Homeशहरउल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड : स्थायी समिती सभापती पद...

उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड : स्थायी समिती सभापती पद भाजप की शिंदेसेनेकडे?

उल्हासनगर दि. १८ ( प्रमोद दळवी ) : बुधवारी  उल्हासनगर महानगरपालिकेत सर्वसाधारण महासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्यात आली. भाजप व शिंदेसेनेची प्रत्येकी ८ सदस्य आहेत. दोन्ही पक्षाचे समसमान सदस्य असल्याने, स्थायी समिती सभापती पद कोणाकडे? असा प्रश्न उभा ठाकला आहे. तसेच ९ विशेष समिती सदस्यांची निवड झाली असून एका विशेष समिती मध्ये ९ सदस्यांची निवड भाजप व शिंदेसेनेने एकमताने केली.

महासभेत स्थायी समितीचे १६ सदस्य निवड झाली असून शिवसेना व भाजपचे प्रत्येकी ८ सदस्य यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या स्थायी समिती सदस्यांचे नाव शिंदेसेनेकडून १) श्री. गायकवाड दिलीप दशरथ, २ ) श्री. पुरस्वानी जमुनादास खुबचंद, ३ ) श्री.भुल्लर राजेंद्रसिंग वीरसिंग, ४ ) श्री. सहोता कलवंत सिंग, ५) श्रीम. जया प्रकाश माखिजा, ६) श्री महेश पहलाजराय सुखरामणी,७) कु डिंपल कुमारी ठाकूर, व वंचित बहुजन पक्षाचे ८) श्री. खरात विकास रतन, भाजपकडून ९) श्री. राजेश वाधारिया,१०) श्रीम. अर्चना करणकाळे,११) श्री. कविता लाल पंजाबी. १२) श्री रवी जग्यासी, १३) श्री. दीपक (टोनी) सिरवानी,१४) श्री. राजेश वानखेडे,१५) श्री. शंकर (शेरी) लुंड, १६) श्री. संजय सिंह आशी आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य पदी १६ सदस्यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

महापालिकेच्या ९ विशेष समितीच्या सदस्यांची निवड झाली. विशेष समिती मध्ये प्रत्येकी ९ सदस्य असणार आहे. भाजपा व शिंदेसेनेने सर्वसंमतीने सदस्यांची निवड केली. यानंतर स्थायी समिती सभापती व विशेष समिती सभापतीची निवड होणार आहे. महापालिकेच्या ऐकून ७८ नगरसेवका पैकी भाजपाचे सर्वाधिक ३७, शिंदेसेनेचे ३६, वंचित बहुजन आघाडी-२, काँग्रेस-१, साई पक्ष-१ व १ अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. शिंदेसेनेने साई पक्ष, वंचित बहुजन आघाडी व ऐक अपक्ष यांना सोबत घेऊन शहर विकास आघाडी म्हणून कोकण आयुक्ताकडे नोंद केली. शिंदेसेनेने बहुमताचा ४० आकडा पार केल्यानंतरही महापौर व उपमहापौर निवडणुकीपूर्वी भाजप व शिंदेसेना सत्तेसाठी एकत्र आले. महापौर पद शिंदेसेनेतील ओमी कलानी टीमच्या अश्विनी निकम यांच्याकडे गेले. तर भाजपचे अमर लुंड यांच्याकडे उपमहापौर पद गेले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वैभव सूर्यवंशी: ‘मी त्याच्याशी खेळणार नाही’: भारताच्या विश्वचषक विजेत्याचा वैभव सूर्यवंशीबद्दल मोठा निर्णय भारत...

वैभव सूर्यवंशी (बीसीसीआय फोटो) नवी दिल्ली: भारताविरुद्धच्या पहिल्या T20I साठी इंग्लंडने आधीच त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची नावे जाहीर केली आहेत, स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा...

दिग्गज रंगभूमी आणि चित्रपट व्यक्तिमत्त्व विजया मेहता यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले

विजया मेहता यांच्या उत्स्फूर्त, जीवनाच्या तुकड्यांच्या निर्मितीमध्ये 'हमिदाबाई की कोठी' आणि 'पेस्टोनजी' या मार्मिक टेलिप्लेचा समावेश आहे. मुंबई : दिग्गज रंगभूमी आणि चित्रपट...

पुण्यातील रेस्टॉरंट ग्राहकांच्या मागणी आणि वर्ल्ड कप स्क्रीनिंग अधिकारांमध्ये अडकले | पुणे बातम्या

पुणे : फुटबॉलच्या तापाने शहराला वेढले असताना, तेथील रेस्टॉरंट, कॅफे आणि स्पोर्ट्स बार हे स्वत:ला मोठ्या प्रमाणात कोंडीत सापडले आहेत: व्यावसायिक स्क्रीनिंग...

श्री श्री रविशंकर उद्धरण: श्री श्री रविशंकर यांचे दिवसाचे कोट: “कधीकधी लोक विचारतात की...

जेव्हा चांगल्या लोकांना संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा श्री श्री रविशंकर कर्माबद्दल गहन दृष्टीकोन देतात. तो स्पष्ट करतो की वर्तमान दुःख भूतकाळातील कृतींमुळे...

PMC संचालित शाळा चालवण्यात खाजगी संस्था स्वारस्य दाखवतात

पीएमसीचा शिक्षण विभाग 250 मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड-माध्यमाच्या शाळा चालवतो जेथे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांमध्ये सुमारे...

error: Content is protected !!