Homeशहरउल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांचा गव्हर्नन्स सुधारणांच्या १५० दिवसांच्या विशेष मोहिमेत राज्यात 'तृतीय' क्रमांक

उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांचा गव्हर्नन्स सुधारणांच्या १५० दिवसांच्या विशेष मोहिमेत राज्यात ‘तृतीय’ क्रमांक

उल्हासनगर दि .२६ : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व सक्षम प्राधिकरणांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांचा विशेष कृती आराखडा’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमात उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी उल्लेखनिय कामगिरी करत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत डिजिटल क्रांती आणि प्रशासकीय पारदर्शकतेवर दिलेल्या भरमुळे पालिकेचा हा गौरव करण्यात आला आहे.

राज्यातील प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि नागरिकांना शासकीय सेवा घरबसल्या उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ही विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये प्रामुख्याने ई-ऑफिस प्रणाली, सुसज्ज संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ पोर्टलवरील सेवा, व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि प्रगत तंत्रज्ञानाचा (AI/GIS) वापर या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) मार्फत हे बाह्य मूल्यमापन करण्यात आले होते. मा. प्रशासक तथा आयुक्त श्रीमती मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या सक्षम नेतृत्व व नियोजनाखाली महापालिकेने ई-गव्हर्नन्सच्या क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले.

सदर कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन नागरिक सेवा, तक्रार निवारण यंत्रणा, ई-ऑफिस प्रणाली, अंतर्गत प्रशासकीय कार्यप्रणाली सुलभीकरण, वेळबद्ध निर्णयप्रक्रिया तसेच माहिती व तंत्रज्ञानाधारित सेवा वितरण यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या आहेत.

 ई-ऑफिसची अंमलबजावणी : पालिकेतील अंतर्गत कामकाजासाठी कागदविरहित (Paperless) ई-ऑफिस प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी केली.

  • डिजिटल सेवा : मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि इतर नागरी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या.
  • तक्रार निवारण : व्हॉट्सॲप आणि डॅशबोर्डच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यात यश मिळवले.
  • पारदर्शकता : ‘आपले सरकार’ प्रणालीमध्ये अर्जांचा निपटारा विहित वेळेत केल्यामुळे पालिकेच्या गुणांकनात मोठी वाढ झाली.
  • भविष्यातही शासनाच्या धोरणानुसार व ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत राहून नागरिकांना अधिक पारदर्शक, सुलभ व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे महापालिका प्रशासक तथा आयुक्तांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा : उपजिल्हा रुग्णालय...

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा ऐतिहासिक निर्णय घेत, मध्यवर्ती उपजिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या २०२ वरून...

जेव्हा अंडरडॉग गर्जना करतात: 1936 मध्ये कोल्हापूर क्लबचा ब्रिटिश रेजिमेंटच्या फुटबॉल संघाशी सामना झाला.

कोल्हापूर: कोल्हापुरातील चाहते 2026 च्या फिफा विश्वचषकात उलगडलेल्या अंडरडॉग कथांचा आनंद घेत आहेत. त्यांनी काबो वर्देला सलाम केला, जेव्हा ते स्पेनशी बरोबरीत...

काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या अंजली साळवे यांच्या नवीन कार्यालयाचे माजी खासदार हुसेन दलवाई आणि माजी...

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महापालिकेच्या काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या श्रीमती अंजली साळवे यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे माजी खासदार हुसेन दलवाई...

‘कोणताही चांगला माणूस नाही’: अश्विनने स्टीफन फ्लेमिंगला सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पाठवायला एमएस धोनीला...

स्टीफन फ्लेमिंगच्या बाहेर पडल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज नवीन अध्याय सुरू करण्यासाठी योग्य क्षणी पोहोचला आहे, असे भारताचे माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचे...

नुकत्याच झालेल्या कारच्या आगीनंतर बीएमसीने वाहनचालकांसाठी सुरक्षा प्रोटोकॉल जारी केला | मुंबई बातम्या

मुंबई: मुंबई कोस्टल रोडच्या उत्तरेकडील बोगद्याच्या आत बुधवारी कारला आग लागल्याच्या पार्श्वभूमीवर, बीएमसीने आपत्कालीन सुरक्षा प्रोटोकॉलचा पुनरुच्चार केला आहे की बोगद्याच्या आत...

error: Content is protected !!