौसिंग सोसायटीमध्ये 7 वर्षाच्या मुलाचा लिफ्टचा दरवाजा आणि ग्रीलमध्ये अडकून मृत्यू

पुणे : सिंहगड रोड परिसरातील सुमारे 25 वर्षे जुन्या गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीच्या लिफ्टच्या कोसळलेल्या लोखंडी जाळी आणि लाकडी दरवाजामध्ये अडकल्याने सोमवारी रात्री...

error: Content is protected !!